Shivrajyabhishek Sohala Date: शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून ला किल्ले रायगड येथे साजरा होत आहे

छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ मोठ्या थाटात होणार साजरा वाचा सविस्तर माहिती

Reshma
By Reshma
3 Min Read
shivrajyabhishek sohala date

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा वार गुरुवार, दिनांक 6 जून २०२४ (Shivrajyabhishek Sohala Date) रोजी साजरा होत आहे. हा खास ऐतिहासिक दिवस आहे, जो राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि आराध्य दैवत मानले जातात.

शिवराज्याभिषेक सोहळा

Shivrajyabhishek Sohala: ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यामुळे भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात.

शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या आनंदाने, अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक सोहळा हा शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याला आकार देण्याच्या मार्गाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत आव्हानात्मक काळात राजा म्हणून पदभार स्वीकारला होता.

राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळा २०२४ तारीख २० जून (तिथीनुसार) आहे. हिंदू तिथीनुसार महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी (मराठी दिनदर्शिकेनुसार शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी) दरम्यान १३ व्या दिवशी झाला.

शिवराज्याभिषेक सोहळा (shivrajyabhishek sohala in marathi) हा पालखी, मिरवणूक आणि पूजेसह साजरा केला जातो, शिवकालीन युद्धकला, मलखांब आणि इतर क्रीडासह रायगड किल्ल्यावर प्रदर्शन आयोजित केले जाते.

महादरवाजा पूजन, गड पूजन, धार तलवारीची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, तसेच वारकरी संप्रदायाकडून भजन किर्तनं होतात.

तर रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन, ध्वजारोहण, शाहिरी पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं वाद्यांच्या गजरात आगमण होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक, तसेच जगदीश्वराच्या दर्शनासाठी महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, जगदीश्वर दर्शन आणि महाराजांच्या समाधीला अभिवादन इ. साधारणत: याप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याची रुपरेषा असते.

शिवराज्याभिषेक सोहळा कोट्स

shivrajyabhishek sohala quotes in marathi:

१. एक होऊनी करु उत्सव शिवराज्याभिषेक दिनाचा, एक विचाराने चालवू वारसा अवघ्या महाराष्ट्राचा. शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा. जय शिवराय !

shivrajyabhishek sohala quotes in marathi
Shivrajyabhishek Sohala quotes in Marathi

२. लखलखत होती शिवबांची तलवार, महाराष्ट्राला घडविणारे ते खरे शिल्पकार..! शुभ राज्याभिषेक सोहळा !

shivrajyabhishek sohala images in marathi
Shivrajyabhishek Sohala images in Marathi

३. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

shivrajyabhishek sohala whishes in marathi
shivrajyabhishek sohala whishes in marathi

४. मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा..माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

shivrajyabhishek sohala shubhechhya banner
shivrajyabhishek sohala shubhechhya banner

५. स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

6 june shivrajyabhishek sohala
6 june shivrajyabhishek sohala

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा ऐतिहासिक दिवस सर्वांच्या स्मरणात असून, खास आठवणींना उजाळा देण्यासाठी या शुभेच्छा आपण एकमेकांना देवू , स्टेटस ठेवू आणि शेअर करु.

जय शिवराय !

हे देखील वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जयंती माहिती महत्व इतिहास शुभेच्छा स्टेट्स

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *