Navaratri Utsav 2024: नवरात्रोत्सव आणि घटस्थापना संपूर्ण मराठी माहिती येथे वाचा

नवरात्रोत्सव २०२४: शुभ मुहूर्त, तारखा, पूजा विधी, इतिहास, महत्त्व, आणि ९ दिवसांच्या रंगांची माहिती सविस्तर पाहा.

Reshma
By Reshma
7 Min Read
नवरात्रोत्सव घटस्थापना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

नवरात्रोत्सव हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. जो देवी दुर्गेच्या उपासनेसाठी ओळखला जातो. या वर्षीच्या नवरात्र उत्सव २०२४ (Navaratri Utsav 2024) शुभ तारखा, पूजेचे मुहूर्त, ९ दिवसांचे विशेष रंग आणि या सणाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती आज या लेखात आपण जाणून घेवूयात, हा लेख तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या महत्त्वाच्या धार्मिक, सांस्कृतिक, आणि आध्यात्मिक पैलूंची संपूर्ण माहिती देईल.

नवरात्रोत्सव मराठी माहिती

Navaratri Utsav 2024 Full Information: अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात (Navratri 2024 Start Date) होते. देशभरात मोठ्या उत्साहात नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा होते.

महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना करण्यात येते. सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2024) झाल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.

नवरात्रोत्सव म्हणजे देवी दुर्गेच्या उपासनेचा पर्व. हा उत्सव (सण) ९ दिवस चालतो आणि प्रत्येक दिवसाला देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.

हिंदू पंचांगानुसार, शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते. तसेच चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे खंडोबाची नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते. शेवटचा दहावा दिवस म्हणजे विजयादशमी (दसरा) / खंडे महानवमी होय.

नवरात्र उत्सव २०२४ तारखा

Navratri Festival 2024 Dates:

प्रारंभ: ३ ऑक्टोबर २०२४ (गुरुवार)
समाप्ती: १२ ऑक्टोबर २०२४ (शनिवार) विजयादशमी (दसरा), खंडे महानवमी.

शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त

Navratri 2024 Shubh Muhurta: यंदा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:१८ वाजल्यापासून सुरू होऊन, ती ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २:५८ वाजेपर्यंत असणार आहे.

उदय तिथीनुसार घटस्थापना ३ ऑक्टोबर रोजी करणे उचित आहे. नवरात्र उत्सवाची समाप्ती १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी, म्हणजेच दसरा साजरा करून होणार आहे.

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 8:22 या वेळेत आहे.

नवरात्रीचे नऊ रंग २०२४

navratri colours 2024 marathi: प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केल्या जात असल्याने प्रत्येक दिवसाचे एक विशेष रंग असतो. हा रंग त्या दिवशीचे महत्त्व सांगतो.

पहिला दिवस (घटस्थापना) – पिवळा (आनंद आणि तेज)
दुसरा दिवस – हिरवा (विकास आणि ऊर्जा)
तिसरा दिवस – राखाडी (विवेक आणि संयम)
चौथा दिवस – नारंगी (उत्साह आणि सर्जनशीलता)
पाचवा दिवस – पांढरा (स्वच्छता आणि शांतता)
सहावा दिवस – लाल (शक्ती आणि धैर्य)
सातवा दिवस – निळा (समृद्धी आणि शांती)
आठवा दिवस – गुलाबी (स्नेह आणि प्रेम)
नववा दिवस (महानवमी) – जांभळा (धैर्य आणि गर्व)

Navratri Colours 2024 list

दिवस दिनांकवाररंग - मराठी रंग - इंग्लिश
१ ला गुरुवार३/१०/२०२४पिवळाYellow
२ रा शुक्रवार४/१०/२०२४हिरवा Green
शनिवारशनिवार५/१०/२०२४राखाडी Grey
४ थारविवार६/१०/२०२४नारंगी Orange
५ वा सोमवार७/१०/२०२४पांढरा White
६ वा मंगळवार८/१०/२०२४लाल Red
७ वा बुधवार९/१०/२०२४निळा Royal Blue
८ वा गुरुवार१०/१०/२०२४गुलाबी Pink
९ वा शुक्रवार११/१०/२०२४जांभळा Purple

घटस्थापना पूजा विधी

Ghatasthapana 2024 Puja Vidhi:

