Free Education for Girl Child In Maharashtra 2024: मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती

आता महाराष्ट्र राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण, येत्या जून पासून मिळणार थेट प्रवेश, पहा काय आहे योजना ?

By Reshma
6 Min Read
मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४

राज्यात कमी उत्पन्न असलेल्या म्हणजेच ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण (Free Education for Girl Child In Maharashtra 2024) मिळणार आहे.

आता पालकांना मुलींसाठी १ रुपया पण शिक्षणावर खर्च करायची गरज नाही. मुलींच्या शिक्षण खर्चाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जुन २०२४ पासून मुलींच्या शिक्षणाचा (mulina mofat shikshan) संपूर्ण खर्च आता राज्य सरकार द्वारे केला जाणार आहे.

मित्रांनो, पुढे पाहूयात काय आहे मुलींना मोफत शिक्षण योजना (Free Education for Girls Scheme २०२४) आणि त्यासाठी काय असणार अटी, निकष, पात्रता आणि कागदपत्रे सविस्तर माहिती.

मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ संपूर्ण माहिती

Girls Free Education Scheme 2024 Full Information: मुलींना मोफत शिक्षण या योजनेची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून, येत्या जुन २०२४ पासून या योजनेचे लाभ राज्यातील गरीब मध्यमवर्गातील मुलींना होणार असून, आता सगळ्याच मुलींना उच्च शिक्षण अगदी मोफत घेता येणारआहे.

इंजिनीयरिंग, मेडीकल, तंत्रशिक्षण सारख्या न परवडणाऱ्या, खर्चिक शिक्षणा सोबत एकूण ८०० कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालये यांच्या प्रवेश शुल्कात भरमसाट वाढ झाल्याची दिसत आहे. यामुळे गरीब, मध्यम वर्गातील मुली-मुले अतिशय हुशार असून देखील केवळ प्रवेश फी अधिक असल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित झाल्याचे दिसत आहे.

महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त झालेली जनता मराठा योध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणा साठी आंदोलन उभारून लढा देत आहे.

जाणून घ्या – काय आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि पुढील दिशा?

म्हणूनच गरीब, मध्यम वर्गातील मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या योजनेमुळे राज्यातील सर्वच मुली उच्चशिक्षित होणार आहे.

योजनेचे नावमुलींना मोफत शिक्षण योजना : Free Education for Girl Child In Maharashtra 2024
राज्यमहाराष्ट्र राज्य
वर्ष२०२४ - २०२५
घोषणाउच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सुरुवातजून २०२४
उद्देशगरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे
लाभमेडिकल, तंत्रशिक्षण, इंजिनियरिंग सारख्या ८००+ कोर्स मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी.
लाभार्थीगरीब कुटुंबातील महाराष्ट्रातील सर्व मुली

मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ पात्रता निकष

Free Education For Girl In Maharashtra 2024 Eligibility Criteria:

मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे:

१. मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असावे.
२. महाराष्ट्र राज्यातील मुली ह्या योजनेसाठी पात्र असतील. मुलींचे आई वडील महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असावेत.

पात्र मुलींना येत्या जून २०२४ पासून उच्च शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे.

मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे

Free Education For Girl In Maharashtra 2024 Documents: मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  1. अर्जदार मुलीचे आधार कार्ड.
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र/ दाखला.
  3. रहिवासी प्रमाणपत्र / डोमासाइल प्रमाणपत्र.
  4. शाळा सोडल्याचा दाखला (TC).
  5. मागील वर्षाचे गुणपत्रक/मार्कशीट.
  6. मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.

आवश्यक कागदपत्रे हे जून महिन्याच्या आधीच जमा करून ठेवल्यास प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार नाही. तसेच वरील कागदपत्रे हि मूळप्रत सह झेरोक्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश

मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ शाळा, महाविद्यालय प्रवेश माहिती

Girls Free Education Scheme 2024 School, College Admission Information:

मोफत शिक्षण योजने अंतर्गत राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. यामध्ये Private Schools, CBSC School, Government Schools Colleges  यांसारख्या शाळा कॉलेजमध्ये फ्री शिक्षण (Free Education) घेता येणार आहे.

ह्या योजनेचा लाभ जून २०२४ पासून घेता येणार आहे. मोफत प्रवेश प्रक्रिया (free Admission Process) जून पासूनच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चालू होणार आहे.

प्रवेश घेताना या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, तुम्हाला हव्या त्या कॉलेज मध्ये प्रवेश करताना Admission Form सोबतच वर दिलेल्या कागदपत्रे जोडायची आहे. सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.

मुलींना मोफत शिक्षण केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच

राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९०६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू असून, कला, वाणिज्य, विज्ञान इ. पारंपारीक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण तसेच औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या अखत्यारितील शिक्षण संस्थांमध्ये राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक, व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC), इतर मागास प्रवर्ग (OBC) इ. मुलींना परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क यामध्ये  ५० %  सवलती ऐवजी १०० % सवलत शासन देणार आहे.

मुलींना मोफत शिक्षण ऑनलाईन अर्जप्रक्रिया

Mulina Mofat Shikshan Yojana Online Apply: मुलीना मोफत शिक्षण या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. सर्व पात्र मुलींनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. त्या पोर्टलवर जाऊन सगळी माहिती व्यवस्थित वाचून अर्ज सबमिट करायचा आहे.

महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज येथे करा: https://mahadbt.maharashtra.gov.in/

Ladli Behna Yojana in Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना प्रतीमहिना मिळणार १५०० रुपये

पालकांनो, जर तुमच्या कुटुंबात मुलगी असेल तर ‘मुलींना मोफत शिक्षण’ (mulina mofat shikshan yojana) या योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा.

तसेच इतर गरीब मुलींना या योजनेचा फायदा व्हावा, असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही हा लेख महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पाठवा या मुळे आपल्या मुली, बहिणी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्या उच्च शिक्षित होतील.

हे देखील वाचा: नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार (२०२३-२०२४)

धन्यवाद.

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
23 Reviews
  • Reshma Rathod says:

    Ya yojana sathi cast certificate avashk aahe ka

    Reply
  • Maya says:

    Maz m. Com complete ahe ani after marrige ya scheme ne pudhe education suru kru shkte kaa?? Addmissin ghu shakte ka?

    Reply
  • Rina says:

    Mala ya varshi bsc nursing sathi Terna nursing college Mumbai hi university allot zaleli ahe kal maza selection zala ahe tar sc category bsc nursing fees 70k ahe baki caste sathi 3L. tar mala girls free education scheme cha labh ya college madhe admission ghetani hoil k Mazi admission fees maaf hoil ka please. Mazya kade ya scheme sathi lagnare sarva documents ready ahet family annual income sudha 8L Peksha Kami ahe mi sc category chi female student ahe maharastra madhun.

    Reply
  • Pragati says:

    Ata mi engineeringchya shevtchya varshala ahe tr mg mi hyasathi patr ahe ka fkt je nvin admission honar ahet tyach muli patr ahet

    Reply
  • Kripa chaphekar says:

    Amcha utpnna 1 lakh asun sudha mza mulila Amcha ethil private college phi mphi kryla tyar nihi..MLA Kay karta yeil mam..plz sanga

    Reply
  • Jyoti says:

    Kasa apply karaych

    Reply
    • Reshma says:

      महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टला भेट द्या. वर वेबसाईट लिंक दिली आहे.

      Reply
  • Dadasahe says:

    mbbs नंतर PG साठी पण आहे का फ्री

    Reply
  • अश्विन says:

    आम्ही ओपन कास्ट मध्ये आहोत आणि माझी मुलगी 10 नंतर खाजगी डिप्लोमा कॉलेज मध्ये प्रवेश घेत आहे तर तिला पण ही योजना लागू होईल का.. कृपया आपणाकडून योग्य ते मार्ग दर्शन मिळावे… 🙏🙏

    Reply
  • Priyanka says:

    Majha engineering(BE) 2018 madhe jhala. Aata mi ya scheme madhun ME sathi admission gheu shakte ka

    Reply
  • Shraddha Rajendra Kumbhar says:

    Hi yojna private colleges na lagu hote ka

    Reply
    • Reshma says:

      नक्कीच या योजनेविषयी अधिक माहिती लवकरच आपल्या पोस्ट मध्ये अपडेट होईल. सरकारी आणि प्रायवेट दोन्ही ठिकाणी काही अभ्यासक्रमात फी माफी घोषणा सरकारच्या वतीने केली आहे, पुढे विधानसभा निवडणुका देखील आल्या आहेत, त्यामुळे या आणि इतर योजना नक्की मार्गी लागतील अशी आशा आहे. अपडेट साठी वारंवार वेबसाईटला भेट द्यावी. धन्यवाद.

      Reply
    • Dddasaheb says:

      mbbs नंतर PG साठी पण आहे का

      Reply
  • Gajanan Dable, Nagpur says:

    hi yojana private medical colleges madhe lagu honar ka?

    Reply
    • Dadasaheb says:

      Mbbs नंतर PG साठी पण आहे का फ्रि शिक्षण

      Reply
  • Payal ahire says:

    हया योजनेचा लाभ इतर राज्यातील कोलेज ला लागु होनार का नाही.

    Reply
    • Aamhala utppana nahi aahe tr hee scheme lagu hoil ka ml me aata diploma madhe aahe

      Reply
      • Reshma says:

        होईल, कमेंट मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ती पाहावी.

        Reply
    • Reshma says:

      नाही, महाराष्ट्र शासन योजना इतर राज्यांना लागू होत नाहीत.

      Reply
  • Sneha says:

    Maz admission magchy year l zaly tr mi sudha hy yojna mde shbhagi asel

    Reply
    • Reshma says:

      होय, सरकारने ठरवून दिलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमात जर तुम्ही बसत असाल तर पुढील वर्षांचे शिक्षण मोफत होऊ शकते.

      Reply
      • Anjali Gapat says:

        माझ्या मुलीचे एडमिशन २०२२ मधे मेडिकल ला झाले आहे ती ह्या स्कीम मधे सहभागी होउ शकते का??

        Reply
  • sonali says:

    2019 mdhe gradution zaly tyntr free education scheme mdhe me admission gheu shkty ka

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version