Step by Step Guide for PCMC Property Tax Online Payment 2023-2024: सोप्या स्टेप फोल्लो करून आपण PCMC ( पिंपरी चिंचवड ) मालमत्ता कर ऑनलाइन असा भरावा.
नमस्कार मित्रानो, आपण पिंपरी चिंचवड पुणे येथे निवासी जागा, सदनिका, व्यवसायिक गाळे, म्हाडा ची घरे अशी तसेच इतर कोणतीही कायदेशीर नोंद केलेली मिळकत घेतली असेल तर आपणास महानगर पालिकेचा मिळकत कर ( Property Tax ) दरवर्षी भरावा लागतो. हा मिळकत कर आपण घरबसल्या मोबाईल किवा कॉम्पुटर वर खालील स्टेप्स प्रोसेस करून भरू शकता.
PCMC मालमत्ता कर भरण्याचे दोन मार्ग आहेत . एक म्हणजे झोनल पीसीएमसी ऑफिसला भेट द्या आणि डीडी, रोख किंवा एटीएम कार्डद्वारे पेमेंट करा.
दुसरा पर्याय म्हणजे PCMC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पेमेंट करणे.
PCMC मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सुलभ करते आणि सामान्य कर स्लॅबवर 5% अतिरिक्त सूट देते.
शिवाय, PCMC मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट तुम्हाला ई-पावती मिळवू देते, मागील PCMC मालमत्ता कर बिलाचा मागोवा घेऊ शकते आणि मागील सर्व नोंदी तपासू शकतात.
चला तर मग, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ऑनलाईन मिळकत कर भरायला सुरुवात करूया.
महत्वाची नोंद – PCMC मालमत्ता कर ऑनलाइन पेमेंटसाठी , तुमच्याकडे झोन क्रमांक, गॅट क्रमांक आणि मालमत्ता क्रमांक असणे आवश्यक आहे.
स्टेप १ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) च्या अधिकृत साइटला भेट द्या. https://publicptax.pcmcindia.gov.in/index.php
जर आपण पहिल्यांदाच हा मिळकत कर भरत असाल तर आपणांस मोबईल क्रमांक लिंक करावा लागेल.
त्यासाठी पुढील स्टेप आहे. आणि या अगोदर मोबाईल क्रमांक लिंक केलेला असेल तर, हि स्टेप वगळून पुढील स्टेप ला प्रोसेस करा.
वर दिल्या प्रमाणे फॉर्म मध्ये ईमेल आयडी भरा आणि नेक्स्ट ला क्लिक करा. पुढे अजून एक असाच फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपण मोबाईल क्रमांक भरा.
त्यावर आलेला ओटीपी सबमिट करा.
ओटीपी सबमिट केल्यावर आपणास खालीलप्रमाणे मोबाईल आणि ईमेल लिंक झाल्याचे कन्फर्मेशन मिळेल.
पहिल्यांदा हा मिळकत कर भरत असल्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अनिवार्य आहे. आता पुन्हा आपण प्रोपटी ट्याक्स भरणे प्रोसेस ला परत सुरुवात करु. पुढील वेळेस आपणास मोबाईल व ईमेल लिंक करणे प्रोसेस करण्याची आवशक्यता नाही. डायरेक्ट आपण यापासून पुढील प्रोसेस करावी.
आपण मोबाईल आणि ईमेल क्रमांक लिंक केला असल्यामुळे, दूरध्वनी क्रमांक नुसार मालमत्ता शोधा हा सोपा पर्याय वापरून पुढे प्रोसेस करणार आहोत. इतर पर्याय देखील वापरू शकता पण काही वेळेस ते प्रोपर वर्क होत नाहीत. म्हणून हा सोपा पर्याय निवडावा.
पुढील पेज वर ओटीपी सबमिट करा आणि व्हेरीफाय करून घ्या.
आता आपणास पुढील पेज वर आपल्या मालमत्ता विषयी डीटेल्स पाहायला मिळेल, त्याखाली show बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
नेक्स्ट पेजवर आपणांस पिंपरी चिंचवड मिळकत कर संपूर्ण सविस्तर माहिती दिसेल, येथे आपण प्रिंट सुद्धा काढून घेवू शकता. पेज च्या खाली स्क्रोल केल्या वर Make a Payment Rs. या बटणावर क्लिक करा.
पुढे पुन्हा मोबाईल क्रमांक आणि ईमेल सबमिट करून Make Payment बटणावर क्लिक करून युपीआय, क्रेडिट – डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, नेट बँकिंग इत्यादी पर्याय वापरून पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर लगेच आपणास मेसेज, ईमेल आणि स्क्रीनवर डाऊनलोड रिसीट पावती चे कन्फरमेशन मिळेल.
अशाप्रकारे आपण प्रथमतः दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक करून त्यानंतर दूरध्वनी क्रमांक पर्याय वापरून मालमत्ता सर्च करून पुढे काही सोप्या स्टेप्स वापरून ऑनलाईन पिंपरी चिंचवड मिळकत भर भरणा केला आहे.
हा मिळकत कर सहामाही आणि वार्षिक स्वरूपाचा असून त्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. काही जुने कर वगळले जातात तर काही नवीन कर समाविष्ट होत असतात. या कराविषयी अधिक माहिती सूचना आपल्याला छापील बिलावर पहावयास मिळतील. महानगरपालिका वेगवेगळ्या कर रुपी उत्पनातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा वापर करत असते.
महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !
एक सुजाण नागरिक म्हणून आपण वेळेत मिळकत कर भरून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या सूचना, तक्रारी याविषयी देखील आपण आपल्या स्थानिक महानगरपालिका प्रतिनिधी यांजकडे वेळोवेळी संपर्क करू शकता.
आपणास वर दिलेली माहिती नक्कीच उपयोगी येईल, तसेच हि माहिती आपण आपल्या मित्र परिवार ज्यांना याचा वापर करून ऑनलाइन कामे घरबसल्या करावीशी वाटतात त्यांच्या पर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर या पोस्ट वरील माहिती आपणास आवडली असेल, काही अभिप्राय, मत नोंदवायचे तर कमेंट करा.
धन्यवाद. ( अजित सहाणे )