Actor Dev Zumbrey Biography: अभिनेते, प्रोड्युसर आणि डायरेक्टर देव झुंबरे यांची खास बायोग्राफी

'तुला फिरवीन माझ्या गाडीवर' सॉंग फेम अभिनेते देव झुंबरे यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

By Reshma
6 Min Read
Actor Dev Zumbrey Biography

पुण्यातील प्रसिद्ध अभिनेते, प्रोड्युसर आणि डायरेक्टर तसेच ‘तुला फिरवीन माझ्या गाडीवर’ मराठी सॉंग फेम श्री. देव झुंबरे यांच्या विषयी खास माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

अभिनेते श्री देव झुंबरे परिचय

Actor Dev Zumbrey Biography: अभिनेते देव झुंबरे हे मुळचे पुण्यातील आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले असून त्यांनी इंजिनिअर शिक्षण (सिव्हील इंजिनिअर) घेतले आहे. मराठी कलाकार देव झुंबरे हे संपूर्ण महाराष्ट् राज्यात प्रसिद्ध आहे.

अभिनेते देव झुंबरे यांना अभिनयासोबतच डान्स, ड्रामा, ग्रुमिंग, वाचन इ. ची प्रचंड आवड आहे. ते एक चांगला कलाकार आहेतच, त्याच बरोबर प्रोड्युसर आणि डायरेक्टर सुद्धा आहेत. कलाकार होणे हे त्यांच्या आईचे स्वप्न होते, ते त्यांनी पूर्ण करून दाखवले.

कलाकार देव यांनी आतापर्यंत अनेक गाणी आणि चित्रपट बनवले आहेत. त्यांनी स्वत: यामध्ये लीड रोल केले आहेत. त्यांची काही गाणी तर खूप फेमस झाली आहेत. त्यांचे ‘तुला फिरवीन माझ्या गाडीवर’ हे अल्बम सॉंग खूप व्हायरल झाले आहे. युट्यूब वर जवळपास २०० मिलियन पर्यंतचे व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत.

हे देखील वाचा: Mitra Vanvya Madhe Garvya Sarkha: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कविता

सुरुवातीच्या काळात देव झुंबरे यांनी ड्रामा, शॉर्ट फिल्म इ. मध्ये काम केले. नंतर त्यांनी जवळपास २८ हिंदी, मराठी, आणि पंजाबी अल्बम सॉंग तसेच ६ चित्रपटात काम केले आहे. त्याच बरोबर अनेक सिनिअर कलाकारांसोबत आणि प्रसिद्ध म्युझिक चॅनलस सोबत देखील कामे केली आहेत.

Actor Dev Zumbrey

अभिनेते श्री देव झुंबरे ऑफिशियल सोशल मिडिया

Instagram: https://www.instagram.com/devzumbrey

अभिनेते श्री देव झुंबरे यांची गाणी

मराठी सिने कलाकार देव झुंबरे यांची काही सुपरहिट गाणी पुढीलप्रमाणे:
१. तुला फिरवीन माझ्या गाडीवर
२. लाडाचा विकास हरवला
३. लईच मला आवडती
४. नाखवा बोटीन गो
५. मार्तंड मल्हारी
६. पिरमाची गोडी
७. एकवीरा आई माझी एकवीरा
८. पावली नवसाला माय माऊली एकवीरा
९. वेड वेड तुझ वेड लागल
१०. तुझ काकन किन किन करतय
११. ढाई आखर प्रेम का

अभिनेते श्री देव झुंबरे यांचे मराठी चित्रपट

१. सख्या सजना
२. एकाच छताखाली
३. महीमा कानिफनाथांचा
४. रावडी
नवीन येणारे चित्रपट:
१. ॲड. यशवंत जमादार
२. डब्बल डोस
३. रायबा

अभिनेते श्री देव झुंबरे यांच्या टीव्ही मालिका

१. लागीर झाल जी (झी मराठी)
२. राजमाता जिजाऊ
३. विष्णु पुराण
४. प्रेम तुझा रंग कसा

अभिनेते श्री देव झुंबरे युट्युब व्हिडीओज

१. ‘तिला फिरवीन माझ्या गाडीवर’ मराठी सॉंग डाउनलोड – https://www.youtube.com/watch?v=T4Hnaf9P1KI
२. अभिनेते श्री देव झुंबरे यांची खास मुलाखात (conversation about actor) – https://www.youtube.com/watch?v=kkpmA_I2010

अभिनेते श्री देव झुंबरे फेमस सॉंग लिरिक्स

तिला फिरवीन माझ्या गाडीवर
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
लाईन मारते माझ्यावर
लाईन मारते माझ्यावर…
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना
गोडं गालामधी हसती मी समोर दिसताना
सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना
गोडं गालामधी हसती मी समोर दिसताना
खरं सांगतो राव माझ्या मामाची ही पोरं
खरं सांगतो राव माझ्या मामाची ही पोरं
एक नंबर दिसते साडीवर
एक नंबर दिसते साडीवर…
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिरची नजर मारून ती देते मला लाईन
नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन
तिरची नजर मारून ती देते मला लाईन
नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन
ही आहे खरी धीट घुसली काळजात नीट
ही आहे खरी धीट घुसली काळजात नीट
तिने जादूच केली माझ्यावर
तिने जादूच केली माझ्यावर…
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर
गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर……

अभिनेते श्री देव झुंबरे यांचा इतर उपक्रमातील सहभाग

अभिनेते देव झुंबरे यांचे अभिनया व्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात ते सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन शो सारखे उपक्रम सतत राबवत असतात.

महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन ते करत असतात. या स्पर्धांसाठी महिलांचा देखील प्रचंड सहभाग असतो. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत महिलांबरोबरच कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींना रॅम्पवॉक करण्याची संधी ‘विष्णुप्रिया सेव्हेन आर्टस्’ प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या फॅशनशो मध्ये देण्यात आली होती. अशा समाजोपयोगी उपक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते.

आधिक पहा: Piyush Ranade Suruchi Adarkar Marriage: पियुष रानडे आणि सुरुची आडारकर गुपचूप लग्नबंधनात अडकले

देव झुंबरे यांना स्पर्धांसाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देखील बोलावले जाते. त्यांची उपस्थिती अनेक सामाजिक कार्यक्रमात दिसून येते.

अशाप्रकारे नॉन फिल्मी मराठी कुटुंबातून असताना देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर श्री देव झुंबरे या सिने कलाकाराने संपूर्ण मराठी चित्रपट टीव्ही इंडस्ट्रीला आपली दखल घेण्यास भाग पाडले, आणि आपली यशस्वी कलाकार म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या या सिने कारकीर्दीस व भविष्यातील वाटचालीस ई जनसेवा टीम कडून हार्दिक शुभेच्या.
धन्यवाद !

सिने कलाकार देव झुंबरे यांची फिल्मी कारकीर्द – फोटो गॅलरी

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version