भारत १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन (15 August 2024 Independence Day of India) साजरा करणार आहे. या दिवसाचे आपल्यासाठी विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्रदिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी संपूर्ण देश तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो. त्या निमित्ताने आपणा सर्वाना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारतीय स्वातंत्र्य दिन
Independence Day of India: भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट (15 August 2024) रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
या गौरवार्थ हा दिवस ‘स्वातंत्र्यदिवस’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट हा भारतातील ‘राष्ट्रीय सण’ असुन या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते.
तसेच, २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या दिवशी सर्व नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाते.
यानिमित्ताने शाळा, कार्यालये, शासकीय संस्थांमध्ये तिरंगा फडकावला जातो, तसेच तरुणांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावे यासाठी भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतीय स्वातंत्रदिन २०२४ (Independence Day of India 2024) साजरा होत असताना सर्वसामान्यांपासून ते सरकारपर्यंत सर्वजण या दिवसाची तयारी करत असतात.
याच दिवशी ब्रिटीश राजवटीच्या गुलामगिरीच्या साखळीने जखडलेल्या भारताने प्रथमच मुक्त आकाशाखाली स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला सुरुवात केली.
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन घरापासून ते शाळा, महाविद्यालय, खाजगी, सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्था, रुग्णालय अशा सर्वत्र ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा केला जातो.
देशभरात स्वातंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. सर्वत्र ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७
The Indian Independence Act 1947: भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंगडम (यूके) संसदेने शासन केला. न्यायालयीन सार्वभौमत्व भारतीय संविधान सभेकडे हस्तांतरित करण्यात आले.
किंग जॉर्ज सहावा, राणी एलिझाबेथ ११ चे वडील, संपूर्ण रिपब्लिकन संविधानात देशाचे प्रसारण पूर्ण होईपर्यंत राज्याचे नेतृत्व करत राहिले.
आज ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश प्रशासनापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताने कठोर संघर्ष केला.
भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे ‘भारताचे स्वातंत्र्य’, अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व त्यांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिन इतिहास
History of India Independence Day: भारत २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीशांच्या ताब्यात होता. देशाला परकीय राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळवायचे होते.
१८५७ मध्ये, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कायद्याच्या विरोधात, पहिले धर्मयुद्ध झाले. पुढे, भारताच्या स्वातंत्र्याच्या मोहिमेला भारतीय विद्रोह, १८५७ चे विद्रोह, महान बंड आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध अशी अनेक नावे देण्यात आली.
ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यात ‘मोहनदास करमचंद गांधी’ (महात्मा गांधी) यांची भूमिका महत्त्वाची होती. देशभरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांचे अनुकरण केले.
शेवटी १५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वातंत्र झाला. ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ हे स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
भारतीय राष्ट्रध्वज माहिती
Indian National Flag Information: २२ जुलै १९४७ रोजी म्हणजेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आगोदर भारतीय राष्ट्रध्वज अंगिकारला गेला. आणि तो ध्वज (तिरंगा) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला.
भारतीय राष्ट्रध्वजात (Indian National Flag) गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे असून तो आयताकृती आहे. म्हणूनच भारतीय ध्वजाला तिरंगा असेही संबोधले जाते. तिरंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र असून त्यात २४ रेषा असतात.
मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या ‘पिंगली वेंकय्या’ यांनी भारतीय राष्ट्रध्वजाची (तिरंगाची) रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वज हा ३:२ लांबी व उंची असलेला आहे.
राष्ट्रध्वज हा खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा, असा सरकारी नियम आहे. स्वातंत्र देशासाठी राष्ट्रगीत,राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय बोधचिन्ह खूप महत्त्वाची असतात. त्याशिवाय देशाचे अस्तित्व काहीच नसते.
भारतीय राष्ट्रध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची आयताकृती रचना करण्यात आली असून, त्यात असलेल्या तीन रंगाचे महत्व पुढे पाहूयात.
१. भारतीय राष्ट्रध्वजाचा वरच्या भागात गडद केशरी रंग आहे या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
२. मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
३. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निष्ठा व समृध्दी,चा बोध होतो.
४. अशोक चक्र हे निळ्या रंगात असून, निळा रंग आकाश आणि महासागराच्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो.
स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे अनेक मार्ग
Multiple Ways to Celebrate Independence Day: स्वातंत्रदिन साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत, ते आपण पुढे पाहूयात.
ऐतिहासिक स्थळ सहल योजना करा: तुम्ही जवळच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देवून त्यांची माहिती आणि इतिहास जाणून घेवून या सहलीचा आनंद घेवून स्वातंत्र दिन साजरा करू शकता.
ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहा: दिल्ली शहराच्या आसपास राहणारे लोक स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीला एक छोटा प्रवास करण्याचा विचार करू शकतात, जो पाहण्यास सुंदर आहे.
देशभक्तीपर सिनेमा पहा: भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या संघर्षावर आधारित अनेक चित्रपट आहेत ते सर्वांनी या दिवशी बघितले पाहिजेत तसेच देशभक्ती ची गाणी ऐकली पाहिजेत.
गरीब गरजूंना मदत करा: १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी आपण गरीब आणि गरजू लोकांना मदत करू शकतो. लहान मुलांना शिक्षणासाठी लागणारे आवश्यक साधने उपलब्ध करून देवू शकता.
शाळेत खाऊ, कपडे तसेच औषधे यांचे वाटप तुम्ही करू शकता. इ. प्रकारे अनेक सोप्या मार्गांनी हा ऐतिहासिक दिवस आपण साजरा करू शकतो.
भारतीय स्वातंत्र्य दिन शुभेच्छा
Independence Day India Wishes Marathi: Whatsapp Status, Facebook, Instagram Story अशा वेगवेगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या या स्पेशल शुभेच्छा तुम्ही शेअर करु शकता.
Happy Independence Day Quotes In Marathi:
१. सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप
१५ ऑगस्टनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
२. स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
३. बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
४. देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
५. जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे, हा अभिमान सर्वाना असला पाहिजेल. तरुणांनी सतत भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम केलेच पाहिजेल. त्यासाठी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. या दिवशी प्रत्येकाने निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ पवित्र ध्वजाच्या साक्षीने घेतली पाहिजे.
आपल्या भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीसाठी १९४७ हे वर्ष म्हणजे ऐतिहासिक आहे.
या ऐतिहासिक सालाच्या पवित्र घटनांच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. तसेच कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि केलाच पाहिजेल.
जय हिंद, जय महाराष्ट्र जय भारत !
धन्यवाद!
हे देखील वाचा: Shivrajyabhishek Sohala Date: शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून ला किल्ले रायगड येथे साजरा होत आहे