भारताचे स्थान :-
भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.
भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत
भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.
भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीची भू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-
संबंधित देश सीमेचे नाव लांबी संबंधित देश लांबी
चीन मॅकमोहन रेषा ४२५०कि.मी. नेपाल १०५० कि.मी.
पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी. भूतान ०४७५ कि.मी.
बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी. अफगाणिस्थान ————
ब्रम्हदेश ———— १४५०कि.मी. ———— ————
भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.
भारताची प्राकृतीक रचना
भारताचे प्राकृतिक दृष्ट्या खालील पाच भाग पडतात.
१) उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश
२) उत्तरेकडील मैदाने
३) द्विकल्पीय पठार
४) किनारी मैदाने
५) भारतीय बेटे
भारताचा १०.७% भाग पर्वतीय, १८.६% भाग डोंगराळ, २७.७% पठारी व ४३% भाग मैदानी प्रदेशाचा आहे.
महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !