बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” ही नवीन योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासोबतच रोजगार आणि आर्थिक मदतही दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना दरमहा रु. १०,००० पर्यंतची मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Work Training Scheme) म्हणजेच लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana Maharashtra 2024) ही योजना विद्यार्थांना व बेरोजगार तरुण वर्ग यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
माझा लाडका भाऊ योजना माहीती
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: सरकारने नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आणि त्यानंतर लाडक्या भावांसाठी काय ? अशी टीका विरोधकांनी केल्यानंतर महाराष्ट्र सरकार ने त्यांना उत्तर म्हणून ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ घोषणा केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा, आणि पदवीधर विद्यार्थी व तरुणांना विद्यावेतन मिळणार आहे. जे विद्यार्थी प्रशिक्षणात (अप्रेंटिसशिप) सहभागी होणार त्यालाच हा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थी व तरुणांना विद्यावेतन खालीलप्रमाणे मिळेल.
- १२ वी पास – रु. ६०००
- डिप्लोमा धारक – रु. १०,०००
- पदवीधर – रु. १२,०००
या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार ६००० कोटी रुपये खर्च करणार आहे. माझा लाडका भाऊ योजना २०२४ च्या माध्यमातून वर्षाला १० लाख तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
तसेच प्रशिक्षणादरम्यान पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्यही देण्यात येणार आहे, जेणेकरून युवक व विद्यार्थ्यांना रोजगार मिळून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करता येईल.
संबंधित कंपन्यांमध्ये युवकांनी ६ महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरत्यांना सहा महिन्यांची स्टायपेंड ची रक्कम देण्यात येईल. तसेच संबंधीत कंपनीचे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कंपनींना तरुणांचे काम आवडल्यास त्यांना तिथे नोकरी सुद्धा देवू शकतात. तरुणांना विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम कंपनी देवू शकते.
सरकारकडून दिले जाणारे वेतन हे प्रती महिना असून ते सहा महिन्यांसाठीच मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ सबंधित विद्यार्थी व तरुण एकदाच घेवू शकतो.
लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती या उपक्रमामुळे सुधारेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. माझा लाडका भाऊ योजना २०२४ राज्यातील युवकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल व त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल.
माझा लाडका भाऊ योजना पात्रता
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Eligibility:
१. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. तरुणांचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.
३. बारावी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अशी शिक्षित पात्रता आवश्यक
४. तुम्ही बेरोजगार असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.
५. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक.
६. अर्जदाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
७. शिक्षण चालू असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
माझा लाडका भाऊ योजना आस्थापना / उद्योगासाठीची पात्रता
Maja Ladka Bhau Yojana Establishment / Industry Eligibility:
१) आस्थापना / उद्योग हे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
२) आस्थापना / उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी.
३) संबंधित आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
४) आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate Of Incorporation, DPIT आणि उद्योग आधार यांची नोंदणी केलेली असावी.
माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Documents:
१. आधार कार्ड
२. पत्त्याचा पुरावा
३. वय प्रमाणपत्र
४. चालक परवाना
५. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
६. मोबाईल नंबर
७. पासपोर्ट आकाराचा फोटो
८. बँक खाते पासबुक
माझा लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्जप्रक्रिया
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Apply Online:
असा करा अर्ज: Ladka bhau yojana 2024 online apply
१. महाराष्ट्र सरकारच्या लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या (आता उपलब्ध नाही).
२. नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
३. यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
४. अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.
५. तसेच अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
६. यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
७. नंतर पुढे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
८. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
माझा लाडका भाऊ योजना GR
Ladka Bhau Yojana Maharashtra GR PDF Marathi: महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – “CM Youth Work Training Scheme Maharashtra”( माझा लाडका भाऊ योजना ) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. (अद्याप GR उपलब्ध नाही ).
येथे क्लिक करा 👉 Ladka Bhau Yojana Maharashtra in Marathi GR PDF
धन्यवाद !
हे देखील वाचा : Ladli Behna Yojana in Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना प्रतीमहिना मिळणार १५०० रुपये