महाकृषी उर्जा अभियान अंतर्गत आणि केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार प्रधानमंत्री कुसुम योजना २०२४ (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024) जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे महाऊर्जाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. पुढे पाहूयात अधिक माहिती.
कुसुम सोलर पंप योजना माहिती
Kusum Solar Pump Scheme Information: कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पुढील ५ वर्षात ५ लाख सौर कृषीपंप शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याची मंजुरी दिली आहे. महाऊर्जा तर्फे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम-ब योजेने मार्फत ३ एच.पी, ५ एच.पी, ७.५ एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपासाठी अर्ज करता येतो. ज्या ठिकाणी विजेची जोडणी पोहचली नाही त्यांच्यासाठी हि योजना आहे. शेतकऱ्यांसाठी ९०% ते ९५% अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील म्हणजेच लाभार्थ्याला फक्त ५% ते १०% रक्कम भरावी लागते.
कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषी पंपासाठी सादर करावा. अटल सौर कृषीपंप योजना १ व २ तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच ते पात्र नाही त्या लाभार्थ्यानी कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरू नये, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच एकाच लाभार्थ्याने एक किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येईल.
योजनेचे नाव | महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
उद्दिष्टे | शेतकऱ्यासाठी सोलर कृषीपंप पुरविणे. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट | https://www.mahadiscom.in |
कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे
Kusum Solar Pump Scheme Required Documents: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहे.
१. ७/१२ उतारा – 7/१२ उतारा मध्ये एका पेक्षा जास्त नावे असल्यास रु. २००/- च्या मुद्रांक कागदावर ना हरकत / संमती पत्र बनवून घ्यावे. 7/१२ मध्ये एकच नाव असल्यास आवश्यकता नाही.
२. आधारकार्ड प्रत.
३. रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
४. पासपोर्ट साईज फोटो.
५. शेतजमीन / विहीर / पाण्याचा पंप सामुहिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
६. रहिवासी पत्त्याचा पुरावा.
७. जातीचा दाखला आवश्यक असल्यास.
कुसुम सोलर पंप योजना अनुदान
Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy: कुसुम सोलर कृषी पंप हा त्याच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार उपलब्ध होतो. कृषी पंप क्षमता आणि त्यानुसार किंमत आणि सबसिडी पुढील प्रमाणे आहे.
पंपाची क्षमता | मुळ किंमत (GST सह) |
---|---|
3 HP – DC | रु. 1,93,803/- |
5 HP – DC | रु. 2,69,746/- |
7.5 HP – DC | रु. 3,74,402/- |
पंप क्षमता | खुला गट (10 %) | अ.ज. / अ.जा. गट (5%) |
---|---|---|
3 HP – DC | रु. 19,380/- | रु. 9,690/- |
5 HP – DC | रु. 26,975/- | रु. 13,488/- |
7.5 HP – DC | रु. 34,440/- | रु. 18,725/- |
कुसुम सोलर पंप योजना फायदा
Kusum Solar Pump Scheme Benefit: महाराष्ट्र राज्यात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि म्हणूनच शेती व्यवसायात क्रांती घडवून आणण्यासाठी कुसुम सोलर कृषीपंप योजना महत्वाची आहे. तसेच ही योजना राज्यभरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि सरकारला देखील परवडणारी आहे.
कुसुम सौर पंप योजनेचे उद्दिष्ट हे सिंचनासाठी पारंपारिक उर्जा स्त्रोतांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांमध्ये सौर उर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. सौर पंप बसवून ही योजना वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यास मदत करते व पर्यावरण संवर्धन राखण्यासाठीही योगदान देते.
सौर ऊर्जेचा सिंचनासाठी वापर करून शेतकरी त्यांचे लक्षणीय वीज बिल कमी करून त्यांच्या खर्चातील बचत आणि महाग डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या पंपांची गरज कमी करू शकतो. सद्या वीजबिले अवाजवी येत आहेत, आणि वेळेत भरले नाहीतर त्यावर व्याज देखील आकारले जाते.
सौर पंप सिंचनाच्या उपलब्धतेमुळे, शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात, ज्यामुळे उच्च उत्पन्न वाढून शेतकर्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. हमीभाव हा देखील महत्वाचा विषय आहे.
कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र २०२४ ऑनलाईन अर्ज
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Apply Online: अर्ज कुठे आणि कसा करावा, थोडक्यात माहिती पाहा.
कुसुम सोलर कृषी पंप ऑनलाईन अर्ज | https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b |
---|---|
अर्ज स्थिती पाहणे करिता लॉगीन | https://kusum.mahaurja.com/beneficiary/ |
महाउर्जा (MEDA) अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahaurja.com/meda/en |
PM Kusum Yojana Maharashtra 2024 | https://www.mahaurja.com/meda/portal |
कुसुम सौर पंप ऑनलाइन नोंदणी लिंक (Kusum Online Registration Link):👉 https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b
कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी करिता पुढील PDF चा वापर करावा. 👉 kusum labharthi sour pump yojana
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. या सर्वच योजना सहज आणि सोप्या पद्धतीने मिळतीलच असे नाही, तर यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनी अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
———————————
आपण शेतकरी असल्यास या योजने विषयी आपला अभिप्राय आपण कमेंट मध्ये द्यावा. माहिती आवडल्यास सोशल मीडिया ग्रुप मध्ये शेअर करावी.
धन्यवाद.
शेतकरी तसेच अन्य वर्गासाठी महत्वाच्या सरकारी वेबसाईटस ची लिस्ट पाहा : 👉 Maharashtra Gov Important Websites: महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी