Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी

तुमच्या जिल्ह्यातील गावातील कुणबी मराठा नोंदी येथे तपासा. पुन्हा मनोज जरांगे यांचे दौरे सुरु, काय असेल पुढील कुणबी मराठा आंदोलन दिशा? आता पर्यंतच्या सर्व घडामोडी व कुणबी दाखला कसा काढावा / सगेसोयरे कसा लाभ घ्यावा? पाहा ( ताजी अपडेटेड माहिती 👇)

By Ajit
16 Min Read
kunbi maratha nond district taluka list

नमस्कार मित्रांनो, सद्या महाराष्ट्र राज्यात कुणबी मराठा नोंदी Kunbi Nondi शोधण्याची सरकार दरबारी जोरदार मोहीम चालू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांना ओबीसी वर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी, ता.अंबड जि. जालना येथून साखळी उपोषण आंदोलन करून त्याची सरकारला दखल घेण्यास भाग पाडले.

याच मराठा आरक्षण चळवळ मधून मागील गेल्या काही दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यात गावनिहाय Kunbi Maratha Documents कुणबी नोंदी शोध मोहीम चालू आहे. मोडी लिपीत असलेल्या जुन्या नोंदी तपासून त्या नव्याने स्कॅन करून त्याची गाव जिल्हानिहाय ऑनलाइन माहिती महाराष्ट सरकारने सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे.

सद्या पुणे जिल्ह्यात भरपूर प्रमाणात ( १.४० लाख ) कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. [ २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत – अजून त्यात वाढ अपेक्षित आहे ]
पुणे जिल्ह्यात खेड आणि जुन्नर या दोन तालुक्यात सर्वाधिक कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील कुणबी मराठा नोंदी

https://pune.gov.in/kunbi-records-found-in-revenue-records/ या वेबसाईट वर पाहू शकता.

कुणबी मराठा नोंदी पुणे जिल्हा

वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण वेबसाईट ओपन केल्यावर आपला तालुका नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे आपणांस गावांची लिस्ट दिसेल त्यामधून आपले गाव निवडा.

कुणबी मराठा नोंदी तालुकानिहाय पुणे जिल्हा

गाव नावावर क्लिक केल्यावर पुढे नमुना १४ PDF फाईल्स दिसतील.

कुणबी मराठा नोंदी गाव नमुना १४

आता वरील इमेज मध्ये दिसत असलेल्या PDF फाईल वर क्लिक करून आपण स्कॅन केलेला डाटा तपासून पाहा. यामध्ये साधारण पूर्वीच्या १०० वर्षे जुन्या नोंदी चा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा 👉 : PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

कुणबी मराठा नोंदी तपासणी १३ कागदपत्रे

कुणबी मराठा नोंदी पडताळणीत सन १९६७ पूर्वीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. या Kunbi maratha nondi नोंदी तपासताना खालील १३ प्रकारची कागदपत्रे विचारात घेतली आहेत.

१) शाळा सोडल्याचा दाखला
२) सातबारा व ८ अ चा उतारा
३) जन्म मृत्यू च्या नोंदी
४) खरेदी – विक्री दस्त
५) कढई पत्रक
६) ग्राप पंचायत व महसूल दप्तरी असलेला खसरा पत्रक
७) पाहणी पत्रक
८) कुळ नोंदवही
९) हक्क नोंदणी
१०) पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंद
११) हक्क नोंदणी
१२) रेल्वे पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंद
१३) शेतवार तक्ता

आणि त्याचबरोबर भोर संस्थान चे रेकॉर्ड देखील विचारात घेतले आहे.

वरील कुणबी मराठा नोंदी असलेले दस्तावेज आपण तपासून तुमची जुनी कुणबी मराठा नोंद शोधू शकता.

मराठा कुणबी नोंदी पुणे सह इतर जिल्हे

आपण पुणे जिल्हातील रहिवासी असल्यास वर दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपण कुणबी मराठा नोंद शोधू शकता. त्याचप्रमाणेजर उर्वरित महाराष्ट भागातील इतर जिल्ह्याच्या कुणबी नोंदी सुद्धा आपण खाली दिलेल्या वेबसाईट लिंक ओपन करून पाहू शकता.

