एलआयसी चा सिंगल प्रिमियम इंडोमेट प्लान-
या योजने अंतर्गत मिळणारे फायदे तसेच योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
फायदे
अ) परिपक्वता लाभ (Benefits Payable on Maturity)- पोलिसी च्या मुदतीअखेर विमेदारास विमा रक्कम, जमा झालेला बोनस व लागू असल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल.
ब) मृत्यूलाभ (Benefits Payable on Death) – जोखिम सुरु झाल्यानंतर विमेदाराचा मृत्यू झाल्यास वारसदाराला विमा रक्कम, जमा झालेला बोनस व लागू असल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. जोखीम सुरु होण्याअगोदर विमेदाराचा मृत्यू झाल्यास भरलेला हप्त्या (टक्स व जादा हप्ते वगळून) परत केला जाईल.
जोखीम सुरु व्हायचा दिनांक : पोलिसी च्या सुरुवातीस विमेदाराचे वय ८ वर्षापेक्षा कमी असेल तर पोलिसी सुरु झाल्यानंतर २ वर्षांनी किंवा वय ८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पोलिसी दिनांकापासून यापैकी आधी येणाऱ्या तारखेपासून जोखीम सुरु होईल.
८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर जोखीम तकात्ल सुरु होईल.
एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान
पात्रता अटी
१) | सुरुवातीचे किमान वय | ९० दिवस पूर्ण |
२) | सुरुवातीचे कमाल वय | ६५ वर्ष जवळच्या जन्मदिनांकास |
३) | किमान मुदत | १० वर्ष |
४) | कमाल मुदत | २५ वर्ष |
५) | मुदतीअखेर किमान वय | १८ वर्ष |
६) | मुदतीअखेर कमाल वय | ७५ वर्ष जवळच्या जन्मदिनांकास |
७) | हप्त्या भरण्याची पद्धत | एक रकमी |
८) | किमान विमा रक्कम | रु. ५०,००० |
९) | कमाल विमा रक्कम | अमर्यादित (५००० च्या पटीत) |
मोठ्या विमा रकमेवर मिळणारी सूट
विमा रक्कम | दर हजारी विमा रकमेवर सूट |
५०,००० ते ९५,००० | नाही |
१,००,००० ते १,९५,००० | रु. १८ |
२,००,००० ते २,९५,००० | रु. २५ |
३,००,००० व त्यापुढे | रु. ३० |
कर्ज (Loan)
पोलिसी ला एक वर्ष पूर्ण झाल्यावर नियमानुसार कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध.
एल आय सी पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या खालील अधिकृत पेज वर माहिती पहा
https://licindia.in/web/guest/insurance-plan