Valentine Day 2024: व्हॅलेंटाईन डे विक लिस्ट इमेजेस शुभेच्छा स्टेट्स संपूर्ण माहिती

Valentine Day 2024 व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? प्रेमाचे सात दिवस कोणते? व्हॅलेंटाईन डे वीक लिस्ट शुभेच्छा सविस्तर माहिती येथे पहा.

Reshma
By Reshma
8 Min Read
व्हॅलेंटाईन डे विक लिस्ट इमेजेस शुभेच्छा स्टेट्स संपूर्ण माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2024) हा दिवस १४ फेब्रुवारी २०२४ रोजी येत असून या दिवसाची उत्सुकता प्रेमी युगुल, विवाहित जोडपे, तरुण मुले-मुली, अगदी लहानापासून ते वयस्कर अशा प्रत्येक वयोगटातील लोकांना ओढ लागलेली असते.

जगभरात फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असे संबोधले जाते. कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे असतो आणि फेब्रुवारीचा पहिला आठवड्यात प्रेमाचे खास दिवस असतात.

म्हणूनच हा महिना खूप विशेष आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी या पेक्षा दुसरी चांगली संधी नाही. तुम्ही ही या दिवसात तुमच्या आवडत्या खास व्यक्तीला, मित्रांना, कुटुंबाजवळ हृदयातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करू शकता आणि त्यांना व्हॅलेंटाईन डे च्या  शुभेच्छा देवू शकता.

व्हॅलेंटाईन डे २०२४ संपूर्ण मराठी माहिती

Valentine’s Day 2024 Full Marathi Information: आपल्या मनातील आवडत्या व्यक्तीला प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे होय. खर तर प्रेम व्यक्त करायला कोणत्याही विशेष दिवसाची किंवा मुहूर्ताची गरज नसते. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस (Valentine Day Meaning In Marathi) असतो.

परंतु आजच्या धावपळीच्या युगात वेळेची कमतरता असून वेळेला फार महत्व आहे. जीवनात प्रेम हे खूप महत्वाचे आहे, म्हणूनच प्रेमी युगुलांना हा दिवस एकत्र येण्यासाठी, एकमेकांना वेळ देण्यासाठी योग्य ठरत आहे.

केवळ याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजेल. प्रेम असेल तरच आपल्या जीवन, आयुष्य आनंदी बनते. एकमेकांवर प्रेम करणे, आदर सन्मान करणे, प्रेमाची भावना असणे हे सुखी जीवनातील  सुंदर अनुभव आहे. असे म्हणतात  प्रेमाने जग जिंकता येते.

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?

What is Valentine’s Day?  सेंट व्हॅलेंटाईन हे रोमचे धर्मगुरू होते. त्यांचा जगात प्रेम वाढविण्यावर विश्वास होता.पण त्या शहराचा राजा क्लॉडियस याला व्हॅलेंटाईन चे हे विचार आवडले नाही. राजा प्रेम आणि लग्न ह्यांच्या विरोधात होते, त्यांना असे वाटायचे कि प्रेम आणि लग्न केल्याने पुरुषांची बुद्धीमत्ता आणि क्षमता संपते.

म्हणून त्यांच्या राज्यात अधिकारी व सैनिक यांचे लग्न होऊ शकत नव्हते. व्हॅलेंटाईनने राजाला विरोध करून रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित करून अधिकारी व सैनिक यांचे विवाह त्यांनी लावून दिले.

यामुळे राजाने संतापून १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाईनला फाशी दिली. त्या दिवसापासून या त्यांच्या बलिदान दिनी दरवर्षी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन हे म्हणून साजरा होतो.

व्हॅलेंटाईन वीक लिस्ट २०२४

Valentine Week List 2024 – Days Fall between 7 February and 14 February: व्हॅलेंटाईन डे (Valentine Day ) च्या एक आठवड्यापासूनच प्रेमाच्या दिवसांना सुरुवात होते. हे दिवस ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत साजरे केले जाते.

व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला येत असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून (Valentine Week) म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. व्हॅलेंटाईन डे ला प्रेम साजरे करण्यासाठी आधीचे सात दिवस महत्वाचे आहेत. या प्रत्येक दिवशी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून, ग्रीटिंग्ज, गिफ्ट्स देवून तसेच संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या जातात.

काही लोक फक्त १४ फेब्रुवारी (14 february) म्हणजेच व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा करतात तर काही लोक त्या आधीचा संपूर्ण आठवडा साजरा करतात. व्हॅलेंटाईनसाठी ७ दिवस कोणते आहेत? आणि आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे काही खास महत्व आहे. ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात.

व्हॅलेंटाईन वीक लिस्ट २०२४
व्हॅलेंटाईन वीक लिस्ट २०२४

१.  रोझ डे – ७ फेब्रुवारी (Rose Day 7 February)

आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला या दिवशी गुलाब देण्यात येते. गुलाबाच्या रंगानुसार याचा अर्थही आहे. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतिक समजले जाते. म्हणून लाल गुलाब या दिवशी दिला जातो.

२. प्रपोझ डे – ८ फेब्रुवारी (Propose Day 8 February)

ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा हा दिवस असतो. हा दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती केल्या जातात, जेणेकरून प्रपोज डे कायम लक्षात राहील.

