सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी खास मैत्रीवर केलेली गझल “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा”(Mitra Vanvya Madhe Garvya Sarkha) ही कविता मागील काही दिवसांत खूप व्हायरल झाली.
या व्हायरल कवितेला इतर गायक मंडळीनी वेगवेगळी चाल लावून गायली आणि ती गाणी व व्हिडीओज सुद्धा प्रेक्षकांना आवडू लागले. कवितेचे जनक आणि त्यांच्या विषयी अधिक माहिती पुढे पाहूयात.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा – कवी. श्री अनंत विठ्ठल राऊत परिचय
Anant Raut Biography : मित्र वणव्या मध्ये फेम कवी अनंत राऊत यांचे संपूर्ण नाव श्री. अनंत विठ्ठल राऊत असे आहे. अनंत राऊत सर हे कवि,लेखक,वक्ता या वेगवेगळ्या भूमिकेत कार्यरत आहेत. मुळचे अकोला येथील असलेले कवी राऊत यांचे शिक्षण पुणे येथे Engineer(Mtech) झाले आहे.
आज महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात घोंघावत असणारं हे वादळ.. तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं आहे..
त्यांच्या कवितांना जेवढा लोकाश्रय मिळाला तेवढा फार कमी कलाकारांच्या वाट्याला आला..
आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सगळ्यात जास्त लोकोत्तर लोकप्रिय झालेली कविता मिञ वणव्यामद्ये गारव्यासारखा त्यांच्याच लेखणीतून झिरपली, वर्तमान परिस्थीतीवर परखड भाष्य करणारी भोंगा वाजलाय, तरूणांना प्रेमाचा अर्थ सांगणारी तूझ्या गावावरून किँवा जी कविता ऐकून आई वडिलांना काही लोकांनी वृद्धाश्रमातून घरी आणलं ती मायबाप कविता असेल..
अशा त्यांच्या अनेक कविता त्यांचे शब्द मनोरंजनच नाही, तर प्रबोधन आणि परीवर्तन करत आहेत ऊर्जा देत आहेत. साहित्यात एवढया उंचीवर असणारा हा माणूस शिक्षणाने सुद्धा उच्च विद्या विभूषित आहे. Mtech engineering झालेला व्यक्ती चांगल्या पगाराची नौकरी सोडून स्वतःला प्रबोधनासाठी वाहून का घेतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे..
आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेलं कमी वयातच अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं हे व्यक्तिमत्त्व असून आजही मातीशी नातं माञ घट्ट चिकटलेलं आहे.
अनंत राऊत यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील व्याळा या छोट्याश्या गावात झाला. जेमतेम परिस्थिती असणारं कुटुंब वडील पोस्टमन आणि दुसऱ्याच्या वावरात काम करून लेकरांना शिकवणारी आई.. हेच त्याचं motivation त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर..
आपला संघर्ष हा आपला असतों त्याची जबाबदारी आपली असते, परिस्थितीला दोष न देता संघर्षाचा आनंद घेत इमानदारीने यशाची शिखरे गाठली पाहिजेत.
असलेल्या पैश्याची दुप्पट कुणीही करतं, शून्यातून विश्व निर्माण करतो तो माणूस दुःखाच्या छताडावर आनंदाचं घर बांधतो. आणि मेल्यावर हि लोकांच्या हृदयात नांदतो तो माणूस..
कवी अनंत राऊत म्हणतात, कविता माणसाच्या मनातील वेदनेला फुंकर घालून भावनेला वाट मोकळी करून देते.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा (dukh advayla umbaryasarkha) ही कविता राऊत सरांनी त्यांच्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिली आहे. त्यांच्या व्हायरल कवितेमध्ये थोडेच कडवे होते. ह्या कवितेमुळे लोकांचे डोळे पाणावले.
लोकांना ही कविता खूप आवडू लागली. म्हणून राऊत सरांनी यात अजून काही ओळींची भर टाकली, त्यांनी काही कडवे नंतर बनवली आहेत. चला आपण पुढे पाहूयात, संपूर्ण अपडेटेड कविता.
Mitra Vanvya Madhe Garvya Sarkha Lyrics: Anant Raut.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा लिरिक्स
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… |
वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी,
एक तू मित्र कर, आरशासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर, मनासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
फेक तू मुखवटे, भेट झाल्यावरी,
भेट रे दोस्ता, दोस्तासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
चालताना मध्ये, रात आली कधी,
मित्र येतो पुढे, काजव्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
मैतरी चाटते, गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला, वासरासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
त्रासलो जिंदगी, चाळताना पुन्हा,
बस धडा “मैतरी” वाचण्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
का उगा हिंडतो, देव शोधायला,
मित्र आहे जवळ, मंदिरासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
दृष्ट लागू नये, वेदनेची पुन्हा,
दृष्ट लागू नये, वेदनेची मना,
मित्र डोळ्यामध्ये, काजळासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… ||
जाळताना मला, देह ठेवा असा,
हात खांद्यावरी, टाकल्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा…||
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा ,
मित्र वणव्यामध्ये …गारव्यासारखा… |||
————————————————
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा – कवी अनंत राउत ऑफिशियल सोशल मिडिया
कवी अनंत विठ्ठल राऊत यांची ऑनलाइन माहिती शोधताना नाम साधर्म्यामुळे इतर व्यक्तींची माहिती दिसते. त्यामुळे काही गैरसमज होऊ नये, त्यांची योग्य खात्रीशीर माहिती मिळावी यासाठी येथे त्यांचे सोशल मिडिया ऑफिशियल हन्डेल शेअर केले आहेत.
