आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती सविस्तर वाचा –
आयुष्यमान भारत योजना ( आभा योजना ) या योजनेलाच प्रधान मंत्री जन आरोग्य योजना तसेच आरोग्य संरक्षण योजना असेही म्हंटले जाते. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरु केली. केंद्र सरकार गरीब कुटुंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटुंबाला आरोग्य विमा उपलब्ध करून देते.
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आभा योजना संपूर्ण देशभरात चालवली जात आहे. या योजने अंतर्गत देशातील अधिकाधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यासाठी सर्वाना आयुष्मान भारतचे ( आभा कार्ड ) बनवावे लागेल. या साठी काही आवश्यक पात्रता निर्धारित केली आहे. पात्र असलेले लोकच हे कार्ड बनवू शकतात. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.
सरकारकडून मिळतं ५ लाखांचं ‘गोल्डन कार्ड’ – कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushyman Bharat Golden Card) प्रदान करते. आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.
आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्रता –
आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana – ABHA Yojana) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव SECC– २०११ मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SECC म्हणजे काय? SECC म्हणजे, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल.
असा करा ऑनलाईन अर्ज
१.सर्वात आधी आयुष्यमान भारत योजनेची हि अधिकृत https://healthid.ndhm.gov.in/ लिंक ओपन करा. व Create Abha Number या ऑप्शन वर क्लीक करा .
आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया आणि फायदे
महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना एबीवाय योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. आयुष्मान भारत योजनेचा (आभा योजना ) लाभ घेण्यासाठी कुटूंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही.
हे ही वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश
सर्व सरकारी रुग्णालये व पॅनलमध्ये सामील रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांवर कॅशलेस/पेपरलेस उपचार केले जातील.
आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय – आभा ) लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणताही फी भरावी लागणार नाही. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.
आभा योजनेत (एबीवाय) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल. योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्मान मित्र असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरि मदत करेल.
रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल जेथे कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाईल.
आयुष्मान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळवू शकेल.
वरील माहिती चा उपयोग करून आपण स्वत घरी ऑनलाईन आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत योजना कार्ड तयार करू शकता. जर आपणास वरील दिलेल्या स्टेप्स फोल्लो करून आभा कार्ड काढता येत नसेल तर आपण जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर जावून हे कार्ड अगदी माफक दरामध्ये काढून घेवू शकता.
आम्हास आशा आहे आम्ही आभा हेल्थ कार्ड या योजनेविषयी योग्य खात्रीशीर माहिती अगदी मोफत आपणा पर्यंत पोहोचवत आहोत आणि याचा आपणास नक्कीच खूप उपयोग होईल. आपण आपल्या मित्र परिवार, नातेवाईक यांस देखील हि माहिती शेअर करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल.
हे सुद्धा वाचा : PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
— धन्यवाद.
ई जनसेवा माहिती प्रसारण टीम