‘ लेक लाडकी ‘ योजना राबविण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय
राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे मुलीना टप्याटप्यात आर्थिक मदत करत लक्षाधीश करण्याचे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले.
मुलींच्या जन्मास प्रोत्याहन देवून त्यांचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलीना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी हि योजना राबविण्यात येईल. पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती
यांना होणार योजना लागू :
- कुटुंबातील एक अथवा दोन मुलींना
- एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला
- दुसर्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये झाल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना
अशी असेल योजना :
- जन्म झाल्यावर रु ५ हजार
- पहिलीत गेल्यावर रु ६ हजार
- सहावीत गेल्यावर रु ७ हजार
- ११ वीत गेल्यावर रु ८ हजार
- १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रु ७५ हजार
- एकूण रु १,०१,०००
राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ हि योजना अधिक्रमित करून एक एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी हि नवी योजना राबविण्यात येणार आहे.
एक एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यानाही या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ न्यूज नेटवर्क – बुध.दि.११/१०/२०२३ https://www.esakal.com/maharashtra/what-is-the-state-governments-lake-ladki-yojana-who-will-benefit-find-out-srk94