Shark Tank Season 3 India: शार्क टँक इंडिया सिझन ३ मध्ये “ हे ” आहेत नवीन शार्क, शो कधी होणार सुरु!

Shark Tank Season 3 India start date : जाणून घ्या शार्क टँक सिझन ३ मध्ये कोण आहेत नवीन शार्क? हा शो कुठे, कधी सुरु होणार आणि काय आहे या सिझन चे वैशिष्ट्ये !

By Ajit
5 Min Read
shark tank India season 3 release date

शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचा नवीन ३ रा सीझन लवकरच SonyLIV वर स्ट्रिमिंग सुरू होईल. निर्मात्यांनी नुकताच या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमो सोबतच शोच्या रिलीज डेटचे ही अनावरण करण्यात आले.

शार्क टँक इंडिया सिझन ३ कधी सुरु होणार?

When will Shark Tank Season 3 start? नुकताच प्रसारित केलेल्या शार्क टँक इंडिया प्रोमो मध्ये ३ रा सिझन हा २२ जानेवारी २०२४ (shark tank season 3 India release date) पासून सोनी लिव या चेनल आणि ओटीटी वर सुद्धा प्रसारण सुरू होईल. सोनी टीव्हीवर रात्री ९ – १० दरम्यान हा शो टेलीकास्ट होतो त्या नंतर SonyLiv OTT वर थोड्याच वेळात उपलब्ध होतो. आपण जर सोनी लिव प्रीमियम युजर असाल तर आपण कमीत कमी किंवा विना जाहिरात हा शो पाहू शकता. नव्याने व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या किंवा जुने व्यवसाय वृद्धी साठी विशेषत: फंडिंग मिळवनाऱ्या स्टार्ट अप साठी हा शो गेम चेंजर ठरू शकतो.

भक्ती विशेष : हे पाहा – Dattatreya Jayanti 2023: दत्त जयंती मराठी माहिती वेळ,पूजा विधी,शुभेच्छा स्टेटस

शार्क टँक इंडिया सिझन ३ प्रोमो

Shark Tank India Season 3 Promo Video:  शार्क टँक इंडिया सीझन 3 चा प्रोमो एका तरुणाने आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून त्याचा स्टार्ट-अप प्रवास सुरू करण्यापासून सुरू होतो. त्याचे बॉस त्याला स्टार्ट-अपमध्ये काम करण्याचे तोटे सांगून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार करतो. प्रोमोचा शेवट या तरुणाने त्याच्या सह-संस्थापकासह शार्क टँक इंडियाच्या न्यायाधीशांसमोर त्याच्या व्यवसायाची कल्पना मांडल्याने होतो.

“#ThankYouBoss शार्क टँक इंडिया सीझन 3, 22 जानेवारीपासून Sony LIV वर स्ट्रीम होत आहे” या कॅप्शनसह प्रोमो शेअर करण्यात आला आहे .

शार्क टँक इंडिया सीझन ३ न्यायाधीश पॅनेल

Shark tank season 3 India judges: राहुल दुआ यांनी होस्ट केलेल्या, शार्क टँक इंडिया शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये अमन गुप्ता (boAt चे सह-संस्थापक आणि CMO), अमित जैन ( CarDekho Group, InsuranceDekho.com चे सीईओ आणि सह-संस्थापक), अनुपम मित्तल ( शादी डॉट कॉम चे संस्थापक आणि सीईओ पीपल ग्रुप ) हे असतील. त्याचबरोबर नमिता थापर (Emcure Pharmaceuticals LTD च्या कार्यकारी संचालक), आणि विनीता सिंग (SUGAR Cosmetics चे सह-संस्थापक आणि CEO), आणि Peyush बन्सल (Lenskart.com चे सह-संस्थापक आणि CEO) हे देखील न्यायाधीश पॅनेल वर आहेत.

पहिल्या सिझन मध्ये भारत पे चे माजी संस्थापक Ashneer Grover हे दोगलापण या डायलॉग ने खूपच प्रसिद्ध झाले होते तसेच त्यांनी Doglapan: The Hard Truth about Life and Start-Ups हे पुस्तक प्रकाशित केले आहे, आपण ते ऑनलाईन खरेदी करू शकता.

अश्नीर ग्रोवर अतिशय लोकप्रिय होऊन देखील ते दुसऱ्या सिझन मध्ये सहभागी झाले नव्हते आणि आता तिसऱ्या ही सिझन मध्ये त्यांचा सहभाग अजून तरी दाखविला नाही. कदाचित पुढे सरप्राईज म्हणून ते येवू शकतात. शार्क टँक इंडिया सीझन मध्ये त्यांचा समावेश आणि पुनरागमनाची चाहत्यामध्ये खूपच उत्सुकता आहे.

कोण आहेत सीझन ३ मधील नवीन शार्क ?

Who is the new judges on Shark Tank India Season 3? : शार्क टँक इंडिया शो च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझन मध्ये ठराविक एपिसोड नंतर काही शार्क बदलले जातात. प्रत्येक वेळी नवीन शार्क कोण असेल आणि त्याचा बिझनेस ओपिनियन कसा राहील यांकडे सर्वाचे लक्ष असते. यावेळी काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

या हंगामात रितेश अग्रवाल (OYO Room ओयो रूम्सचे संस्थापक आणि सीईओ), दीपंदर गोयल (Zomato झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ), अझहर इक्‍बाल (Inshorts इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ), राधिका गुप्ता (Edelweiss Mutual Fund एडलवाईस म्युच्युअल फंडचे एमडी आणि सीईओ) यांचा समावेश आहे. तसेच वरुण दुआ (ACKO चे संस्थापक आणि CEO) आणि रॉनी स्क्रूवाला (UpGrad चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष) हे देखील या सिझन मध्ये नवीन शार्क म्हणून दिसतील.

शार्क टँक इंडिया सीझन इतिहास

शार्क टँक इंडिया शो पहिल्यांदा डिसेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात आला आणि टेलिव्हिजनवर यशस्वी झाला. यामुळे स्टार्ट-अप्स आणि उद्योजकता याविषयी घरोघरी जागरुकता आणि व्यवसायिक संवाद नियमितपणे सुरू झाला. त्या नंतर २०२२ मध्ये प्रसारित झालेल्या शोचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Shark Tank Season Overview: थोडक्यात शार्क टँक इंडिया सिझन चा सारांश –

SeasonEpisodesFirst airedLast airedHosted by
13520 December 20214 February 2022Ranvijay Singh
2502 January 202310 March 2023Rahul Dua
3TBA22 January 2024TBARahul Dua

आपणही जर शार्क टँक इंडिया शो चे चाहते असाल तर या आधील सिझन चे सर्व एपिसोड नक्कीच पहिले असणार. नवीन ३ रा सिझन देखील सर्वांच्या पसंतीस उतरेल आणि यातून नवीन व्यवसायिक संधी व व्यवसाय विस्तार याविषयी अधिक माहिती मिळणार आहे. तर जरुर पाहा शार्क टँक इंडिया सिझन ३.

धन्यवाद.

हे देखील पाहा : Merry Christmas 2023: ख्रिसमस डे २५ डिसेंबरलाच का साजरा करतात?

Share This Article
By Ajit
Follow:
जय शिवराय. वेब डिझायनर आणि ब्लॉग कंटेंट क्रीयटर, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग मधील अनुभव. समाज माध्यमांतील विविध विषयांवर उपयुक्त प्रगल्भ लिखाण काम करणे.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version