आता सर्वच जिल्ह्यामध्ये ऑनलाईन नोंदी उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत. तरीही आपण खालील वेबसाईटला वारंवार भेट देवून या maratha kunbi nondi नोंदी च्या अपडेट्स मिळवू शकता.

१) Kunbi Nondi Pune पुणे जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२) Ahmednagar Kunbi Nondi अहमदनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३) Nashik Kunbi Records नाशिक जिल्हा कुणबी मराठा नोंदी

४) Jalgaon Kunbi Nondi जळगाव जिल्हा कुणबी मराठा नोंदी

५) Satara Kunbi Nondi सातारा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

६) Sangali Kunbi Records सांगली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

७) Kolhapur Kunbi Nondi कोल्हापूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

८) Kunbi Nondi Solapur सोलापूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

९) Osmanabad Kunbi Nondi धाराशिव जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१०) Aurangabad Kunbi Nondi छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

११) Beed Kunbi Nondi बीड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१२) Jalna Kunbi Nondi जालना जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१३) Kunbi Nondi Hingoli हिंगोली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१४) kunbi nondi amravati अमरावती जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१५) Nandurbar Kunbi Nondi नंदुरबार जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१६) kunbi nondi latur लातूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१७) Akola Kunbi Nondi अकोला जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१८) Bhandara Kunbi Nondi भंडारा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१९) buldhana kunbi nondi बुलढाणा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२०) chandrapur kunbi nondi चंद्रपूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२१) dhule kunbi nondi धुळे जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२२) Gadchiroli Kunbi Nondi गडचिरोली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२३) gondia kunbi nondi गोंदिया जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२४) nanded kunbi nondi नांदेड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२५) parbhani kunbi nondi परभणी जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२६) mumbai suburban maratha kunbi nondi मुंबई उपनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२७) washim kunbi maratha nondi वाशीम जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२८) yavatmal kunbi maratha nondi यवतमाळ जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२९) palghar kunbi maratha nondi पालघर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३०) raigad kunbi maratha nondi रायगड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३१) ratnagiri kunbi maratha nondi रत्नागिरी जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३२) sindhudurg maratha kunbi nondi सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३३) nagpur maratha kunbi nondi नागपूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३४) wardha maratha kunbi nondi वर्धा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

मार्च मध्ये बऱ्याच जिल्ह्याची कुणबी मराठा लिस्ट ही वेबसाईट ला अपडेट झाली आहे. आता सगळ्याच जिल्ह्यांच्या नोंदी प्रकाशित झाल्या आहेत. पूर्वी काही नोंदी या  Google Drive PDF फॉर्मट मध्ये उपलब्ध होत्या परंतु त्यात अपडेट केल्यामुळे काही जुन्या लिंक्स ओपन होत नाहीत.

तरी आपण पुन्हा नवीन लिंक आल्यावर चेक करावे. लवकरच पेंडिंग जिल्हे लिस्ट अपडेट होईल, त्यासाठी आपण दररोज पुन्हा वर दिलेल्या लिंक वर भेट द्या. वर दिलेली लिस्ट वेळोवेळी अपडेट होत आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र अध्यादेश

👉 7th Sept 2023 Kunbi GR PDF

👉 3rd November 2023 Kunbi GR PDF

👉 25 Jan 2024 Kunbi maratha GR PDF – कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबत कार्यवाही करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत जी आर

Marathvada Kunbi GR

सद्या तरी मराठवाडा विदर्भ या भागातील जिल्ह्या साठी कुणबी प्रमाणपत्र जारी करणे बाबत अध्यादेश निघाले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठीही या पद्धतीचे maratha kunbi gr अध्यादेश जारी झाले आहेत, त्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे.

ज्या लोकांच्या जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांनी आपली वंशावळ तपासून त्याची प्रत, कुणबी दाखला संदर्भ प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेवून तहसील कार्यालयात सक्षम अधिकारी यांचे कडे कुणबी दाखला मिळणे बाबत चौकशी करावी.

थोड्याच दिवसांत आधार कार्ड नोंदणी सारखेच अभियान हे कुणबी दाखले वितरीत करणेसाठी गावोगावी मोहीम राबवून जनसामान्यांना दिले जातील. तोवर आपण जुने कुणबी नोंदी शोध घेत राहावे. काही गावी ही मोहीम राबवली गेली आहे, त्या द्वारे कुणबी दाखले वितरीत केले गेले आहेत. अजून व्यापक प्रमाणात याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

मराठा आरक्षण सर्वे

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची, तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने Android App द्वारे अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, सोशल मीडिया न्यूज मधुन लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले.

२३ जानेवारी ते २ फेब्रुवारी कालावधी मध्ये या सर्वे कामा साठी शिक्षक यांना नेमणूक केले होते. घरोघरी जावून प्रत्यक्ष भेट देवून प्रश्नावली विचारून लगेच दिलेल्या उत्तरानुसार ऑनलाईन अ‍ॅप मध्ये हा सर्वे डाटा जमा केला आहे.

कोणते एप वर हा सर्वे होत आहे ?

https://gipesurvey.com    👈  या वेबसाईट वर जावून याविषयी अधिक माहिती मिळेल.

त्याचवेळी या सर्वेक्षणवर ई-मेलच्या माध्यमातून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. कुणबी मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्यासंबधी अधिसूचनेवर ओबीसी समाजाकडून हरकती सादर केल्या, तर कुणबी मराठा समाजाकडून ना हरकत पत्र व ईमेल पाठवली गेली.

( कुणबी मराठा आरक्षण, नाहरकत पत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ला ईमेल पाठवा.  👉 📧Send Email  बटनावर क्लिक करा. हा विषय सद्या संपला आहे )

या हरकती आणि सूचनांचा अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने तयार केला आहे. या ओपिनियन पोलच्या (Opinion Poll) अहवालानुसार मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, असा दावा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

( कुणबी मराठा आरक्षण विचारणा, पीएमओ ऑफिस हेल्पलाईन दिल्ली सहाय्य विभाग ला ईमेल पाठवा.  👉 📧Send Email  बटनावर क्लिक करा. )

कुणबी मराठा प्रमाणपत्र जरांगे आंदोलन यशस्वी तरीदेखील अंतिम विजय नाही

🤘श्री मनोज जरांगे पाटील विजयी भव:🤘

श्री मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवली सराटी येथे सुरु होऊन पुणे मधून मुंबई वाशी येथे दाखल झाला आणि सरकारच्या शिष्ट मंडळ टीम शी चर्चा करून त्यात जवळपास सर्वच मागन्या अधिसूचना काढून मान्य झाल्या आहेत.

प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी यांनी भेट घेवून सर्वा समक्ष या आंदोलनातील मागण्या मान्य करून अधिकृत कायदेशीर पूर्तता केली. महत्वाचे म्हणजे सगेसोयरे या मुद्द्यावर देखील तोडगा निघाला. इथपर्यंत चा प्रवास जरी सकारात्मक वाटत असला तरी प्रत्यक्ष सत्य याहून वेगळे आहे.

२० फेब्रुवारी २०२४ ला एकदिवसीय विधिमंडळ अधिवेशन घेण्यात आले, आणि त्यात मराठा समाजाला १०% आरक्षण देण्याचे ठरवले गेले. त्याचबरोबर या १०% आरक्षण ला देखील पुन्हा कोर्टात टिकण्यासाठी कसोटी लागणार आहे. तसेच यावर देखील पुन्हा आक्षेप घेण्यात येत आहेत. सगेसोयरे मुदा वगळलेला आहे, आणि याच १०% आरक्षण मुद्द्यावरून पुन्हा मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते.

वरील सर्व घटनाक्रम होताना श्री मनोज जरांगे यांचे पुन्हा १० – १२ दिवस उपोषण झाले.  त्या नंतर २१ फेब्रुवारी ला आंतरवली सराटी मध्ये पुन्हा पुढील आंदोलन दिशा ठरविण्यात आली. सद्या हे आंदोलन स्थगित आहे. आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे सुरु केले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचे मागील सहा-सात महिन्यापासून शांततेत चाललेले आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करताना दिसत आहे. कुणबी मराठा समाज, ओबीसी समाज आणि सरकार मधील विविध प्रवक्ते यांच्या मध्ये मराठा आरक्षण विषयावर एकमेका विरोधात वारंवार कठोर टीका टिपण्णी होताना दिसत आहे.

मराठा समाज आपल्या मागन्यासांठी अजूनही मनोज जरांगे यांच्या सोबत दिसत आहे. प्रचंड अस्थिरता आणि सामाजिक उद्रेक समाजा मध्ये दिसून येत आहे. यावर लवकरच योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.

लवकरच पुढे लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे, नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्ष तयारी करत आहे. या सर्व धूम चक्री मध्ये मराठा समाजाला कसा लवकरात लवकर न्याय मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. मराठा समाज सर्वत्र उमेदवार निवडणुकीसाठी उभे करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान सद्याच्या राज्य शिक्षण मंत्रालयाकडून महाराष्ट राज्यातील मुलींना मोफत शिक्षण योजना जाहीर झाली आहे. परंतु जोवर अधिकृत जीआर जारी होत नाही, तोवर या विषयी हमी देता येत नाही.

जाणून घ्या सविस्तर माहिती – काय आहे मुलींना मोफत शिक्षण योजना?

राज्य सरकारची सगे सोयरे ची व्याख्या

सगे सोयरे या मुद्द्यावर लवकर एकमत होत नव्हते, शेवटी तडजोड करून सरकारने सगे सोयरे म्हणजे नेमके कोण? या वर सविस्तर निर्णय झाला, तो असा. सगेसोयरे हा वर्ग म्हणजे कुणबी दाखल्यासाठी अर्ज करणारा व्यक्तीचे वडील, आजोबा , पणजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये स्व जातीत झालेल्या लग्न नाते संबधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक.

👉 महाराष्ट्र राज्य सरकार सगेसोयरे जी आरMaratha Aarakshan Sage Soyare GR OBC Kunbi PDF

मराठा समाज हा गणगोता मध्ये विवाह करायचे, फार पूर्वी आंतरजातीय विवाह फारसे होत नव्हते, त्यामुळे ज्या जवळपासच्या नाते संबधातून लग्न होऊन नवीन नाती तयार झाली असे सर्व जन सगेसोयरे म्हणून संबोधले जातील. यासाठी पितृसत्ताक पद्धती ग्राह्य धरली जाईल.

कुणबी मराठा जात प्रमाणपत्र कागदपत्रे

लाभार्थी साठीचे पुरावे – ज्या लोकांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आणि जे लोक सगे सोयरे मधून कुणबी अर्ज करतील त्यांना या दाखल्यासाठी पुरावे म्हणून पुढीलप्रमाणे दस्त ऐवज सादर करावे लागतील.

  • कुणबी मराठा जातीची नोंद असेलेले पुरावे
  • कुणबी नोंद मिळालेल्या व्यक्तीच्या रक्त नाते संबधातील काका, पुतणे, भावकीतील नातेवाईक
  • पितृसत्ताक पद्धतीने पात्र असलेले सगेसोयरे यांनी शपथ पत्र पुरावा म्हणून द्यावा लागेल
  • कुणबी नोंद आढळलेल्या नागरिकाच्या पुढील पिढीला सजातीय विवाहातून निर्माण झालेल्या नातेसंबंध मधील नवीन सगेसोयरे यांस हा लाभ मिळेल.

जरांगे पाटील यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. पुन्हा आंतरवली सराटी येथे विजयी सभा घेवून जनतेला संबोधित केले जाईल. यापुढे कायमच कुणबी मराठा आरक्षण वर पाठीशी राहणार, काही अडी अडचण आल्यास त्यास सहकार्य करणार.

हे देखील वाचा 👉 : Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण माहिती

जागतिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि सर्वत्र जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद या आधी कोणत्याही नेत्यास अशाप्रकारे पाहायला मिळाला नाही. सर्व जगाने या आंदोलनाची दखल घेतली, सोशल मीडिया नेटकरी यांनी हे आंदोलन कायम चर्चेत ठेवले. पुढील घडामोडी येत्या काही दिवसांत समजतील आणि यातुन मराठा आरक्षण या वर कायमस्वरूपी योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.

Kunbi Maratha Nondi – Maratha Aarakshan – Manoj Jarange

कुणबी मराठा आडनावे

कुणबी दाखले मिळवण्यासाठी पूर्वीच्या जुन्या नोंदी शोधमोहीम चालू आहे. यामध्ये कुणबी आणि मराठा हे एकच आहे ही बाब वारंवार सिद्ध झाली. जुन्या नोंदी मध्ये ९६ कुळी मराठा आडनावे आणि कुणबी मराठा आडनावे यांच्या काही नोंदी आढळून आल्या आहेत. वेगवेगळ्या संदर्भा नुसार पुढे कुणबी आणि मराठा ही आडनावे दिली आहेत.

गोळेशेडगेगायकरमोरेकुराडे
भोयरधनावडेरसाळडोलासदेवरे
काळेखाडेजमदरेगोरीवालेजावळे
पाटीलवाघसातपुतेजाधवगाढवे
ढगेघराटेदेशमुखविधातेबनकर
कोरेचांदेशेलारशेंडेवारे
मानेशेंडेशिरोळेजगतापडांगे
भोईरकाकडेबुर्डेपटोलेपाचपुते
जोगळेकदमभोसलेचौधरीशिंदे
कुऱ्हाडेरोकडेमहालेभगतसावंत

आपण आपली कुणबी मराठा नोंद तपासली का ? कुणबी मराठा प्रमाणपत्रामुळे भविष्यात नक्कीच उच्च शिक्षण तसेच सरकारी नोकर भरती मध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवार यांस भरघोस लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

हे ही पाहा👉 : MHADA Recruitment 2024: म्हाडा भरती अधिसूचना, ऑनलाईन अर्ज प्रकिया व अपडेट्स

आपणांस हि महिती कशी वाटली, कुणबी मराठा प्रमाण पत्रामुळे खरेच अमुलाग्र बदल होतील का ? आपण आपले मत कमेंट मध्ये नोंदवू शकता. आपल्या मराठी समाज बांधवा पर्यंत ही पोस्ट ✍️ शेअर करा. कुणबी नोंदी शोधण्यास यामुळे मदत होईल.

धन्यवाद.🙏

Share This Article
By Ajit
Follow:
जय शिवराय. वेब डिझायनर आणि ब्लॉग कंटेंट क्रीयटर, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग मधील अनुभव. समाज माध्यमांतील विविध विषयांवर उपयुक्त प्रगल्भ लिखाण काम करणे.
28 Reviews
  • Sanjay Shinde says:

    Jalgaon jilha yawal tahsil maratha kunbi nondi, old Birth – Death & school register site var uploaded nahi aahe kevha hoil

    Reply
  • लिंबाजी कामाजी जाधव says:

    हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यातील कुपटी ह्या गावाच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत

    Reply
  • नंदकिशोर जाधव says:

    नोंदी वाचता येत नाही त्याचं काय करायचं कसं कळणार आमची नोंद कोणी आहे का नाही ते

    Reply
    • Geetanjali Narayan chavan says:

      Nodi ajun upload ka nhi zaltat? Hingoli jilhyatol kalamduri talukyatil nandPur gavch nodi nhit

      Reply
  • Prakash Eknath Sarkale says:

    Mam/ Sir Bhum talukyatil Devgaon, Kalam talukyatil Dhoki Devlali ya gawanchi pan kunbi chi list upload jhali nahi so pl

    Reply
  • लिंबाजी कामाजी जाधव says:

    वसमत तालुक्यातील कुपटी या गावाच्या नोंदी सापडत नाहीत

    Reply
  • Arjun babar says:

    Karad taluka chi list open hot nahiye
    Kadhiparyant uplode hoil list

    Reply
  • Dnyaneshwar says:

    माढा तालुका कव्हे गावातील नोंदी आहेत पण दस्तावेज लोड केलेले नाहीत

    Reply
  • Omkar says:

    संभाजीनगर मधे कन्नड चे काही गाव अपडेट नाही

    Reply
  • Manoj says:

    Ratnagiri District chya nondi open nahi hot.. Delete kelela msg yetoi..

    Reply
    • Reshma says:

      हो,सद्या जुनी कुणबी pdf file रिमुव्ह केली आहे, लवकरच नवीन फाईल अपलोड होईल. पुनःपुन्हा चेक करत राहावे.

      Reply
      • Manoj says:

        Dear Madam..Don diwas zale pan kunbi Maratha Ratnagiri pdf file ajun upload nahi zaleli disat.. Tumcha hatat asel tar Krupaya lavakar upload karavi…nahitar kute followup ghyawa lagel te sanga….

        Reply
      • pradeep says:

        जुनी फाईल का डिलिट केलीय

        Reply
        • Reshma says:

          रत्नागिरी ची कुणबी नोंदी फाईल वरूनच gov साईट वरून रिमुव्ह झाली आहे. नवीन फाईल आल्यावर ताबडतोब अपलोड केली जाईल.कृपया प्रतीक्षा करा.

          Reply
          • Manoj says:

            Dear Madam…Ratnagiri districtrict chi file ajun upload nahi zaleli disat…NIC help desk pan call uchalat nahi…District Collecter NIC site la contact kara mhantat…file kadi disel madam

          • Reshma says:

            ratnagiri kunbi nondi रत्नागिरी जिल्हा कुणबी नोंदी अपडेट झाल्या आहेत.

          • Sachin Deshmukh says:

            अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव मधून कूणबी नोंद सापडलेली नाही देशमुख यांच्या.

  • Shivraj Khillari says:

    बुलढाणा जिल्हा कुणबी नोंदी कधी टाकल्या जातील

    Reply
    • Reshma says:

      बुलढाणा कुणबी लिस्ट अपडेट झाली आहे, पुन्हा कुणबी यादी पाहा.

      Reply
  • Ramesh powar says:

    धन्यवाद. खूप छान माहिती शेअर केली. एकाच जागी सर्व जिल्हे कुणबी माहिती सापडली. वेळ वाचला, अडपेड लवकर पाठवा काही जिल्हे अजून डाटा आला नाहीये.

    Reply
    • Reshma says:

      हो. नक्कीच आपले फीडबॅक विचारात घेवून लिस्ट अपडेट केली जाईल.

      Reply
      • Swapnil says:

        Satara jilha phaltan tahsil maratha kunbi nondi khup aahe pan site var uploaded nahi aahe kevha hoil

        Reply
        • Reshma says:

          शासकीय पातळीवर कुणबी नोंदी अपडेट होत असतात, सद्या वेबसाईट वर ज्या कुणबी नोंदी प्रकाशित केल्या आहेत त्या जुन्या सर्वे नुसार आहेत. अलीकडील नव्याने सापडलेल्या नोंदी लाईव्ह वेबसाईट ला अपडेटेड नाहीत. त्यामध्ये अजून बरीच वाढ अपेक्षित आहे. तरी ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांनी गाव पातळीवर तहसील कार्यलयात जावून कुणबी प्रमाणपत्र दाखल्यासाठी फॉलोअप घ्यावा.

          Reply
  • गणपत कुंडलीक जाधव says:

    वाशिम जिल्हात कुणबी नोंदी दिसत नाहीत .

    Reply
    • Reshma says:

      वाशीम जिल्हा कुणबी लिस्ट अपडेट झाली आहे. अजून काही जिल्या मध्ये कुणबी लिस्ट gov वेबसाईट ला अपडेट केली नाही. लवकरच अपडेट होईल. तरी आपण काही दिवसानंतर पुन्हा भेट देवून चेक करावे.

      Reply
      • केशव says:

        सोलापूर जिल्हा मध्ये करमाळा तालुका मध्ये अजून काही गावे अपडेट् झाली नाहीत

        Reply
        • Reshma says:

          पुढील थोड्याच दिवसांत लिस्ट अपडेट होईल, पुन्हा कुणबी यादी पाहा.

          Reply
    • सचिन नालुगडे says:

      शाहुवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी गावची नोंदी नाहीत अजुन

      Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version