Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जयंती माहिती महत्व इतिहास शुभेच्छा स्टेट्स

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारीख तिथी आणि विशेष माहिती जाणून घेवूयात.

By Reshma
8 Min Read
छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२४

१९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची ३९४ वी साजरी होत आहे.

महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024) विशेष माहिती आपण पुढे सविस्तर पाहूयात.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Full Information: दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जन्म दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

शिवप्रेमी, सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसह सर्व स्तरातील लोक शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते, तसेच ते शौर्य, वैभव, दया आणि औदार्य यांचे प्रतिक होते.

शिवजयंती सोहळा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. शिवजयंती निमित्त महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. तसेच भारतात आणि भारताबाहेर काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती (shivaji jayanti 2024) दोन वेळा साजरी केली जाते. काही लोक तारखेनुसार १९ फेब्रुवारीला एकदा तर तिथीनुसार दुसऱ्यांदा शिवजयंती साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवनेरी येथे झाला. महाराजांच्या आईला पुत्रप्राप्तीची इच्छा देणारी शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती इतिहास

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti History: पुण्यापासून १०० मैल अंतरावर असलेल्या रायगडावर (१८६९) शिवाजी महाराजांची समाधी सापडल्यानंतर १८७० मध्ये शिव जयंतीचा कार्यक्रम सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला. नंतर १८९४ मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव पुढे नेला.

वास्तविक बाळ गंगाधर टिळक आणि अभ्यासकांनी महाराजांची जन्मतारीख शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर आपले मत मांडले होते. टिळकांनी १९९० च्या त्यांच्या केसरी मासिकाच्या १४ एप्रिलच्या आवृत्तीत या विषयावर सविस्तर माहिती दिली होती.

टिळकांनीही कबूल केले की शिवाजी महाराजांची जन्मतारीख निश्चित करण्यासाठी कोणतीही पुष्टी माहिती नाही. त्यानंतर काही लेखांचा आधार घेऊन महाराजांची जन्मतारीख ६ एप्रिल १६२७ ही मानली गेली आणि त्या आधारावर ६ एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाऊ लागली.

महाराष्ट्र सरकारने १९६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी इतिहासकारांची एक समिती स्थापन केली.

समितीने असा निष्कर्ष काढला की महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता, पण समितीचा भाग असलेले इतिहासकार एन आर फाटक यांनी सांगितले की त्यांचा जन्म वैशाख शुक्ल द्वितीया शके १५४९ म्हणजेच ६ एप्रिल १९२७ रोजी झाला.

समितीची दुसरी बैठक झाली तेव्हा इतिहासकारांनी कबूल केले की महाराजांच्या जन्माची तारीख निश्चित करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे नाहीत. नंतर असे ठरले की जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनी तारीख म्हणजे ६ एप्रिल हीच महाराजांची जन्मतारीख मानली जावी.

मग १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी होऊ लागली ? खरे तर महाराष्ट्राच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी मागील समितीचा अहवाल आणि इतर काही पुरावे २००० साली महाराष्ट्र सरकारसमोर मांडले होते. यानंतर १९ फेब्रुवारी १६३० रोजी विधानसभेत ठराव पारित करण्यात आला.

महाराजांच्या जन्मतारखेवर सुमारे १०० वर्षे संशोधन झाले, तरीही महाराजांच्या जन्मतारखेबाबत मतभेद कायम आहेत. काही ठिकाणी जुन्या तारखेला म्हणजे ६ एप्रिलला तर काही ठिकाणी १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. तिथीनुसार, जयंती दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी आणि तारखांना येते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महत्त्व

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Significance: छत्रपती शिवाजी महाराज जयंती ज्यालाच शिवजयंती असेही म्हणतात. महान मराठा योद्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा सन्मान करणारा हा एक भव्य उत्सव आहे.

पुणे जिल्हातील शिवनेरी येथे शिवजयंती निमित्त शिवप्रेमी आदल्या दिवशी पासूनच म्हणजे १८ फेब्रुवारीला येत असतात. १९ फेब्रुवारीच्या पहाटेच सकाळी शिवनेरी येथे सद्याचे महाराजांचे वंशज, राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,तसेच प्रमुख पाहुणे, पदाधिकारी, इतर मान्यवर, शिवप्रेमी हे सर्व मोठ्या संख्येने महाराजांच्या जन्मसोहळ्यासाठी हजर असतात.

या दिवशी शिवनेरीवर महिला पारंपारिक वेषामध्ये तयार होऊन येतात. महाराजांचा पाळणा फुलांनी सजवला जातो, आणि नंतर महिला सुंदर आवाजात महाराजांचा पाळणा म्हणतात. शिवनेरी गडावर फुलांचे डेकोरेशन केले जाते, भगवे झेंडे लावले जातात, एकापाठोपाठ एक शिवगर्जना दिल्या जातात.

सर्व परिसर शिवमय होऊन जातो. या दिवशी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात, ज्यात लोक महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पोशाखात दिसतात, तसेच सर्वत्र भगवे झेंडे मिरवले जातात. शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारी नाटके ठिकठिकाणी मांडली जातात.

याशिवाय, महाराजांची गाणी, पोवाडा गायन कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराजांचे जीवन आणि आधुनिक भारतातील त्यांची प्रासंगिकता यावर सरकारी अधिकाऱ्यांकडून भाषणे दिली जातात.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा राष्ट्राचे निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे महत्त्व त्यांच्या लष्करी आणि नागरी प्रशासनाला होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes:
१. प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती इमेजेस २०२४

२. ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा २०२४

३. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा…

Shiv Jayanti images 2024

४. स्त्रियांचा जो ठेवितो आदर,
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

शिवजयंती शुभेच्छा फोटो २०२४

५. इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर,
आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा
राजा म्हणजे राजा शिव छत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर २०२४

६. स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु शिवछत्रपतींचा जयजयकार
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती शुभेच्छा इमेजेस मराठी २०२४

शिवजयंती हा उत्सव फेब्रुवारी महिन्यात असला तरी शिवप्रेमींना जानेवारी महिन्यापासूनच शिवजयंतीची उत्सुकता लागलेली असते.

सध्याचा काळ हा सोशल मिडीयाचा आहे. म्हणूनच अगदी महिनाभर अगोदर पासूनच शिवप्रेमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटोस, रील्स, व्हिडिओज, बॅनर, एकमेकांना शेअर करून शिवजयंतीच्या शुभेच्छा देत असतात.

तुम्ही देखील तुमच्या कुटुंबाला, मित्रांना शिवजयंतीच्या  शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट शेअर करू शकता, तसेच ह्या पोस्ट मधील मेसेज तसेच शुभेच्छा इमेजेस एकमेकांना पाठवू शकता. जय शिवराय ! धन्यवाद!

हे हि वाचा: Rajmata Jijabai Information In Marathi: राजमाता जिजाबाई जयंती पुण्यतिथी शुभेच्छा स्टेट्स मराठी माहिती

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version