Piyush Ranade Suruchi Adarkar Marriage: पियुष रानडे आणि सुरुची आडारकर गुपचूप लग्नबंधनात अडकले

'का रे दुरावा' फेम झी मराठी वरील मालिकेतील अभिनेत्री सुरुची आडारकर हिचा विवाह अभिनेता पियुष रानडे सोबत नुकताच झाला आहे. अधिक जाणून घेवूया या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार जोडी विषयी.

By Reshma
4 Min Read
Piyush Ranade Suruchi Adarkar Marriage: पियुष रानडे आणि सुरुची आडारकर विवाह

मनोरंजन विश्वात लग्न सराई सुरु झाली आहे. एका पाठोपाठ एक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. झी मराठी वाहिनी वरील ‘का रे दुरावा’ आणि अंजली मालिकेतील सुरुची आडारकर हिने अभिनेता पियुष रानडे याच्या सोबत पुणे येथे दिनांक ०६ डिसेंबर २०२३ ला मोजक्या नातेवाईकांसह आणि मित्र मंडळीसह गुपचूप लग्नगाठ बांधली आणि हि गोड बातमी तिच्या इंस्टाग्राम वरून आपल्या चाहत्यांना दिली आहे. चला तर मग बघूया, या आपल्या आवडत्या कलाकार जोडीविषयी आणि त्यांच्या फिल्मी कारकीर्द विषयी.

अभिनेता पियुष रानडे

Piyush Ranade
जन्म२८ मार्च १९८३ (वय ४०) नागपूर
व्यवसायफिल्म इंडस्ट्री (अभिनेता)
करियर सुरवात२००५ पासून
पहिली पत्नीशाल्मले टोले ( २०१० )
दुसरी पत्नीमयुरी वाघ ( २०१६ )
तिसरी पत्नीसुरुची आडारकर ( २०२३ )
टीव्ही मालिकाअस्मिता २०१४-२०१६ झी मराठी - अंजली २०१८ झी युवा - काव्यांजली - सखी सावली २०२३ कलर्स मराठी
गाजलेले चित्रपटश्रीमंत दामोदर पंत २०१३ - चुक भूल द्यावी घ्यावी २०१४ - त्रंबक २०२१ - बाई पण भारी देवा २०२३
फेसबुकMeetPiyushRanade
इंस्टाग्राम MeetPiyushRanade

पियुष रानडे पहिली पत्नी शाल्मली टोले

अभिनेता पियुष रानडे याने पहिल्यांदा फॅशन स्टायलिस्ट शाल्मली टोले हिच्याशी लग्न केले होते आणि काही वर्षांनी दोघेही वेगळे झाले. (piyush ranade first wife shalmalee tolye)

shalmalee tolye

पियुष रानडे दुसरी पत्नी मयुरी वाघ

‘अस्मिता’ मालिका फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि याच मालिकेत तिचा जोडीदार दाखवण्यात आलेला अभिनेता अर्थात पियुष रानडे हे फेब्रुवारी  २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत बडोद्यात त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडला.

‘ अस्मिता ‘ मालिकेत काम करता करता मयुरी आणि पियुषची ओळख झाली. हळूहळू त्यांची छान मैत्री झाली आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या नंतर पुन्हा दुसऱ्यांदा पियुष रानडे याने मयुरी वाघ हिच्या बरोबर विवाह केला. (piyush ranade second wife mayuri wagh)

piyush ranade second wife mayuri wagh

नुकतीच पियुष रानडे याने तिसऱ्यांदा सुरुची आडारकर सोबत लग्न गाठ बांधली आहे. ( piyush ranade third wife suruchi adarkar )

पियुष रानडे तिसरी पत्नी सुरुची आडारकर

पियुष आणि सुरुची यांनी ‘अंजली’ या टीव्ही वरील मालिकेत एकत्र काम केले आहे. दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील आणि तितकेच लोकप्रिय कलाकार आहेत. पियुष आणि सुरुचीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांवर नवीन विवाह निमित्त अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Suruchi Adarkar

‘का रे दुरावा’, ‘अंजली’ अशा अनेक मराठी मालिकांतून सुरुची हिने प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. ‘का रे दुरावा’ या मालिकेतील तिची आणि अभिनेता सुयश टिळक यांची जोडी प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांना ही रील जोडी आता रिअल जोडी व्हावी असे वाटत होते. परंतु सुयश आणि सुरुची ने वेगवेगळे साथीदार निवडले. खऱ्या अर्थाने सुरुची चा दुरावा आता संपला आहे.

जन्म25 एप्रिल 1988 (वय 35 वर्षे), ठाणे
व्यवसायफिल्म इंडस्ट्री (अभिनेत्री)
करियर सुरवात२००६ पासून
पहिला पतीपियुष रानडे ( २०२३ )
पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी झी मराठी पुरस्कार (2015)
टीव्ही शोचला हवा येवू द्या लेडीज जिंदाबाद (२०२०-२१ )
गाजलेल्या टीव्ही मालिकापहचान (२००६) - का रे दुरावा (२०१४ - २०१६) - अंजली (२०१७ -२०१८)
गाजलेले चित्रपटतथास्तु - नारबाची वाडी - बाई पण भारी देवा
फेसबुकOfficialSuruchiAdarkar
इंस्टाग्रामsuruchiadarkar

सुरूचीनं आपल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली, ” मी आज खूप आनंदी आहे. तुम्हाला सांगू शकत नाही की मी आता किती आनंदी आहे. ही भावना खूप चमत्कारिक आणि वास्तविक आहे. मला फार आनंद झाला आहे की मी सर्वात सुंदर माणसाशी लग्न केले आहे. तो मनानं खूपच सुंदर माणूस आहे. तो भावनिक आहे सोबतच काळजी घेणारा देखील आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान आणि नशीबवान मानते.” अशी भावना तिनं व्यक्त केली.

मित्रानो, आजच्या धावपळीच्या युगात योग्य वयात मनासारखा जोडीदार मिळणे किवां मुला-मुलींची लग्न जमणे फार कठीण होऊन बसले आहे. परंतु फिल्मी दुनियेमध्ये आणि अन्य जगतातही मोठ मोठ्या सेलेब्रिटी अनेक वेळा विवाह करताना दिसतात. हा ज्याचा त्याचा वयक्तिक विषय आहे. पण अशा उदाहरणा मधून नवीन विवाह इच्छुकांनी योग्य तो बोध घ्यावा. सद्या सर्व सामान्य विवाहेच्छूक तरुणांमध्ये किमान एक तरी विवाह व्हावा अशी वास्तविक अपेक्षा आहे, आणि ही वस्तुस्तिथी आहे.

आपण जर पियुष रानडे आणि सुरुची आडारकर या कलाकारांचे चाहते असाल तर नक्कीच आपणास आनंद झाला असेल, याचबरोबर या नवीन जोडीला त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्यासाठी मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन न्यूज आम्ही घेवून येत आहोत. लाईक्स, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.

हे हि पाहा : T20 World Cup 2024 वेळापत्रक, संघ, स्थळ, वेळ, ICC पुरुष क्रिकेट T20 विश्वचषक 2024

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
1 Review
  • Chhaya says:

    Unbelievable

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version