परिपक्वतेचा लाभ घेतल्यानंतरही आयुष्यभर जोखिम संरक्षण
एलआयसी ची ‘न्यू जीवन आनंद’ योजना दि. ८ जानेवारी २०१४ पासून सुरु झाली आहे. या योजनेत हयातीत व हयातीनंतरचा विमा असे दुहेरी संरक्षण विमेदाराला मिळते.
परिपक्वता लाभ(Maturity Benefit)
पोलिसीच्या मुदती अखेर विमेधारकास मूळ विमा रक्कम, जमा असलेला बोनस आणी अंतिम ( अतिरिक्त) बोनस (देय असल्यास) दिला जाईल.
मृत्यूलाभ (Death Benefit)
- पोलिसीच्या मुदती दरम्यान विमेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला ‘हमी विमा रक्कम’, मृत्यूच्या वर्षापर्यंत जमा झालेला बोनस तसेच देय असल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल.
- यामध्ये ‘हमी विमा रक्कम’ म्हणजे मूळ विमा रकमेच्या १२५% किंवा वार्षिक हप्त्याच्या दहापट यापैकी जास्त असलेली रक्कम.
- वरील मृत्यूलाभाची एकूण रक्कम भरलेल्या सर्व हप्त्याच्या ( टक्स व ज्यादा हप्ते वगळून) एकूण रकमेच्या १०५% पेक्षा कमी असणार नाही.
- पोलिसीची मुदत संपल्यानंतर विमेदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला मूळ विमा रक्कम देण्यात येईल.
Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश
पात्रता अटी
- सुरुवातीचे किमान वय : १८ वर्षे पूर्ण
- सुरवातीचे कमाल वय : ५० वर्ष जवळच्या जन्मतारखेस
- मुदतीअखेर कमाल वय : ७५ वर्ष जवळच्या जन्मतारखेस
- किमान पोलिसी मुदत : १५ वर्ष
- कमाल पोलिसी मुदत : ३५ वर्ष
- किमान मूळ विमा रक्कम : अमर्यादित (रु ५०००/- च्या पटीत)
हप्ता भरण्याचे पर्याय(Mode of premium payment)
वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही, दरमहा (पगारातून किंवा इसीएस द्वारा)
हप्त्यात मिळणारी सवलत (Rebates)
हप्त्या प्रकारावर सूट (Mode Rebates)
- वार्षिक – तक्त्यातील हप्त्यावर २%
- अर्धवार्षिक – तक्त्यातील हप्त्यावर १%
ब) मोठ्या विमा रकमेवर मिळणारी सूट (High SA Rebates)
मूळ विमा रक्कम ( रु.) दर हजारी विमा रकमेवर सूट (रु.)
१,००,००० ते १,९५,००० नाही
२,००,००० ते ४,९५,००० १.५०
५,००,००० ते ९.९५.००० २.५०
१०,००,००० व त्यापुढे ३.००
अपघाती फायदा
दर हजारी रु. १ ज्यादा हप्ता भरून अपघाती फायदा घेण्याचा पर्याय उपलब्ध.
पुनरुज्जीवन (Revivals)
बंद पडलेली पोलिसी , मुदतीदरम्यान थकलेले हप्ते व्याजासहित भरून परत सुरु करता येईल. परंतु पोलिसी बंद झाल्याच्या तारखेपासून २ वर्षाच्या आत सुरु करणे आवश्यक आहे.
कर्ज (Loan)
तीन वर्षाचे हप्ते भरल्यानंतर नियमानुसार कर्ज मिळण्याची सुविधा
आयकरात सवलत (Income Tax Benefit)
आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार सेक्शन ८०(C) व सेक्शन १० (१०) (D) नुसार आयकरात सवलत मिळेल.
एल आय सी पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या खालील अधिकृत पेज वर माहिती पहा