१. सर्वप्रथम एक मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि त्या मातीत 9 प्रकारचे धान्य पेरून थोडेसे पाणी घाला.
२. नंतर एक कलश घ्या, त्यावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि त्याला मौली किंवा कलावा बांधा. त्यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
३. कलशात एक पूर्ण सुपारी, फुले, दुर्वा घाला, तसेच अत्तर, पंचरत्न आणि एक नाणेही टाका.
४. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने लावा आणि त्यावर झाकण ठेवा, ज्यावर तांदूळ ठेवलेले असावेत.
५. देवीचे स्मरण करत कलशाचे झाकण बंद करा. मग एक नारळ घ्या, त्यावर मौली बांधा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढा.
६. नारळावर कुंकवाचे टिळक लावा आणि तो नारळ कलशावर ठेवा. तसेच काही फुलेही नारळासोबत ठेवू शकता.
७. देवी दुर्गेच्या स्वागतासाठी हा कलश तुमच्या घरातील मंदिरात किंवा पूजेच्या जागी स्थापन करा.
८. दिवा लावा आणि त्याची विधिपूर्वक पूजा करा.
९. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण करण्याची परंपरा आहे.
ही पूजा विधी घटस्थापनेच्या दिवशी देवी दुर्गेच्या आशीर्वादासाठी पारंपारिक पद्धतीने केली जाते.

नवरात्रोत्सवाचा इतिहास

Navratri Utsav History in Marathi: नवरात्रोत्सवाची मुळे प्राचीन काळातील पुराणकथांमध्ये आहेत. या सणाच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत, परंतु सर्वांत महत्त्वाची आणि प्रचलित कथा म्हणजे देवी दुर्गेची महिषासुर राक्षसावर विजय मिळवण्याची.

महिषासुर वधाची कथा:
महिषासुर नावाचा बलाढ्य राक्षस देव, मानव आणि पृथ्वीवर संकट निर्माण करत होता. त्याच्या अत्याचारांनी त्रस्त देवांनी भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्याकडे मदतीसाठी प्रार्थना केली.

या देवतांनी आपल्या शक्ती एकत्र करून देवी दुर्गेची निर्मिती केली. देवी दुर्गेने महिषासुराशी ९  दिवस आणि ९ रात्री युद्ध केले आणि १० व्या दिवशी त्याचा पराभव करून त्याला ठार केले. या विजयाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव होय.

रामायणातील संदर्भ:
रामायणात भगवान रामाने रावणावर विजय मिळवण्यापूर्वी देवी दुर्गेची आराधना केली होती. अश्विन महिन्यातील या काळात रामाने नवरात्राचं उपवास आणि पूजन केले होते. यानंतर रावणाचा वध झाला.

विजयादशमी, जो नवरात्रीच्या समाप्तीला साजरा केला जातो, तो रामाच्या रावणावर मिळवलेल्या विजयाचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो.

नवरात्राचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

नवरात्रोत्सवात देवीच्या नव रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाला देवीच्या एका रूपाचं महत्व आहे, जसे की:

१. शैलपुत्री (पहिला दिवस)
२. ब्रह्मचारिणी (दुसरा दिवस)
३. चंद्रघंटा (तिसरा दिवस)
४. कूष्मांडा (चौथा दिवस)
५. स्कंदमाता (पाचवा दिवस)
६. कात्यायनी (सहावा दिवस)
७. कालरात्रि (सातवा दिवस)
८. महागौरी (आठवा दिवस)
९. सिद्धिदात्री (नववा दिवस)

हा सण केवळ धार्मिक नसून सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. विविध प्रदेशांमध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, जसे की पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा, गुजरातमध्ये गरबा, महाराष्ट्रात घटस्थापना, आणि दक्षिण भारतात गोळी हळदीचा सण.

नवरात्रातील नऊ माळा माहिती

नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण करण्याची परंपरा आहे, त्या कोणत्या आहेत आपण पुढे पाहूयात.

१. पहिली माळ – शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण करतात.
२. दुसरी माळ – अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करतात.
३. तिसरी माळ – निळ्या फुलांची माळ, जसे की गोकर्णी किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ.
४. चौथी माळ – केशरी किंवा भगव्या फुलांची माळ, ज्यात अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाच्या फुलांचा समावेश होतो.
५. पाचवी माळ – बेल किंवा कुंकवाच्या फुलांची माळ देवीला वाहिली जाते.
६. सहावी माळ – कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करतात.
७. सातवी माळ – झेंडू किंवा नारिंगी फुलांची माळ वाहतात.
८. आठवी माळ – तांबडी फुले, जसे की कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करतात.
९. नववी माळ – कुंकुमार्चनाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करतात.

प्रत्येक माळ देवीला वेगळ्या रंगाचे आणि फुलांचे प्रतीक म्हणून वाहिली जाते. नवरात्रोत्सवात देवी दुर्गेची आराधना करून मातेकडे आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीची इच्छा व्यक्त केली जाते.

हे देखील वाचा: संपूर्ण नवरात्री आरती संग्रह लिरिक्स येथे पाहा

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *