PM Kisan Yojana म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता नुकताच जाहीर झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या (Farmers DBT ) खात्यात दिनांक १८ जून रोजी जमा होणार आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana complete information in Marathi) मित्रांनो आपल्या खात्यात हप्ता जमा होईलच पण अजूनही काही महत्वाची माहिती पुढे आपण पाहूयात.
पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?
What is PM Kisan Samman Nidhi Yojana? दरवर्षी शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार व आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने भारतामध्ये केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना कधी सुरु झाली?
When was PM Kisan Samman Nidhi Yojana started? पीएम किसान सन्मान निधी योजना ही १ फेब्रुवारी २०१९ रोजी पियुष गोयल यांनी केंद्रीय अंतरिम अहवाल सादर करताना जाहीर केली. आणि २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिला हप्ता वितरीत केला गेला.
पीएम किसान सन्मान निधी योजना उद्दिष्ट्ये काय आहे?
What are the objectives of PM Kisan Samman Nidhi Yojana? केंद्र सरकारच्या कृषी विभाग अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली गेली. शेतकरी राजा केंद्रस्थानी ठेवून या योजनेची रचना केली आहे. पुढीलप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.
- देशभरातील सर्व लहान आणि अल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मूलभूत आर्थिक सहाय्य प्रदान करणे, परंतु यासाठी अट अशी आहे की ती शेतीयोग्य जमीन असावी.
- उत्तम कृषी पीक, जास्तीत जास्त पीक उत्पादन आणि कृषी संबंधित उपक्रमांशी उत्पादनांची खरेदी सुनिश्चित करण्यासाठी विविध कृषी गुंतवणूकींच्या खरेदीमध्ये अल्प उत्पन्न शेतकर्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे साठी हातभार लागावा.
- देशातील ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेस चालना देणे.
- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने केलेले प्रयत्न पार पाडणे.
साधारण २०१९ ते २०२२ साठी सुरु केलेली पीयम किसान योजना ही २०२४ मध्ये देखील सुरु आहे, आणि अजून पुढेही काही वर्षे ही योजना चालू राहील.
पीएम किसान सन्मान निधी योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा?
How to Apply PM Kisan Samman Nidhi Yojana Online? पंतप्रधान किसान निधी योजना लाभ मिळवण्यासाठी साठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी अर्ज करु शकतात, हे अर्ज करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी जवळच्या नागरी सुविधा सेवा केंद्रे ( सीएससी ) ला भेट देऊ शकतात. तेथे त्यांना अर्ज भरावा लागेल, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माफक फी भरावी लागेल.
- या योजनेंतर्गत नोंदणी करणारे गावचे अधिकारी, महसूल अधिकारी किंवा इतर सरकारी कार्यालयांकडे जाऊन अर्ज करू शकतात.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना यांच्या अधिकृत पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया स्वतः पूर्ण करू शकतात.
- त्यांना अर्जामध्ये प्रविष्ट करावयाचे अनिवार्य तपशील म्हणजे नाव, संपर्क तपशील, वय, लिंग, श्रेणी, बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक इ.
या अगोदर ज्या शेतकर्यांच्या खात्यात आधीचे हप्ते जमा झाले आहेत, त्यांना येणारा 17 वा हप्ता देखील मिळणार आहे. परंतु जर नवीन नोंदणी केली असेल आणि ई केवायसी झाली नसेल, तर अशा काही त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं 2 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकतं.
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता केंद्र सरकार लवकरच पात्र शेतकर्यांना जारी करेल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तसेच आधार कार्ड बँक म्यापिंग करणं अनिवार्य आहे.
हे सुद्धा पाहा : Pradhan Mantri Suryoday Yojana 2024: सोलर रूफटॉप प्रधानमंत्री सूर्योदय योजना संपूर्ण माहिती
पीएम किसान सन्मान निधी योजना ई केवायसी कसं करावं?
How to do PM Kisan Samman Nidhi Yojana e KYC? – ई केवायसी करणे बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, नाहीतर तुम्हाला पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.
ई केवायसी करण्यासाठी पुढील स्टेप्स अनुसार प्रोसेस करा.
- पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- सर्च पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
- मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली.
पीएम किसान योजना लाभार्थी पात्रता स्टेटस ऑनलाईन कसे तपासावे?
How to Check PM Kisan Yojana Beneficiary Eligibility Status Online? ज्या शेतकर्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असतील त्यांनी ऑनलाईन त्यांच्या पात्र – अपात्रते विषयी सद्यस्थिती तपासून घ्यावी. त्यासाठी https://pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx या लिंक वर जावून त्यामध्ये आधार कार्ड नंबर सबमिट करून कॅप्चा भरावा.
त्यानंतर वरीलप्रमाणे आपले स्टेटस दिसेल त्यामध्ये (Reason for Rejection) हा महत्वाचा पर्याय पाहा. जर येथे काही कारण दिसत असेल तर त्यानुसार आपण तालुका कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट देवून, ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून घ्याव्यात. तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
हे देखील पाहा : आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती
PM Kisan Yojana: Know Your Status
(pm kisan status check 2024) पियम किसान योजना सर्व पात्र लाभार्थी यांनी त्यांचे स्टेटस https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx या लिंक वर जावून फार्मर आयडी सबमिट करून चेक करा. त्यामध्ये ELIGIBILITY STATUS ऑप्शन ला Land Seeding / e-Kyc Status / Aadhar Bank Account Seeding Status – ✅ असे ग्रीन टिक मार्क दिसले पाहिजे तरच शेतकर्यांना या योजनेचा हप्ता जमा होईल.
पीएम किसान सन्मान निधी योजना १७ वा हप्ता कधी मिळणार?
When will the 17 th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana be received? Official announcement – Honourable Prime Minister will release the 17 th Installment of PM KISAN scheme on 18th June 2024. पीएम किसान सम्मान निधि योजनेचा १७ वा हप्ता १८ जून २०२४ रोजी डीबीटी लिंक आणि केवायसी पुर्ण केलेल्या पात्र शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सुरुवातीला १६ आणि १७ वा हप्ता एकत्र मिळेल अशा अफवा येत होत्या, पण फक्त १६ वाच हप्ता मिळाला होता.
पीएम किसान सन्मान निधी योजना सर्व वितरीत हप्ते रेकॉर्ड्स
PM Kisan Samman Nidhi Yojana records all disbursed installments: नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जाहीर झाला आहे. पुढे आपण अगदी सुरुवातीस वितरीत झालेला पहिला हप्ता ते येणारा १७ वा हप्ता इथ पर्यंत चे सर्व हप्ते केव्हा जाहीर झाले त्याची डिटेल माहिती पाहूया. म्हणजे आपणास या योजनेची व्याप्ती लक्षात येईल.
पीएम किसान योजना हप्ता | हप्ता वितरण तारीख |
---|---|
पहिला हप्ता | २४ फेब्रुवारी २०१९ |
दुसरा हप्ता | २ एप्रिल २०१९ |
तिसरा हप्ता | ऑगस्ट २०१९ |
चौथा हप्ता | जानेवारी २०२० |
पाचवा हप्ता | १ एप्रिल २०२० |
सहावा हप्ता | १ ऑगस्ट २०२० |
सातवा हप्ता | २५ डिसेंबर २०२० |
आठवा हप्ता | १८ मे २०२१ |
नववा हप्ता | ९ ऑगस्ट २०२१ |
दहावा हप्ता | १ जानेवारी २०२२ |
अकरावा हप्ता | ३१ मे २०२२ |
बारावा हप्ता | १७ ऑक्टोबर २०२२ |
तेरावा हप्ता | २७ फेब्रुवारी २०२३ |
चौदावा हप्ता | २७ जुलै २०२३ |
पंधरावा हप्ता | १५ नोव्हेंबर २०२३ |
सोळावा हप्ता | २८ फेब्रुवारी २०२४ |
सतरावा हप्ता | १८ जून २०२४ |
पीएम किसान सन्मान निधी योजना पुढील १८ वा हप्ता कधी?
pm kisan next installment date 2024 – पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकार तर्फे वार्षिक ६००० रुपये शेतकर्यांना देणारी आहे. म्हणजेच दर ४ महिन्यांनी २०००/- रुपये असे वार्षिक तीन वेळा, या पद्धतीने दिले जातात.
या योजनेच्या लाभार्थ्यामध्ये पुढे कधी हप्ता मिळणार या विषयी उत्सुकता असते. वर्षभर या योजने विषयी वेगवेगळ्या अफवा चर्चेत असतात. जसे की ६००० रुपये च्या जागी १२००० मिळणार, एकत्र २ हप्ते मिळणार आणि कोणत्या तारखांना हे हप्ते दिले जाणार इत्यादी.
शेतकरी बंधूनी आणि या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, आणि https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला च भेट देवून अधिक माहिती घ्यावी.
हे देखील पाहा : Pradhan Mantri Pik Vima Scheme: आता १ रुपयात भरा पीक विमा अर्ज- कसा करायचा अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती
पीएम किसान अधिकृत ऐप वेबसाईट हेल्पलाईन नंबर
(PM Kisan Official App, Website Helpline Number & pradhan mantri kisan samman nidhi (pm-kisan) scheme – operational guidelines pdf): या योजनेची घोषणा झाल्यापासून त्यात वेळोवेळी झालेले बदल आणि ही योजना पुढे कशी राबवावी या विषयी अधिकृत माहिती पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रा प्रमाणेच इतरही राज्यांत राबवली जाते. सर्व योजना धारकांना तांत्रिकदृष्ट्या जोडण्यासाठी सरकारने अधिकृत वेब साईट, ऐप व हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत, त्याची माहिती पुढे पाहा.
Sr.No | Type | Link |
---|---|---|
1) | Website | https://pmkisan.gov.in/ |
2) | Android App | Click Here 🔗 |
3) | Helpline Number | ☎️ 155261 / 011-24300606 |
4) | Operational Guidelines PDF | Click Here 📒 |
पीएम किसान सन्मान निधी योजना तुमचे नाव तपासा
आपण जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आपण पात्र असाल तर आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का? हे आपण https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx ऑनलाइन वेबसाईट वर देखील पाहू शकता. पुढील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे जिल्हा तालुका ब्लॉक गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट वर क्लिक करा. पुढे तुम्हाला यादी दिसेल त्यामध्ये तुमचे नाव तपासू शकता.
अजूनही आपण पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी नसाल, आणि या योजनेचा लाभ घेवू इच्छित असाल, तर वर दिलेल्या माहिती चा वापर करून अर्ज आणि आवशक्य कागदपत्रे पूर्तता करून लाभ घ्यावा.
हे देखील वाचा : महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी
आम्ही आपणास पीएम किसान सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती मराठी मध्ये सविस्तर पद्धतीने दिली आहे. या योजनेविषयी नवीन अपडेट्स साठी आपण वेळोवेळी ई जनसेवा वेबसाईटला भेट द्यावी. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्र नातेवाईक Whatsapp Group मध्ये शेअर करावी.
धन्यवाद. ( आपलाच शेतकरी मित्र )