नमस्कार मित्रानो, खूप लोकांचा प्रश्न आहे कि नवीन CSC VLE ID कसा मिळवावा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे व कुठे करावे? तसेच त्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, सीएससी मार्फत आपण कोणत्या सुविधा देऊ शकतो आणि CSC VLE ID ऑनलाईन रजिस्ट्रेशनची (Maha E Seva Kendra Online Registration) संपूर्ण प्रक्रिया कशी असते.तसेच CSC मार्फत किती पैसे कमवू शकतो, चला तर आपण जाणून घेवूया महा ई-सेवा केंद्र (CSC) बद्दल सविस्तर माहिती.
What is a Maha e-Seva Kendra महा ई-सेवा केंद्र (CSC) म्हणजे काय?
सीएससी केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर होय. केंद्र सरकारने तयार केलेल्या नॅशनल ई-गव्हर्नन्स योजनेंतर्गत,सामान्य सेवा केंद्र योजना(CSC),ज्याला महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्र किंवा डिजिटल सेवा केंद्र ,आपले सरकार सेवा केंद्र,ऑनलाईन सुविधा केंद्र,जन सुविधा केंद्र म्हणून ओळखले जाते.
संपूर्ण महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्रे स्थापित केले गेले आहेत. विविध सरकारी उपक्रमांचा नागरिकांना सहज लाभ मिळवून देण्यासाठी अधिकृत खाजगी व्यक्तींद्वारे खाजगी पद्धतीने हे आपले सरकार केंद्र चालवले जाते.
सीएससी (CSC) चा फुल फॉर्म – CSC Full Form in Marathi-
CSC – Common Service Center सीएससी मराठी अर्थ – आपले सरकार सेवा केंद्र.
सीएससी केंद्राचे कार्य :
CSC Service Works: CSC च्या माध्यमातून आपण खूप साऱ्या सेवा देऊ शकतो. आधार कार्ड, PAN कार्ड, विविध योजना, बँकिंग, शेतकरी योजना, आवास योजना, आयुष्मान भारत योजना, मतदान कार्ड सेवा, आरोग्य सेवा, इन्शुरन्स, कौशल्य, शैक्षणिक सेवा, मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणा,पासपोर्ट,कोणत्याही प्रकारचा विमा, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, ई-जिल्हा सेवा प्रदान करणे, देयक प्रदान इ. अशा अनेक सुविधा आपण सीएससी केंद्राच्या माध्यमातून देऊ शकतो.
सीएससी केंद्र उघडून किती पैसे कमवू शकता?
How much money you can earn by opening a CSC center: नवीन CSC केंद्र उघडून तुम्ही अधिकचे पैसे कमवू शकता. तुम्ही दरमहा १०००० ते १५००० रुपये कमवू शकता. किंवा त्यापेक्षा अधिक पैसे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही दर महिन्याला जितका जास्त फॉर्म भराल तितके जास्त कमिशन तुम्हाला मिळेल, जे तुम्ही csc.gov.in वर जाऊन तुमचा तपशील पाहू शकता. आणि तुम्ही हे पैसे तुमच्या बँक खात्यात देखील ट्रान्सफर करू शकता.
महा ई-सेवा केंद्र सुरु करण्यासाठी पात्रता निकष?
What are the eligibility criteria for start maha eseva kendra: अशा प्रकारे मिळवा NEW CSC VLE Login ID –
सरकारी वेबसाइटनुसार,गाव पातळीवरील उद्योजक (VLE) म्हणून CSC किंवा महा ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
- वैध आधार क्रमांक/ कार्ड असणे आवश्यक आहे.
- VLE हा १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा गावातील तरुण असावा.
- VLE ने किमान शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी स्तराची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- व्हीएलई स्थानिक बोली वाचण्यात आणि लिहिण्यात जाणकार असावा आणि इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान देखील असावे.
- संगणक शैक्षणिक पात्रता संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तुमच्या सेंटरमध्ये आतील आणि बाहेरील दोन्ही फोटो असावेत.
- बँक खाते असणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर आवश्यक आहे.
- ई-मेल आय डी आवश्यक आहे.
- VLE प्रमुख होण्यासाठी त्याची/तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी अत्यंत समर्पकता आणि प्रामाणिकपणाची प्रवृत्ती असणे आवश्यक आहे.
CSC केंद्रासाठी नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला एक TEC EXAM FOR CSC ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये आपण पास झाल्यास त्याचे प्रमाणपत्र सुद्धा मिळते. त्या परीक्षासाठी लागणारा अभ्यासक्रम हा पोर्टल वरती तुम्हाला मिळेल. टीईसी प्रमाणपत्र (TEC Exam certificate) हे तुम्हाला सीएससी रजिस्ट्रेशन (CSC Registration) करताना लागते. म्हणून TEC EXAM हि महत्वाची आणि अनिर्वार्य आहे. TEC प्रमाणपत्र नसेल तर सीएससी रजिस्ट्रेशन करता येणार नाही.
महा ई-सेवा केंद्रा साठीची आवश्यक असणारी साधने
Tools needed in the maha e seva center: आपण महा ई सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज केला असेल, आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करत असाल तर आपणास खालील प्रमाणे आपल्या सेवा केंद्राचे सेट अप करावा लागतो.
- कॉम्पुटर किंवा Laptop
- Printer./प्रिंटर/कलर प्रिंटर
- वेब कॅमेरा/Web Camera
- बायोमेट्रिक डिव्हाईस
- इनव्हर्टर/UPS/बॅटरी बॅकअप
- किमान 120 GB हार्ड डिस्क ड्राइव्ह.
- किमान 512 MB RAM.
- CD/DVD ड्राइव्ह.
- परवानाकृत Windows XP-SP2 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमसह UPS PC.
- 4 तासांच्या बॅटरी बॅकअपसह/पोर्टेबल जेनसेट.
- स्कॅनर.
- इंटरनेटवर ब्राउझिंग आणि डेटा अपलोड करण्यासाठी किमान 128 kbps स्पीडसह इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
सीएससी रजिस्ट्रेशन कुठे करावे?
Where to do CSC Online Registration? Ans- https://register.csc.gov.in/register या साईट वरती आपण कॉमन सर्व्हिस सेंटर करिता म्हणजेच “CSC” करिता नोंदणी करू शकता.
TEC Certificate करिता https://cscentrepreneur.in/ या अधिकृत साईट वरूनच नोंदणी करावी? इतर कोणत्याही साईट वरती नोंदणी करू नका.
हे सुद्धा वाचा: महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी
What is the Procedure to Apply CSC: महा ई-सेवा केंद्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
CSC वर नोंदणी करण्यासाठी, फक्त खालील स्टेप अनुसरण करा.
१. http://register.csc.gov.in या URL ला भेट द्या
२. सर्वप्रथम तुम्हाला CSC VLE हा ऑप्शन निवडायचा आहे.
३. मुख्यपृष्ठावर प्रदर्शित होणार्या “लागू करण्यासाठी येथे क्लिक करा” बटणावर क्लिक करा.
४. त्यानंतर TEC रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र कमांक तसेच मोबाईल नंबर टाकून घ्यावा.
५. तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा, प्रमाणीकरण प्रकार निवडा आणि पुढे कॅप्चा मजकूर जोडा. “सबमिट” बटणावर क्लिक करा
६. आधार प्रमाणीकरणानंतर, तुमची आधार माहिती फॉर्मसह प्रदर्शित केली जाईल.
७. त्यामध्ये ई-मेल व मोबाईल नंबर पाहायला मिळेल. तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. Gender, लोकेशन इ. माहिती भरावी.
८. Authentication Type : OTP, FMR, IIR हे पर्याय दिसतील. त्यामधून आपण OTP/ओटीपी हा पर्याय निवडू शकता.
९. खालील कॅप्चा अक्षरे भरा आणि सबमिट/Submit करा. त्यानंतर generate otp वरती क्लिक करा.
१०. तुमच्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो टाकून Validate करा.
११. अर्जदाराचा फोटो अपलोड करावा लागेल.
१२. त्यानंतर शॉप/दुकानाचे नाव आणि पत्ता टाकायचे आहे.
१३. PAN कार्ड माहिती, बँकिंग माहिती भरावी आणि केवायसी कागदपत्रे अपलोड करा.
१४. सबमिट वरती क्लिक करा, आपले सीएससी रजिस्ट्रेशन यशस्वी होईल.
तुमच्या ई-मेल वरती एक रेफरन्स नंबर मिळेल. या नंबरवरून आपण अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.
पुढील काही दिवसांत आपल्या अर्जाची पडताळणी करून आपणास इमेल वर किवा फोनवर संबधित अधिकारी याजकडून अधिक माहिती दिली जाईल. तुमचा अर्ज फेटाळला गेल्यास तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.
नियम आणि अटी यामध्ये बदल असू शकतात अधिक माहितीसाठी जवळच्या महा ई सेवा केंद्रावर भेट द्या.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in
मित्रानो,आणखी काही शंका असल्यास कृपया येथे उपलब्ध वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची यादी पहा. (http://register.csc.gov.in/registerationFAQ) किंवा हेल्पडेस्क टीमशी टोल फ्री क्रमांक 1800 3000 3468 वर संपर्क साधा किंवा क्वेरी ईमेल करा. [email protected]
तसेच तुम्ही CSC डिजिटल सेवा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून किंवा ईमेल करून तुमची समस्या सोडवू शकता. CSC डिजिटल सेवा केंद्राचा टोल फ्री क्रमांक १८००१२१३४६८ आहे.
हे हि वाचा :2024 Marathi Festivals Holidays Calendar: २०२४ मधील सण उत्सव हॉलिडे मराठी कैलेंडर
धन्यवाद.
Je csc cenyer zaal he approove zalyavar kay karaychay tepan sanga .
I wish to start Maha r Seva centre
सर मला पण चालु करायचं आहे आमच्या गावात
Already i am doing this business and i have also my own shop but in that i dont possible to do pratinya patra and all. so i want licence and online key to start more things. please guide me for that.
sir mala e seva kendra chalu kariche ahe.plz mala information milu shkate ka.sir yachmadhe banks detail mhangey account no pan dayva lagtoa ka.sir plz inform me.8208283559
For Government jobs visit http://www.governmentvacancy.net
Maha e seva kendra suru karnyasathi konti exam dyavi lagel ka
I want to start maha e seva kendra what is procurement kindly info me 9923870850
Maha e seva kendra vishayi adik mahiti sathi http://www.mahacsc.com la bhet dya
Sir I have csc id so what I can maha e seva kendra,
sir mala e seva kendra chalu kariche ahe.plz mala information milu shkate ka
Tumi adhik mahitisathi http://www.mahacsc.com la bhet deu shakata
Visitor Rating: 5 Stars
I want to open maha esewa kendra.is it permission or not?
Maha E Seva Kendra Aani CSC Center !kch aahe ka
Sir I have csc id so what I can maha e seva kendra
sir mala e seva kendra chalu kariche ahe.plz mala information milu shkate ka.sir yachmadhe banks detail mhange account no pan dayva lagtoa ka.sir plz inform me.
Visitor Rating: 5 Stars
uttam mahiti dhanyavad.