Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण माहिती

पोलीस भरती तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर, तब्बल १७,४७१ पदांसाठी होणार पोलीस भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या.

By Reshma
7 Min Read
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४

महाराष्ट्र राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2024) होणार आहे. पोलीस भरती करण्यासाठी वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस खात्यात १००% पदभरती करण्यास महाराष्ट्र राज्यात मान्यता मिळाली आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. राज्यात तब्बल १७,४७१ पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2024 ) होणार आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती माहिती

Maharashtra Police Recruitment 2024 Full Information : महाराष्ट्र पोलीस विभागाने कॉन्स्टेबल पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २०२४ पासून सुरू होत आहे.

पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्र पोलीस शिपाई आणि शिपाई अश्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा. सविस्तर महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ (Police Bharti 2024) अधिसूचना महाराष्ट्र पोलीस मध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी जारी करण्यात आली आहे, आणि पात्र उमेदवार निर्धारित वेळेत अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४

Maharashtra Police Constable Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबलच्या विविध रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. महा पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ साठी अधिकृत अधिसूचना २०२४ रोजी अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर प्रकाशित करण्यात आली होती. ज्या उमेदवारांना या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते २०२४ च्या दरम्यान त्यांचा ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

या रिक्त पदांसाठी निवड प्रक्रियेमध्ये ऑफलाइन लेखी परीक्षा, शारीरिक मापन चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी समाविष्ट आहे. सर्व उमेदवारांनी भरती होण्यासाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.

ऑफलाइन लेखी परीक्षा २०२४ रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण लेख वाचणे महत्त्वाचे आहे.

विभागाचे नावमहाराष्ट्र पोलीस विभाग
एकूण पोस्टची संख्या3000 पोस्ट
पोस्ट नावपोलीस शिपाई
वेतनश्रेणी5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.)
पोलीस शिपाई शैक्षणिक पात्रता12वी पास
अर्ज पद्धतीऑनलाईन
वय श्रेणी19 ते 28 वर्ष
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in

महाराष्ट्र पोलीस २०२४ भरती पात्रता निकष

Maharashtra Police 2024 Eligibility Criteria : महाराष्ट्र पोलीस २०२४ भरती साठी अर्जदारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेल्या इतर आवश्यकतांसह पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक निकष
महाराष्ट्र पोलीस मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील इच्छुकांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. महाराष्ट्र पोलीस २०२४ भरतीच्या अधिकृत अधिसूचनेत सर्व तपशील आहेत. महाराष्ट्र पोलीस विभाग पुढील चरणांमध्ये निवड प्रक्रिया पार पाडेल.

  • लेखी चाचणी
  • शारीरिक क्षमता चाचणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज फी

सामान्य श्रेणी – रु. ४५०/-

मागास प्रवर्ग – रु. ३५०/-

पात्रता निकषमहाराष्ट्र पोलीस भरती 2024
पोस्टचे नावपोलिस शिपाई
एकूण पोस्ट18831 पोस्ट + 3000 पोस्ट लवकरच येत आहेत.
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र (जिल्हानिहाय)
पोलीस कॉन्स्टेबल14956 पदे
ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल2174 पदे
SRPF पोलीस कॉन्स्टेब1204 पदे

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम २०२४

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – २० गुण
IQ चाचणी – २० गुण
अंकगणित – २० गुण
मोटार वाहन चालवणे/वाहतूक नियम – २० गुण
मराठी व्याकरण – २० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज कसा करावा?

How To Apply Maharashtra Police Recruitment Online 2024?

  • महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या- mahapolice.gov.in.
  • मुख्यपृष्ठावरील “भरती” विभागावर क्लिक करा. “महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भर्ती २०२४ ” लिंक निवडा.
  • सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
  • अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की छायाचित्र, स्वाक्षरी इ. उपलब्ध पेमेंट पद्धतींद्वारे अर्ज फी भरा.
  • अर्जाचे पुनरावलोकन करा आणि प्रदान केलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • “सबमिट” बटणावर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचणे महत्त्वाचे आहे. उमेदवाराने एकाच पदासाठी एकच आवेदन करावे. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येते.

Maharashtra Police Bharti 2024 new GR Download

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ विषयी सविस्तर माहितीचा नवीन GR आला आहे. यामध्ये १७,४७१ रिक्त पदे दर्शवली आहेत.

पुढे दिलेला PDF GR डाऊनलोड करून अधिक माहिती घ्या. अजून डिटेल मध्ये  माहिती फॉर्म सुटल्यावर समजेल. भरती प्रक्रिया कशी घेनार आहे, आणि भरती ची लेखी व मैदाणी परीक्षा केव्हा होईल इत्यादी.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ GR डाऊनलोड PDF

तुम्ही जर या पोलीस भरती साठी इच्छुक असाल तर आजपासूनच मैदानी सराव आणि लेखी अभ्यास चालू करा. मेहनत आणि जिद्द  असेल तर नक्कीच तुम्हाला यश संपादन होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती तयारी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना

Police Recruitment Preparation & Measures to avoid inappropriateness : महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ही तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. ही भरती मोहीम सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी आणि तरुणांना पोलीस क्षेत्रात करिअर करण्यासाठी आहे. अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस शिपाई परीक्षा एजन्सी कडे सोपविली आहे.

तसेच सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करण्यासाठी गृह विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हा टाळण्यासाठी १००० लोकाना प्रशिक्षित केले जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, परंतु तरुणांना पण पोलीस भरतीची जोरदार तयारी करावी लागणार आहे.

या पुर्वी कंत्राटी भरतीवरून सरकारी नोकरीत वाद सुरु असतानाच सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलीस कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ३००० कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती.

राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांना गृहखाते कंत्राटी भरती पद्धतीने भरती करणार होते. त्यांना ११ महिन्यांसाठी प्रशिक्षण देवून भरती केली जाणार होती.

या कंत्राटी पोलींसासाठी तीन महिन्यांसाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु मुंबई सारख्या मोठ्या शहराची सुरक्षा कंत्राटी पोलीसांवर सोपवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

त्यासाठी मंत्रालयात आंदोलने झाली सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला यामुळेच सरकारने पोलीसांची कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला होता.

आता लवकरच तुमच्या सर्वांचे पोलीस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण. म्हणूनच तयारीला लागा, सर्व इच्छुक उमेदवारांना पोलीस भरती परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा : 26 January Republic Day Information In Marathi 2024: भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण मराठी माहिती

मित्रानो हा लेख आपल्या पोलिस  होण्याऱ्या बांधवाना भगिनींना पाठवा, म्हणजेच त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा लेख मार्गदर्शक  ठरेल.

धन्यवाद.

सद्या कुणबी मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रा मध्ये चर्चेचा विषय आहे. शिक्षण आणी सरकारी नोकऱ्यांत मराठा खुला वर्गाला अधिक गुणवत्ता असून देखील जातनिहाय आरक्षणामुळे सहजासहजी नोकरी मिळत नाही.

यामुळे मराठा समाजामध्ये उद्रेक झाला आहे, मनोज जरांगे पाटील या लढ्याचे नेतृत्व करत आहे. कुणबी प्रमाण पत्र धारकांना ओबीसी वर्गातून नोकरी मिळू शकते, यासाठी हे आंदोलन चालू आहे.

जाणून घ्या : काय आहे कुणबी मराठा प्रमाण पत्र आणि कोण आहे मनोज जरांगे ?

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version