तसेच जेवढ्या वेगळ्या पद्धतीने आपण प्रपोज करू तो प्रपोज समोरच्या व्यक्तीला आवडते आणि तो व्यक्ती ते लगेच स्वीकार करते. काहीना प्रत्येक्षपणे  समोर भावना वक्त करण्याची भीती असते ते प्रपोझ डे या दिवशी संदेश पाठवून भावना व्यक्त करतात.

३.  चॉकलेट डे – ९ फेब्रुवारी ( Chocolate Day 9 February)

या दिवशी एकमेकांवर प्रेम असल्याचे कबूल झाल्यावर तोंड गोड करायची वेळ येते, त्यामुळे हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. चॉकलेट, चॉकलेटबॉक्स, चॉकलेटचा पुष्पगुच्छ, प्रियजनांच्या दिले जाते. तसेच या दिवशी आपण जोडीदाराला, मुलांना किंवा तुम्हाला आवडत असलेल्या कोणालाही चॉकलेट देवून आनंद मिळवू शकता.

४. टेडी बेअर डे – १० फेब्रुवारी ( Teddy Bear Day 10 February)

या चौथ्या दिवशी एकमेकांच्या आवडीचे गिफ्ट देण्याला प्राधान्य देण्यात येते. आपल्या प्रेमात गोडवा वाढावा यासाठी हे गिफ्ट एकमेकांना देण्यात येते. टेडी बेअर हे दिसायला अत्यंत सुंदर असते आणि मुलींना ते अधिक आवडते म्हणून हा दिवस टेडी बेअर देवून साजरा करतात.

५. प्रॉमिस डे – ११ फेब्रुवारी ( Promise Day 11 February)

आयुष्यभर एकमेकांना साथ देणे, आनंदी ठेवणे, असे वचन एकमेकांना या दिवशी दिले जाते. आणि ते वचन किती महत्वाचे आहे याची जाणीव करून दिली जाते.

६. किस डे – १२ फेब्रुवारी ( Kiss Day 12 February)

एकमेकांच्या प्रेमात असलेल्या व्यक्ती प्रेमात आकंठ बुडल्यानंतर हा क्षण जपण्यासाठी किस करतात अर्थात चुंबन घेतात. पुढे या आठवणी आयुष्यभर राहतात.

७. हग डे – १३ फेब्रुवारी ( Hug Day 13 February)

या दिवसाला ‘हग डे’ (Hug Day) अर्थात आलिंगन दिवस असेही म्हणतात. काही गोष्ट शब्दाने व्यक्त होतात तर काही गोष्टी व्यक्त करण्यासाठी मिठ्ठी मारूनच व्यक्त केल्या जातात. एकमेकांना मिठीत घेऊन एकमेकांची साथ देण्याचा अनुभव हा खासच असतो शिवाय यामुळे प्रेमात वाढ होते आणि हग केल्यामुळे दोन्ही व्यक्तीला सुरक्षित असल्याचे वाटत असते.

८. व्हॅलेंटाईन डे – १४ फेब्रुवारी ( (Valentine Day 14 February)

‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस हा या आठवड्यातील शेवटचा दिवस असतो. या संपूर्ण दिवशी प्रेमी युगलू  एकमेकांच्या दिवसभर सोबत असतात. जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

काहीना संपूर्ण आठवडा साजरा करता आली नाही ते याच दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून त्याना चॉकलेट, फुल, गिफ्ट्स तसेच शुभेच्छा देतात. खास करून या दिवशी लाल रंगाचे कपडे घातले जातात. आयुष्यभराच्या आठवणी गोळा करण्याचा आणि आनंदात राहण्याचा हा दिवस आहे.

व्हॅलेंटाईन डे २०२४ इमेजेस शुभेच्छा स्टेट्स

Valentine Day 2024 Images Wishes Status:

1.

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

2.

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा
व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

3.

व्हॅलेंटाईन डे इमेजेस शुभेच्छा
व्हॅलेंटाईन डे इमेजेस शुभेच्छा

4.

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा स्टेट्स
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा स्टेट्स

5.

हैप्पी व्हॅलेंटाईन डे २०२४ शुभेच्छा
हैप्पी व्हॅलेंटाईन डे २०२४ शुभेच्छा

अशा प्रकारे आपण व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीक या दिवसांचे महत्व आणि संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. परंतु या एकाच दिवशी किंवा त्या आधीच्या सात दिवसात एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा संपूर्ण वर्षभर आपण प्रेम करत राहिले पाहिजे.

प्रेम आपण आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, प्राणी-पक्षांवर, निसर्गावर आपल्या कामावर केले पाहिजे. गिफ्ट्स देण्यासोबत आपण एकमेकांना मदत करणे, आदर-सन्मान देणे हे या काळाची गरज आहे.

विदेशांप्रमाणेच भारतात व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीच्या अगदी विरुद्ध असला तरी तरुण वर्गाचा हा दिवस अगदी लोकप्रिय असल्याचे सर्वत्र पहावयास मिळते.

हे देखील वाचा : Maharashtra Gov Important Websites: महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *