Krishna Janmashtami in 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमी सण, तिथी आणि विधी यांचे महत्त्व

Gokulashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला या साध्या पद्धतीने करा पूजा, भगवान श्री कृष्ण होणार तुमच्यावर प्रसन्न! पाहा काय आहे पूजा, साहीत्य, आणि उपाय.

By Reshma
8 Min Read
गोकुळाष्टमीचा उत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी (Gokulashtami) असे म्हणतात. हा हिंदू सण आहे, जो दरवर्षी येतो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा (Krishna Janmashtami in 2024) हा उत्सव आहे. पंचांग किंवा हिंदू कॅलेंडरनुसार, तो श्रावण महिन्यातील आठव्या दिवशी (अष्टमी) येतो. पश्चिम ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

Krishna Janmashtami Festival 2024 Information: अष्टमी तिथी २६ ऑगस्ट रोजी पहाटे ०३:३९ वाजता सुरू होईल आणि २७ ऑगस्ट रोजी पहाटे ०२:१९ वाजता समाप्त होईल. यावर्षी सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. म्हणूनच या दिवशी कृष्ण जन्माष्टमी ( गोकुळअष्टमी ) साजरी करतात.

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवकीचा भाऊ असलेल्या कंस या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर अष्टमीला श्रीकृष्ण भगवानचे रूप धारण केले होते.

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मथुरा वृंदावनात हा उत्सव दोन दिवस साजरा होतो. या ठिकाणी श्री कृष्णाची भव्य मिरवणूक, अभिषेक, तसेच महाआरती, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत व पूजा विधी

Krishna Janmashtami Puja Vidhi: श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. हा दिवस श्री कृष्ण यांच्या उपासनेचा आहे. कृष्ण अष्टमीला सर्व जन व्रत, पुजा, उपवास करत असतात.

भगवान श्री कृष्ण यांची या दिवशी पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात असे म्हंटले जाते.

या दिवशी तुम्हाला सूर्योदयापासून उपवास सुरू करावा लागेल आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर तो संपवावा लागेल. उपवास करताना सर्व नियमांचे पालन करायचे आहेत. पूजा विधी आपण पुढे पाहूयात…

पूजा विधी –

१. सकाळी  लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप शक्य तितक्या वेळा करा.
२. रात्री पूजेची तयारी श्री कृष्णाचा पाळणा सजवून सुरू करावी आणि मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गंगाजल वापरावे.
३. प्रथम: संपूर्ण लक्ष पुजेकडेच असावे,  श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळणावर ठेवा. जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी पाट/ चौरंग देखील वापरू शकता.
४. देवतेच्या चरणी जल अर्पण करणे याला पाद्य असे म्हणतात. परमेश्वराला अर्घ्य अर्पण करावे.
आचमन करा, म्हणजे परमेश्वराला पाणी अर्पण करणे आणि नंतर ते पिणे.
५. त्यानंतर पंच्यामृताने बाळकृष्णांना अभिषेक घालून उरलेले पंचामृत प्रसाद म्हणून ठेवावे.
६. मूर्तीला नवीन कपडे, फुले, मुकुट, दागिने, मोरपंख आणि बासरी इ.नी मूर्तीला सजवावे.
७. नंतर बाळकृष्णांना चंदन टीळा लावून फुले, अत्तर व तुळशीची पाने अर्पण करावीत आणि धूप, अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावावा.
८. परमेश्वराला प्रसाद म्हणून दही, लोणी, लाह्या, व  लाडू इ. अर्पण करावेत. देवाला नारळ, सुपारी, हळदी, पान आणि कुंकु यांनी बनवलेले तांबूल अर्पण करावेत.
९. शेवटी पाळणा व आरती म्हणून दुसऱ्या दिवशी नैव्यद्य दाखवून पुजेची समाप्ती करावी.
१०. हात जोडून तुम्ही एकत्र प्रार्थना करत असताना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वराला विनंती करा.

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे साहित्य कोणते?
काकडी, दही, मध, दूध, एक पदर, पिवळे स्वच्छ वस्त्र, पंचामृत, बाळकृष्णाची मूर्ती, सिंहासन, गंगेचे पाणी, दिवा, तूप, वात, अगरबत्ती, गोकुळाष्ट चंदन, अक्षता, लोणी, साखर मिठाई, खाद्यपदार्थ, तुळस पाने इ. वस्तूंचा समावेश असतो.

पुरुष आणि स्त्रिया भगवान श्रीकृष्णाच्या सन्मानार्थ या दिवशी उपवास व सगळ्या विधी करतात. भगवान कृष्णाच्या मंदिरातील पाळणा बाल कृष्णासाठी सुंदर वस्तूंनी सजवला जातो. हा उत्सव महाराष्ट्र राज्यात सगळीकडे मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असल्याने, हा पवित्र दिवस दरवर्षी जगभरात आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व

Significance of Krishna Janmashtami: हिंदू धर्मग्रंथानुसार, अष्टमी तिथीला किंवा भाद्रपदाच्या पंधरवड्याच्या आठव्या दिवशी मथुरा शहरात देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला.

मथुरेचा राक्षस राजा कंस हा देवकीचा भाऊ होता. देवकीचा आठवा मुलगाच पापी कंस याचा वध करेल, अशी भविष्यवाणीत म्हटले होते. त्यामुळे कंसाने स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकले.

ही भविष्यवाणी घडू नये म्हणून त्याने देवकीच्या मुलांना त्यांच्या जन्मानंतर लगेचच मारण्याचा प्रयत्न केला. देवकीने आठव्या मुलाला (श्री कृष्णाला) जन्म दिला तेव्हा जादूने संपूर्ण राजवाडा गाढ झोपुन गेला होता.

रात्रीच्या वेळी या बाळाला वृंदावनातील यशोदा आणि नंदाच्या घरी नेऊन वसुदेवाने कंसाच्या क्रोधापासून बाळाचे रक्षण केले. हे अर्भक भगवान विष्णूचे प्रकटीकरण होते, ज्याचे श्रीकृष्ण हे नाव ठेवण्यात आले. काही दिवसानंतर  श्रीकृष्णांनी कंसाचा वध करून त्याच्या दहशतीचे राज्य संपवले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला उत्सव

Shri Krishna Janmashtami Gopalkala Utsav: गोपालकाला, ज्याला दही हंडी उत्सव असेही म्हणतात. यावर्षी गोपाळकाला मंगळवारी, २७ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाईल.

गोपाळकाला, दहीहंडी (Dahi Handi) हा एक हिंदू सण आहे, जो भारताच्या महाराष्ट्र राज्यात विशेषत: पुण्यात साजरा केला जातो. गोपालकाला हा सण भगवान कृष्णाच्या बालपणातील खेळकर आणि खोडकर स्वभावाचे प्रतिक म्हणून उत्सवात साजरा करतात.

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करून लगेचच प्रसाद घेऊन किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी पहाटेपासूनच काही मोठ्या शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. या मध्ये सहभाग घेण्यासाठी खूप लांबून दहीहंडी पथके येतात.

दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात. तसेच मोठ मोठे सेलेब्रिटी यांना योग्य मानधन देवून या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी बोलावले जाते.

वेगवेगळे खाद्यपदार्थ जसे  दही, दूध, लोणी, मुरमुरे इ. हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे काला होय. श्रीकृष्णाने गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोरया एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. यालाच गोपाळकाला असे म्हणतात.

या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा चालू झाली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मेसेजेस

Shrikrishna JanmashtamiWishes Messages:

१. “गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

२. कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

३. दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

४. राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

५. चंदनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा बॅनर

१. Janmashtami Shubhechha Wishes Banner:

Dahi Handi Quotes In Marathi

२.

Dahi Handi Wishes In Marathi

३.

Gokulashtami Messages In Marathi

४.

Happy Janmashtami Marathi Sms

५.

Happy Janmashtami Status In Marathi

६.

Janmashtami Chya Hardik Shubhechha

७.

Janmashtami Wishes In Marathi

८.

Krishna Janmashtami Messages In Marathi

९.

Krishna Janmashtami Quotes

१०.

Gokulashtami Wishes In Marathi

मित्रांनो, वरील गोकुळअष्टमी व गोपाळकाल्याच्या शुभेच्छा संदेश आणि बॅनर पाहा, स्टेट्स ठेवा आणि इतरांनाही पाठवा.

धन्यवाद!

हे देखील वाचा:    हरतालिका उपवास व आरती

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version