रेशनकार्ड हरविल्यास दुबार कार्ड मिळणेकामी आवश्यक कागदपत्रे –
१.स्वस्त धान्य दुकानदार यांचा कार्ड हरविलेचा दाखला युनिट सह.
२.कामगार तलाठी यांचा कार्ड हरविलेचा दाखला युनिट सह.
३.रेशनकार्ड हरविले बाबत पोलीस स्टेशनचा दाखला.
४.कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला
५.तलाठी यांचा कडील रहिवाशी दाखला
६.अर्ज स्टँप सह
७. दुबार कार्ड मिळणे कामी स्वतःचे प्रतिज्ञा कोरया कागदावर पाच रु.चे कोर्ट फी स्टँप सह
८. मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
९. कोरल बँकिंग / राष्ट्रियकृत बँकेतील पती ,पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे बँकेचे पास बुक सत्यप्रत.
१०. पुस्तिकाची सत्यप्रत
११. रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.
जर रेशनिंग कार्ड खराब झाले असेल किंवा जीर्ण झाले असतील व ते नव्याने दुबार काढायचे असतील तर वरील प्रमाणे कागदपत्रे जोडून त्यासोबत जीर्ण किंवा खराब रेशनकार्ड जोडावे.व स्वस्तधान्य दुकानदार तलाठी यांचेकडून जे दाखले घ्यावे लागतात त्यावर कार्ड खराब झाला असा उल्लेख करावा.
-विभक्त रेशनकार्ड मिळणेकामी आवश्यक कागदपत्रे—
१.वडिलांच्या रेशनकार्डातून नाव्क्मी केलेच तलाठी यांचा दाखला
२.सरपंच रहिवासी दाखला ग्रामीणसाठी शहरासाठी नगरसेवकाचा दाखला
३.तलाठी रहिवासी दाखला
४.कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला
५.ग्रामसेवक रहिवासी दाखला
६.ग्रामसेवक शौचालय दाखला
७.अर्ज स्टँप सह नवीन कार्ड मिळण्याचे स्वताचे प्रतिज्ञापत्र.
८. मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
९.वडिलांचे समंतीपत्र मुलगा माझे पासून त्याचे नावे असलेल्या मिळकतीत वेगळा राहतो म्हणून रेशनकार्ड देण्यास हरकत नाही.असे प्रतिज्ञापत्र कोरया कागदावर पाच रु. स्टँप सह.
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे