सरकारी नोकर भरती – ऑगस्ट व सप्टेंबर २०१५

By Reshma
2 Min Read
सरकारी नोकर भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे विविध पदाच्या 32 जागा – अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (32 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.nagarcollector2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 भारतीय तट रक्षक दल नाविक भरती – अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2015

भारतीय तट रक्षक दलामध्ये दहावी उर्त्तीण झालेल्यांसाठी नाविक म्हणून उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे प्रतिनियुक्तीने विविध पदाच्या 12 जागा – अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे जलस्वराज्य-2 कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष कार्यालयात प्रतिनियुक्तीने वित्त नियंत्रक (1 जागा), कार्यकारी अभियंता (1 जागा), संनियत्रण व मूल्यमापन तज्‍ज्ञ (1 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (1 जागा), सहाय्यक संनियत्रण व मूल्यमापन तज्‍ज्ञ (2 जागा),संपादणूक तज्ज्ञ (1 जागा), लघुलेखक (नि.श्रेणी) (1 जागा), शिपाई (1 जागा),

अधीक्षक अभियंता (1 जागा), कार्यकारी अभियंता (1 जागा) या पदासाठी योग्य मार्गाने (कार्यालयामार्फत/प्रशासकी सरकारी नोकर भरती – ऑगस्ट व सप्टेंबर २०१५य विभागामार्फत) अर्ज करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती

www.water.maharashtra.gov.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ पदाच्या 4 जागा – अंतिम तारीख 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2015

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंर्तगत सार्वजनिक आरोग्य खाते व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ (4 जागा) या पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2015 या कालावधीत स्वीकारले जातील. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 3 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version