Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी विशेष संपूर्ण माहिती सविस्तर वाचा

गणेश चतुर्थी 2024: शुभ मुहूर्त, आरतीसंग्रह, पूजा व उपाय, गणेश विसर्जन तारीख आणि बाप्पासाठी प्रसाद, महत्व, इतिहास या विषयी सर्व जाणून घ्या.

Reshma
By Reshma
13 Min Read
गणेश चतुर्थी

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

यंदा गणेश चतुर्थी शनिवार दिनांक. ७ सप्टेंबरला आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) हा वार्षिक हिंदू सण देशभर उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण वर्षभर गणेश चतुर्थीची लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

गणेश चतुर्थी माहिती

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाचा अवतार झाला, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी (ganesh festival) हा सण दरवर्षी या तिथीला साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते.

हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण गणपतीचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो, तर अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव १० दिवस चालतो.

श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ पूजा, आरती केली जाते. दररोज आरतीच्या शेवटी बाप्पाला त्यांच्या आवडीचा भोग दाखवून सर्वाना प्रसाद वाटला जातो.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन (गणेश विसर्जन 2024) पवित्र नदीत किंवा घरातील पाण्यात (टपात) केले जाते.

गणेश चतुर्थी चे महत्व सांगायचे तर, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवातील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते, असे म्हटले जाते.

या खास निमित्ताने देशभरात विशेष उत्साह, आनंद पाहायला मिळतो. सगळीकडे गणपती बाप्पाची मंदिरे सजवले जातात. बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सर्वजन करत असतात. शहरात गणपती डेकोरेशन साहित्य, गणपती मूर्ती, प्रसाद, मिठाई, फुले, हार, तोरण, इ.नी बाजारपेठ सजते.

गणेश चतुर्थी 2024 कधी आहे?

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०१ वाजता सुरू होईल, तर तारीख ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०५:३७ वाजता संपेल. अशा स्थितीत शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त २०२४

Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat:

शुभ मुहूर्त २०२४: शहरनिहाय पूजेच्या वेळा, द्रिक पंचांग नुसार, गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०३ ते दुपारी १:३४ पर्यंत आहे.

शहरनिहाय पूजेच्या वेळा 

पुणे – सकाळी ११:१८ ते दुपारी ०१:४७ पर्यंत

मुंबई – सकाळी ११:२२ ते दुपारी ०१:५१ पर्यंत

नवी दिल्ली – सकाळी ११:०३ ते दुपारी ०१:३४ पर्यंत

गुडगाव – सकाळी ११:०४ ते दुपारी ०१:३५ पर्यंत

नोएडा – सकाळी ११:०३ ते दुपारी ०१:३३ पर्यंत

चेन्नई – सकाळी १०:५३ ते दुपारी ०१:२१ पर्यंत

जयपूर – सकाळी ११:०९ ते दुपारी ०१:४० पर्यंत

हैदराबाद – सकाळी ११:०० ते दुपारी ०१:२८ पर्यंत

चंदीगड – सकाळी ११:०५ ते दुपारी 01:36 पर्यंत

कोलकाता – सकाळी १०:२० ते दुपारी १२:४९ पर्यंत

बेंगळुरू – सकाळी ११:०४ ते दुपारी ०१:३१ पर्यंत

अहमदाबाद – सकाळी ११:२३ ते दुपारी ०१:५२ पर्यंत

दरम्यान, चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०१ वाजता सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५:३७ वाजता समाप्त होईल.

गणेश चतुर्थी 2024: गणपतीला भोग

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही गणपतीला मोदक, लाडू, पुरणपोळी, खीर आणि सुपारी हे भोग म्हणून देऊ शकता. मोदक हे गणपतीचे सर्वात आवडते पदार्थ आहेत. किंबहुना, गणपतीच्या मूर्ती अनेकदा हातात मोदक घेतलेल्या दिसतात.

गणेश चतुर्थी 2024: गणेश विसर्जन तारीख

यंदा गणेश चतुर्थीचा १० दिवसांचा उत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.

सकाळचा मुहूर्त – सकाळी ९:११ ते दुपारी १:४७

दुपारचा मुहूर्त – दुपारी ३:१९ ते ४:५१ पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त – ७:५१ ते रात्री ९:१९

रात्रीचा मुहूर्त – १८ सप्टेंबर १०:४७ ते पहाटे ३:१२ पर्यंत

चतुर्दशी तिथी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:१० वाजता सुरू होईल आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:४४ वाजता समाप्त होईल.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

श्री संत ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’, असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवत गीतेत श्री गणेशाला ‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा’ याप्रमाणे वंदन केले आहे. तर संत नामदेवांनी ‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’, असे म्हटले आहे.

प्रथम गणेशपूजन का करतात ?

श्री गणेश दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व आणि अधर अशा दोन दिशा आहेत. इतर देवता श्री गणेशांच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत, म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपती पूजन (श्री गणेशा) करतात.

श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो, पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड’ होय.

पूजेत नेहमी डाव्या सोंडेचा गणपती का ठेवावा ?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. कारण, उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते. याउलट डाव्या सोंडेचा गणपती शीतल तसेच अध्यात्माला पूरक असतो, यांची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थी पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणातील कथेनुसार गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे.

१. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत अधिक असते.

२. गणपती घरी बसवत असाल तर १ फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी.

३. गणेश मूर्ती शक्यतो पाटावर बसलेली, सिंहासनावर किंवा लोडला टेकून बसलेली विश्राम अवस्थेतील व हातात पाश अंकुश धारण केलेली असावी.

४. मासा, साप, गरुड तसेच युद्ध करताना आणि वेगवेगळ्या आकारांची मूर्ती घेवू नये.

५. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती अशी मूर्ती मुळीच घेवू नका. कारण शास्रात शिव पार्वतीची पूजा लिंग स्वरुपात केली जाते.

६.  गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मांसाहार, मद्य इ. करू नये.

७. घरी गणपती आणताना गणपतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आणू नये.

८. गणेशमूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी, त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन भक्तांना अधिक लाभ होतो.

९. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवद्य देखील चालतो. दही, साखर, भात हा उत्तम नैवद्य आहे.

१०. बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक काढताना नेहमी भजन, टाळ, मृदुं, अभंग म्हणावेत.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावीत ?

बाप्पाला दुर्वा, आघाडा, लालफूल हे आवडतात. दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत गणेशाची शक्ती आकृष्ट होऊन मूर्ती जागृत होते. मूर्तीला देवपण येते.

दूर्वा नेहमी ताज्या, कोवळ्या, लहान आकाराच्या असाव्यात, दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. तसेच  ११, २१, ५१, १०८ अशा दुर्वांची एकत्र जुडी करून ती गणेशाला अर्पण केली जाते. दुर्वांचा हार सुद्धा बाप्पांना घातला जातो.

गणपतीचा वर्ण लाल असल्यामुळे गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरल्या जातात.

गणेश चतुर्थीला हे उपाय करा

१. गणपतीला दुर्वा आवडतात असे मानले जाते. अशा वेळी गणेश चतुर्थीच्या पूजा थाळीत दुर्वाचा अवश्य समावेश करा. दुर्वा अर्पण करताना ‘श्री गणेशाय नमः दूर्वांकुरं समर्पयामि’ या मंत्राचा मनापासून जप करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि साधकाचे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.

२. गणेश चतुर्थी हा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला सकाळी स्नान करून गुळाच्या २१ लहान गोळ्या कराव्यात. पूजेच्या वेळी गणेशाला अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

३. मोदक, लाडू, शेंदूर हे देखील बाप्पांना खूप प्रिय आहे, म्हणूनच या गोष्टी गणेश चतुर्थीला बाप्पाला मनापासून अर्पण करा.

४. गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष यांचे रोज पठन करा.

श्री गणेश आरती संग्रह आणि नाम जप

गणेश चतुर्थीच्या काळात आरती सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेत केली जाते. आरती म्हणताना ती अगदी मनापासून भावपूर्ण, आर्ततेने म्हटली पाहिजे. कुठलाही कर्कश व खूप मोठा आवाज नको. आरती नेहमी अचूक म्हणावी, तुम्हाला आरती येत नसेल तर म्हणू नका ती नीट ऐका व आनंद घ्या.

खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशांचा नाम जप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो.

गणेश चतुर्थीच्या काळात पुढील मंत्र जप सकाळ संध्याकाळ या वेळेत करावा.

१. ॐ गँ गणपतये नमः

२. श्री गणेशाय नमः

३. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा।

४. ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा !

५. ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

हे देखील वाचा: Krishna Janmashtami in 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमी सण, तिथी आणि विधी यांचे महत्त्व

श्री गणेश आरती संग्रह

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

घालीन लोटांगण वंदिन चरन

घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।

कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करु काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वराबा तु घाल पोटी ॥

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया..!

गणेश चतुर्थी शुभेच्छा, संदेश, बॅनर, इमेजेस

Ganesh Chaturthi Wishes, Messages, Banners, Images:

१.

ganesh chaturthi 2024
ganesh chaturthi 2024

२.

ganesh chaturthi Banner
ganesh chaturthi Banner

३.

ganesh chaturthi Festival wishes
ganesh chaturthi Festival wishes

४.

ganesh chaturthi Festival
ganesh chaturthi Festival

५.

ganesh chaturthi Images
ganesh chaturthi Images

६.

ganesh chaturthi Marathi Wishes
ganesh chaturthi Marathi Wishes

७.

ganesh chaturthi masseges
ganesh chaturthi masseges

८.

ganesh chaturthi shubhechya
ganesh chaturthi shubhechya

९.

ganesh chaturthi Wishes
ganesh chaturthi Wishes

१०.

ganesh sthapana banner
ganesh sthapana banner

११.

ganesh sthapana shubhechya
ganesh sthapana shubhechya

१२.

ganesh sthapana wishes
ganesh sthapana wishes

१३.

happy ganesh chaturthi Banner
happy ganesh chaturthi Banner

१४.

happy ganesh chaturthi wishes
happy ganesh chaturthi wishes

१५.

happy ganesh chaturthi
happy ganesh chaturthi

मित्रांनो, वरील सर्व शुभेच्छा इमेजेस, बॅनर तुम्ही वाचा आणि इतरांना पाठवून त्यांना गणेश चतुर्थी च्या खास शुभेच्छा द्या.

धन्यवाद!

हे पण वाचा: https://www.ejanseva.com/hartalika-aarti/

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
2 Reviews
  • ajit says:

    Best information about Ganesha God – ganpati bappa morya.

    Reply
  • Anonymous says:

    Visitor Rating: 5 Stars

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *