MHADA Recruitment 2024: म्हाडा भरती अधिसूचना, ऑनलाईन अर्ज प्रकिया व अपडेट्स

MHADA Recruitment 2024 मधील नोकरभरती विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. अर्ज कधी, कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय आहे व तयारी कशी करावी ? अधिक पाहा.

By Ajit
5 Min Read
म्हाडा भरती - MHADA Recruitment 2024

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण ( MHADA ) म्हणजेच म्हाडा हे महाराष्ट्रातील गृहनिर्माण महामंडळ आहे. यांच्या द्वारे विविध भरती परीक्षा (MHADA Recruitment 2024) घेण्यात येतात. लवकरच ज्युनियर अभियंता आणि ज्युनियर क्लर्क सारख्या अनेक रिक्त जागांसाठी नोकर भरती बाबत अधिसूचना जारी होणार आहे.

म्हाडा रिक्रुटमेंट २०२४ बद्दल आम्ही संपूर्ण मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपणांस देत आहोत. यामध्ये MHADA Recruitment 2024 Ad मध्ये टोटल रिक्त जागा, उपलब्ध पदांची संख्या आणि ऑनलाईन अर्ज प्रकिया कशी करावी व इतर अपडेट्स आहेत.

म्हाडा भरती बाबत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, MHADA Recruitment Notification 2024 PDF जानेवारी – फेब्रुवारी मध्ये नोटिफिकेशन द्वारे प्रसिद्ध होईल. पात्र उमेदवार ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून नोंदणी करू शकतात. आपण या भरती साठी पात्रता, आवश्यकता आणि वय मर्यादा याविषयी अधिक माहिती घेवू शकता.

हे देखील पाहा : PCMC Property Tax Payment: PCMC मालमत्ता कर ऑनलाइन असा भरावा

म्हाडा चा अर्थ काय?

Maharashtra Housing and Area Development Authority या इंग्रजी फुल शब्दाचा मराठी मध्ये ” म्हाडा ”  तसेच हिंदी मध्ये महाराष्ट्र आवास एवं क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इंग्लिश शॉर्टफॉर्म मध्ये MHADA असे अर्थ होतात.

महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना ही 1948 मध्ये झाली होती, आणि हेड क्वाटर मुंबई येथे आहे. विदर्भ प्रदेश वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. या संस्थेने समाजातील विविध घटकांसाठी विविध गृहनिर्माण योजनांतर्गत निवासी इमारतींचे बांधकाम हाती घेतले आहे. आणि दरवर्षी लॉटरी माध्यमातून विजेत्यांना माफक दरामध्ये सदनिका प्रदान केल्या जातात.

MHADA Recruitment Notification 2024 PDF

म्हाडा भरती बाबत ची जाहिरातीचा संक्षिप्त आढावा. यामध्ये महत्वाच्या डेट्स विषयी माहिती आहे. अधिक पुढे जाणून घ्या.

भरती प्रकारMHADA भरती 2024
प्राधिकरणमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण
एकूण पोस्टअनेक
पोस्ट नावकनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ लिपिक
निवड प्रक्रियालेखी परीक्षा आणि डीव्ही
MHADA अर्ज फॉर्म 2024जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीखफेब्रुवारी 2024
पात्रता कोणती12 वा किंवा डिप्लोमा किंवा पदवी
वयो मर्यादा18-38 वर्षे
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, अधिवास, स्वाक्षरी आणि छायाचित्र
अधिकृत वेबसाइटmhada.gov.in

MHADA JE Recruitment 2024

म्हाडा जेई ज्युनिअर इंजिनीअर [ JE (Junior Engineer) ] भरती विषयी डिटेल माहिती. एकदा का आपण या नोकरभरती संबधी तुमची पात्रता तपासली, आणि स्वत: ला पात्र असल्याचे सिद्ध झाल्यास आपण ऑनलाईन म्हाडा च्या अधिकृत वेबसाईट ला MHADA Application Form 2024 या लिंक वर जावून स्वत: ची नोंदणी करा.

संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपण पुढील परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे, आणि नंतर पुढील निवड प्रकियेसाठी पात्र व्हावे. अर्जदारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीचे पत्रक दिले जाईल.

या संबधी ची सविस्तर सूचना ऑनलाईन https://www.mhada.gov.in/en येथे उपलब्ध आहे.

MHADA Junior Clerk Bharti 2024

म्हाडा ज्युनिअर क्लर्क भरती २०२४ च्या जाहिराती प्रमाणे या पदा साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे.

  • MHADA ज्युनियर क्लार्क भरती 2024 या अंतर्गत येत्या काही महिन्यांत या पदा संबधी अधिसूचना रिक्त जागांसह प्रसिद्ध केली जाईल.
  • ज्युनियर क्लर्कसाठी पदासाठी हजारो रिक्त जागा असतील आणि त्यासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आपल्याला फोटो, स्वाक्षरी आणि आधार कार्ड सारख्या मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता आहे.
  • एकदा आपण नोंदणी पूर्ण केल्यावर, पुढे मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची तयारी सुरू करावी लागेल.
  • परीक्षा संबधी सर्व पात्रता तपासून घेतल्यानंतर, आपल्याला दस्तऐवज सत्यापनासाठी निवडले जाईल त्यानंतर पुढील निवडीसाठी अंतिम प्रक्रिया केली जाईल.

MHADA Application Form 2024 Process

म्हाडा भरती अप्लिकेशन फॉर्म बद्दल –  एकदा भरती सूचना संपल्यानंतर अर्जदारांना MHADA च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज फॉर्म ऑनलाईन भरावे.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण mhada.gov.in ला भेट देऊ शकता आणि नंतर परीक्षेची तयारी सुरू करू शकता.

दहावी मार्कशीट, डिप्लोमा प्रमाणपत्र, स्वाक्षरी आणि छायाचित्र यासारख्या मूलभूत कागदपत्रांची MHADA Bharti 2024 ला Application Form भरण्यासाठी आवश्यक आहे. भरती फॉर्म अप्लिकेशन भरताना अर्जदारास ३०० – ५०० रुपये नाममात्र फी ही यूपीआय, डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड वापरुन किंवा बँक चलन या माध्यमाद्वारे स्वत: भरावी लागेल.

हे देखील वाचा : Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण माहिती

आपण जर या भरती मध्ये सहभागी होणार असाल तर पुढील अपडेट्स साठी या पोस्ट ला दररोज भेट द्या. आणि आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये या पोस्ट ला जास्तीत जास्त शेअर करा.

सद्या कुणबी मराठा आरक्षण विषयावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. त्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण कुणबी प्रमाण पत्राद्वारे ओबीसी कॅटेगरी मधून या पदा साठी अर्ज करू शकतात का ?  तसेच येथून पुढे नवीन नोकर भरती मध्ये कुणबी प्रमाण पत्र असलेल्या उमेदवार यांस कशा प्रकारे आरक्षण लाभ घेता येईल, हेही पाहणे उत्सुकतेचे राहील.

कौन है मनोज जरांगे? आणि काय आहे कुणबी प्रमाण पत्र – अधिक जाणून घ्या : Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी

Share This Article
By Ajit
Follow:
जय शिवराय. वेब डिझायनर आणि ब्लॉग कंटेंट क्रीयटर, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग मधील अनुभव. समाज माध्यमांतील विविध विषयांवर उपयुक्त प्रगल्भ लिखाण काम करणे.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version