Yerawada Pune: जागतिक महिला दिनानिमित्त “सन्मान स्त्री चा” कार्यक्रमाचे आयोजन

📢Local News: न्यु होप सोशल फाउंडेशन तर्फे महिलांचा गौरव.

By Reshma
3 Min Read
न्यु होप सोशल फाउंडेशन तर्फे महिलांचा गौरव

न्यु होप सोशल फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्री चा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार. दि. १७/३/२०२४ रोजी सायं. ४ वाजता. विरूंगळा केंद्र, गांधीनगर, येरवडा, पुणे. येथे करण्यात आले होते.

सन्मान स्री चा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेशदादा मुळीक, वृदांदिदी भंडारी (वी.बी. इव्हेंट व मिशन कोशीश संस्थापिका) सौ. सरिताताई वाडेकर (महिला बालकल्याण अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर पुणे येथे काऊन्सिलर), आणि आयोजक मायाताई ओव्हाळ (न्यु होप फाउंडेशन संस्थापिका) निताताई ठाकूर, राहुल खरात, अतुल मोरे, योगेश ओव्हाळ, सुरेखा कुचेकर, सरिता पवार, प्रियांका कर्वे इ. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर मार्फत मागदर्शन, हळदीकुंकू कार्यक्रम, विधवा महिलांना साडी वाटप कार्यक्रम, तसेच किशोर वयीन मुलींसाठी मार्गदर्शन आणि उपस्थित महिलेला घरगुती वस्तू भेट देण्यात आली.

कार्यक्रमात विधवा महिलांना विधवा न संबोधता पूर्णगिनी सन्मान देऊन हळदी कुंकू लावण्यात आले. तसेच गरीब आणि होतकरू महिला अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत संघर्ष करून मुलांना वाढवितात, शाळा शिकवतात अशा महिला भगिनीला “आदर्श माता” पुरस्कार देण्यात आला.

या दिवशी मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या. महिलांसाठी विशेष खेळांचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमात आणि खेळात सहभागी महिलांसाठी भेटवस्तू देण्यात आली.

उत्कृष्ठ नियोजन करून कार्यक्रम उत्तम पार पाडण्यास संस्था अंतर्गत बचत गट, यशस्वी महिला संस्था आणि स्वामिनी महिला बचत गट, येरवडा. यामधील सर्व महिला भगिनीचे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक वाचा: International Women’s Day 2024: जागतिक महिला दिन विशेष माहिती

न्यु होप फाउंडेशन पुणे

New Hope Foundation Pune: ‘न्यु होप फाउंडेशन’ २०२१  पासून पुणे येथे समाजकार्य करत आहे. ही संस्था रस्त्याच्या कडेला राहणारी लोक तसेच पुण्यातील अनेक झोपडपट्टी मध्ये वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेत असते.

संस्थेचा मुख्य उद्देश निराधार गरजू लोक आणि अनाथ मुले यांच्यासाठी जेवण, शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणे हा आहे. आत्तापर्यंत संस्थेमार्फत रोज हजार पेक्षा जास्त गरजूंना जेवण पुरवले जाते.

महिला सक्षमीकरण योजनेतून महिलांसाठी शिवण क्लास, ब्युटीपार्लर, केक मेकिंग, मसाले उद्योग इ. चे प्रशिक्षण दिले जाते व त्यासाठी प्रशिक्षण सेंटर उभे केले आहेत.

भविष्यातही पुण्यातील झोपडपट्टी मध्ये ५० अभ्यासिका उभारून येथील मुलांच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी १५ केंद्र उभारण्याचे न्यु होप फाउंडेशने ठरविले आहे.

सन्मान स्त्री चा कार्यक्रम फोटोज






 

न्यु होप फाउंडेशन संपर्क 

मायाताई ओव्हाळ ( संस्थापिका )

मोबाईल : ८६०५९०४२९०

ई मेल : newhopefoundation.pune@gmail.com

फेसबुक : https://www.facebook.com/people/NewHope-FoundationPune/61553655553406/

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/new_hope_foundation_pune/

धन्यवाद!

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version