Ladli Behna Yojana in Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना प्रतीमहिना मिळणार १५०० रुपये

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली असून, काय आहे योजना हे आपण सविस्तर पाहूयात.

By Reshma
7 Min Read
Ladli Behna Yojana in Maharashtra

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री  मा.श्री. अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladli Behna Yojana in Maharashtra) लागू करण्यासंदर्भात घोषणा केली.

राज्यातील गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती

Mukhyamantri Ladli Behna Yojana Full Information Marathi: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दि. २८ जून २०२४ रोजी विधानसभेत राज्याचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना केली.

या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असून, २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच हा भत्ता दिला जाणार आहे. म्हणजेच महिलांना वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात माहिती देताना मा. अजित पवार साहेब म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (माझी लाडकी बहीण) (Ladki Bahin Yojana) योजना २०२४ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच महिलांनी ऑगस्ट पर्यंत अर्ज केला तरी त्यांना जुलै पासूनचे पैसे मिळणार आहे.

महिलांच्या पोषण, रोजगार आणि कौशल्यासाठी योजना राबवणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ योजना सुरू केल्या असल्याचेही सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेपासून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

लाडली बेहन योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात १२५० रुपये जमा करते. ही योजना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केली होती, जी सध्याच्या भाजप शासित मध्य प्रदेश सरकारमध्ये सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता

Mukhyamantri Ladli Behna Yojana Eligibility:

१. लाभार्थी २१ ते ६५ या वयोगटातील असावा.

२. वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा कमी असणाऱ्यांना मिळणार लाभ

३. विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांनाच मिळणार लाभ.

४. अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.

५. महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा आयकरदाता नसावा.

६. महिलेचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असावे.

७. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महारास्त्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल.

८. अडीच लाख रु.उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड  उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येईल.

९. कुटुंबातील पात्र एका अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Ladli Behna Yojana Necessary Documents:

१. आधार कार्ड
२. पत्त्याचा पुरावा
३. जात प्रमाणपत्र
४. शिधापत्रिका
४. वय प्रमाणपत्र
५. उत्पन्न प्रमाणपत्र
६. मोबाईल नंबर
७. बँक पासबुक
८. पासपोर्ट आकाराचा फोटो
९. डोमासाईल ऐवजी – पंधरावर्षापुर्वीचे मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला देता येणार.
१०. उत्पन्न प्रमाणपत्र ऐवजी – तुम्हाला पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड देता येणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी लागू होणार?

दिनांक २८ जून २०२४ रोजी झालेल्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या नावाने महाराष्ट्र राज्यात योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार १ जुलै २०२४ पासून ही योजना राबवणार आहे. या योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी १ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवड प्रक्रिया

Mukhyamantri Ladli Behna Yojana Selection Process: महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.

या योजनेद्वारे राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जी डीबीटीद्वारे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

राज्यातील सुमारे १.५ कोटी महिलांना लाभ मिळू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांची त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे निवड केली जाईल.

राज्यातील पिवळे व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना gr pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR येथे डाऊनलोड करा: 👉 Mukhyamantri Mazi Bahin Ladaki Yojana GR PDF

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज डाऊनलोड करण्यासठी येथे क्लिक करा 👉 Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Download (Ladki Bahin Yojana Application Form)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी घरबसल्याच करा ऑनलाईन अर्ज

नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करून तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता.

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👉 Download Narishakti Doot App For Maharashtra Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्जप्रक्रिया

Mukhyamantri Ladli Behna Yojana Online Apply: महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही पात्र आणि इच्छुक महिला ज्यांना या योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यायचा आहे त्यांना वरील सर्व कागदपत्रे जमा करून ठेवायची आहेत.

राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आणि ऑनलाईन (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Offline Apply) अशा दोन्ही पद्धतीने सुरू केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 👉Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply 2024

वरील वेबसाईटला भेट देवून संपूर्ण माहिती वाचूनच फॉर्म भरा. तसेच ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे स्टेट्स येथे पाहायला मिळेल. ज्या महिलांनी अ‍ॅप द्वारे फॉर्म भरला आहे, त्यांचे स्टेट्स अ‍ॅप वरच पाहायला मिळेल. त्यांची नोंद वेबसाईटवर दिसणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म आता ऑफलाईन, अ‍ॅप द्वारे, आणि वेबसाईट वरून भरता येतो.

पुढील माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे नक्कीच कळवू, जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी लगेच अर्ज करू शकता आणि लाभ मिळवू शकता. तोपर्यंत आमच्या ह्या पोस्टला दररोज भेट द्या आणि इतर गरजू महिलांना शेअर करा. तुमच्या एका शेअर ने नक्कीच अनेक गरजवंत व्यक्तींना याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद.

हे सुद्धा वाचा: Free Education for Girl Child In Maharashtra 2024: मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version