दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला ‘रक्षाबंधन’ सण साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) कधी आहे, मुहूर्त, विधी, महत्व तसेच रक्षाबंधनाबाबत पौराणिक मान्यता, कथा इ. माहिती आपण पुढे जाणून घेऊयात.
रक्षाबंधन
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन भारतीय धार्मिक संस्कृतीनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणालाच ‘नारळी पोर्णिमा’ असेही म्हणतात. रक्षाबंधन म्हणजेच राखी पोर्णिमा होय.
रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्याकडून रक्षणाचे वचन मागतात.
बहिणी देवाकडे भावासाठी दिर्घ आयुष्य, आरोग्य, सुख, शांती, संपत्ती मिळो देत अशी प्रार्थना करत असतात. हा सण भाऊ-बहिणीतील नाते घट्ट करतो. तसेच भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि विश्वासही दृढ करतो.
रक्षाबंधन हा राजस्थानचा प्रमुख सण आहे. राखी बांधणे या विधीस ‘पवित्रारोपण’ असे म्हणतात. पुरातन काळात स्रीया असुरक्षित होत्या, तेव्हा त्या स्रिया तिचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानत असत.
हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. आपल्या भावाने आपले सदैव रक्षण करावे, त्याचीही भरभराट व्हावी, हीच या मागची मंगल मनोकामना होय.
पुरातन काळात कापसाच्या सुताच्या राख्या असायच्या. त्यावेळी लोक कापसाच्या नवसुती करून तिला बारा किंवा चौवीस गाठी मारायचे व ते पोवते (राखी) देवांना आवाहन करून आधी देवास वाहून नंतर तसीच पोवती (Rakhi) कुटुंबातील व्यक्तींना बांधली जात.
रक्षाबंधन मुहर्त
Raksha Bandhan 2024 Date and Time: यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी वार सोमवार दि. १९ ऑगस्ट (Raksha Bandhan Date 2024) रोजी पहाटे ३.०४ वाजता सुरू होईल आणि १९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता (Raksha Bandhan 2024 Muhurat time) समाप्त होईल.
यावर्षी सोमवारी, दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १.३० ते रात्री ९.०७ पर्यंत असेल. श्रावण शुद्ध पोर्णिमेस राखी (Rakhi) बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.
रक्षाबंधनाचे महत्व
Raksha Bandhan Significance: रक्षाबंधन हे भावंडांमधील संरक्षणात्मक बंधनाचे प्रतीक आहे. बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात ते प्रेम आणि संरक्षणाचे चिन्ह म्हणून.
त्या बदल्यात, भाऊ त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि अनेकदा भेटवस्तू किंवा पैसे देतात. हा सण (Rakhi Festival) कौटुंबिक संबंध मजबूत करतो आणि एकजुटीची, बांधिलकीची भावना यातून दिसून येते.
भद्र काळात राखी बांधली जात नाही
Rakhi is not tied during Bhadra Period: राखी पोर्णिमा या दिवशी भद्रकाळाची छाया राहणार आहे. म्हणजेच पौर्णिमेची सुरुवातच भद्रकाळात होणार आहे. याच दिवशी भद्रकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे. भद्र काळात राखी बांधली जात नाही.
भद्र काळात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही. मान्यतेनुसार भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. भद्र काळात राखी बांधल्याने भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा येतो, असे म्हटले जाते.
तसेच भद्र काळात जिथे शुभ कार्य, यज्ञ आणि विधी केले जातात तिथे समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे भावा-बहिणीने शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी.
रक्षाबंधनाबाबत पौराणिक कथा
Raksha Bandhan Mythology: रक्षाबंधनाबाबत विविध दाखले आहेत. एका प्रचलित आख्यायिकेनुसार, जेव्हा महाभारतात भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले, तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडला आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तो बोटावर बांधला.
त्या काळात द्रौपदीने कृष्णाला अशी राखी बांधली होती. आणि भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. आणि पुढे श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक अडचणीत साथ दिली.
हे सुद्धा: आता माझा लाडका भाऊ योजना सुद्धा आली, तरुणांना महिन्याला मिळणार रु. १०,०००
रक्षाबंधन शुभेच्छा
Happy Raksha Bandhan 2024 Wishes in Marathi
१.राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे
प्रेम,विश्वासाचे,जबाबदारीचे
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे,
सदैव बहिण भावाची साथ सोबत राहू दे..
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!!
२.आठवण रक्षाबंधनाची
तुझ्या मनात सदैव राहो.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,
अशीच आयुष्यभर राहो..
राखी पौर्णिमेच्या गोड गोड शुभेच्छा..!!
३.राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावाच्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे..
हैप्पी रक्षाबंधन..!!
४. रक्षाबंधनाच्या निमित्ताने
आपल्या नात्याची गोडी वाढवूया.
प्रेम आणि विश्वासाने बांधलेला हा
धागा सदैव आयुष्यभर जपुया..
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
५. रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्यासाठी माझी प्रार्थना दादा
भाऊ-बहिणीच्या या नात्यात,
सुख, समृद्धी आणि स्नेह
नेहमी दरवळत असावा..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
मित्रांनो आपण वर काही खास रक्षाबंधन शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Shubhechya Marathi) दिले आहेत. तुम्ही येत्या रक्षाबंधनाला या शुभेच्छा तुमच्या भावंडासोबत शेअर करा आणि रक्षाबंधन २०२४ (Raksha Bandhan 2024) या गोड सणाचा आनंद घ्या.
धन्यवाद!
हे देखील वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना प्रतीमहिना मिळणार १५०० रुपये