१) कवी अनंत विठ्ठल राऊत यांचे ऑफिशियल फेसबुक पेज – https://www.facebook.com/anant.raut.96
२) कवी अनंत विठ्ठल राऊत यांचे ऑफिशियल इंस्टाग्राम – https://www.instagram.com/anantraut11/
३) कवी अनंत विठ्ठल राऊत यांचे ऑफिशियल युट्यूब चेनल – https://www.youtube.com/user/rautanant
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा mp3 Ringtone Download
ही कविता प्रचंड व्हायरल झाल्यावर, अनेक तरुण पिढी व जेष्ठ नागरिकांना फोन ची रिंगटोन म्हणून आवडू लागली. आपणास जर हि कविता रिंगटोन ठेवायची असेल, तर खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | ऑडिओ कविता | Mitra vanvyamadhe garvyasarkha mp3 poem
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा व्हायरल युट्युब व्हिडीओज
कवी अनंत राऊत सर यांची मित्र वणव्या मध्ये …गारव्या सारखा गाजलेली मूळ कवितेचा व्हायरल व्हिडिओ त्यांच्याच ऑफिशियल युट्यूब चेनल वरून खास आपल्यासाठी.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा युट्युब व्हिडीओ सॉंग
युट्यूब वर जास्त पाहिलेले आणि तरूणाई मध्ये प्रचंड आवडलेले गायक श्रीजीत जी यांच्या युट्यूब चेनल वरून खास आपल्यासाठी.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा अजय-अतुल युट्युब व्हिडीओ सॉंग
वास्तविक जीवनामध्ये कुठला मित्र कधी कामी येईल सांगता येत नाही. गरीब श्रीमंत ही दरी बाजूला ठेवून मित्र वेळ प्रसंगी जीवनात धावून येतात. पुणे शहरात घडलेली मैत्री ची सत्य घटना व्हिडिओ माध्यमातून, महाराष्टाचे लाडके संगीतकार गायक अजय अतुल यांच्या स्वरात पाहा.
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा बेंजो युट्युब व्हिडीओ सॉंग
वेगळ्या शैली मध्ये पारंपारिक बेंजो डीजे स्टाईल मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा तुफान गाजलेला अजून एक व्हिडिओ – विविध लोकांनी विविध प्रकारे गायलेली हि कविता अजरामर झाली आहे. कितीही वेळा पाहा-ऐका, मन कधी भरतच नाही.
एकांतात जर हि कविता ऐकली तर, तुम्हाला नक्कीच जुन्या-नवीन, दुरावलेले, हयात असलेले-नसलेले सर्वच मित्र आणि मैतरणी यांची आठवण येणार आणि डोळ्यांत अश्रू देखील येणार.
कोरोना संकटातून आपण सर्व बाहेर पडलो, खूप जणांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र, कुटुंबातील सदस्य गमावले. या कठीण काळात मित्र, अनोळखी व्यक्तींनी एकमेकाला खूप सहकार्य केले. इतरांना सहकार्य करताना अनेकांनी जीव गमावले.
पुढील काळात जग रहाटणी सुरळीत झाली. प्रत्येक जन आप-आपल्या मार्गाला लागला, हळू हळू संसाराच्या आणि वाढत्या महागाई च्या काळात पैसा कमावताना पुन्हा माणसे यंत्रमय झाली.
परंतु, आजही मराठी साहित्य, काव्य या मध्ये प्रचंड ताकद आहे, आणि या द्वारे पुन्हा मनुष्याला एकमेकाशी जोडता येते, हे प्रा.कवी अनंत राऊत यांच्या मित्र वणव्या मध्ये …गारव्यासारखा या व्हायरल कवितेने सिद्ध केले.
अधिक वाचा – प्रेमाने जग जिंकता येते – मैत्री दिवस
तर मित्रांनो…हो हो .. मित्रांनोच, आपल्या ई जनसेवा वेबसाईट ला दररोज भेट देणाऱ्या खास वाचकांना मैत्री वरील लेख कसा वाटला? अभिप्राय नक्की द्या. 👍 लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कवी श्री अनंत राऊत यांना मानाचा मुजरा 🙏
धन्यवाद.
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्र, मैत्री विषया वर रसिक मना मध्ये अधिराज्य करणारी हि मित्र वणव्या मध्ये ..गारव्या सारखा अप्रतिम काव्य रचना.