Gemini AI Tool: गुगलने 6 Dec 2023 ला आपले नवीन AI Tool हे Gemini AI या नावाने लाँच केले आहे. Open AI च्या Chat GPT या लोकप्रिय AI Tool ला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनीने हे नवीन smart advance AI Tool तयार केले आहे. ह्या Toolचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मेसेज, फोटो आणि ऑडिओ हे अनेक प्रकारचे टास्ट एकाच वेळी पूर्ण करु शकणार आहे.
गुगलच्या लेटेस्ट पिक्सल फोन डिव्हाइसमध्ये कंपनीचे नवे AI मॉडेल उपलब्ध झालेले आहे. आपण जर पिक्सल 8 प्रो वापरतकर्ते असाल तर तुम्ही हे जेमिनी AI Tool वापरू शकता, हे इनबिल्ट इंस्टाल आहे. गुगल कंपनीचे म्हणणे आहे की आता पर्यंत जगात जेवढे AI Tool Launch झाले आहेत त्यापैकी Gemini AI हे टूल सगळ्यात जास्त पावरफुल AI टूल आहे. हे टूल अगदी माणसासारखा विचार करु शकेल, आणि त्याप्रमाणे कार्य करेल असंही गुगल कंपनीनं सांगितलं आहे. कसं आहे हे टूल आणि काय काय फीचर्स आहेत? चला पाहुयात..
Gemini AI Tool कोण-कोणत्या फोन ला सपोर्ट आहे
गुगल पिक्सल 8 Pro या फोन मध्ये Gemini AI याचे नॅनो व्हर्जन उपलब्द्ग आहे. सध्या या फोन चे वापरकर्ते ह्या AI टूलच्या सहकार्याने 2 गोष्टी करू शकतात. सर्वप्रथम हे टूल तुम्हाला व्हाट्सएप पुढे काय आणि कसे रिप्लाय द्यायचे हे सुचवेल. दुसरी गोष्ट म्हणजे फोन रेकॉर्डर अॅपमध्ये तुम्हाला त्याची समरी समजेल. यामुळे तुमची माहिती कुठेही लीक होणार नाही आणि मोबाईल देखील सेफ सुरक्षित राहिल. आताचे नवीन रेकॉर्डर अॅप हे 28 वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन करते.
जेमिनी नॅनोचा जीबोर्डमध्येही सपोर्ट
गुगल जीबोर्ड मध्ये सुद्धा जेमिनी नॅनोचा सपोर्ट येत आहे. यामध्ये युजर्सला स्मार्ट रिप्लाय हा ऑप्शन मिळेल. जो की युजर्सला चॅट दरम्यान पुढे काय रिप्लाय द्यावा हे सांगेल. सध्या हे फीचर फक्त व्हॉट्सएप सोबत काम करत आहे पण 2024 पासून हे फीचर इतर अॅप्स सोबतही काम करेल. जेमिनी ये आय टुल योग्य आणि बिनचूक असे ऑटो रिप्लाय देतील, असा दावा गुगल कंपनीने केला आहे.
हे सुद्धा वाचा : तंत्रज्ञान विषयी महिती
Gemini AI या टुल ची निर्मिती कोणी केली?
ज्या पद्धतीने Open AI ने Chat Gpt या टुल चे निर्माण केले त्याच प्रमाणे गुगल आणि गुगलची पॅरेंट कंपनी Alphabet यांच्या माध्यमातून जेमिनीची या AI टूल ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच गुगल चे Bard या सारख्या ai टूला बरोबरच हे जेमिनी टुल, या कंपनीचे आजवरचे सर्वोत्कृष्ट एआय मॉडेल म्हणून जारी करण्यात आले आहे. Google DeepMind ने देखील हे Gemini AI निर्माण करण्यात मोठी कामगिरी बजावली आहे.
गुगल जेमिनीचे कोण कोणते व्हर्जन आहेत?
सद्या हे टूल नवीनच launched झाले आहे. गुगलच्या डेटा सेंटर पासून ते मोबाइल च्या प्रत्येक डिव्हाइस पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी वर हे टूल काम करणार आहे. प्रत्येक गोष्टीवर सर्वोत्तम काम करण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारात हे टूल लाँच करण्यात आलं आहे.
Google Announcement: Read here
व्हर्जन चे प्रकार –
१) Gemini Nano ( जेमिनी नैनो ) – जो एंड्रॉयड डिवाइसेस ऑफलाइन सुद्धा काम करू शकतो.
२) Gemini Pro ( जेमिनी प्रो ) – गुगल मधील सर्व सेवामध्ये जसे कि bard ai आणि इतर अन्य ठिकाणी याचा वापर.
३) Gemini Ultra ( जेमिनी अल्ट्रा ) – सर्वात टॉप चे व्हर्जन जे की माणसा सारखे विचार करून काम करू शकते.
सद्या तरी वरील ३ प्रकारे या टूलची नावे आहेत, तसेच भविष्यात अजूनही नेक्स्ट व्हर्जन येतील.
हे देखील पाहा : Gemini API Free Access: “येथून” जेमिनी एआय मोफत मिळवा आणि “या” प्रकारे वापरा
Top AI Tools Information: सर्व प्रकारच्या ai टूल विषयी माहिती
साधारण गेल्या २ वर्षापासून नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या नव नवीन अशा AI Tools विषयी माहिती मिळत आहे. त्या पैकी टॉप चे काही टूल्स बद्दल अधिक माहिती एकाच ठिकाणी. या ai टूल्स मुळे जवळपास सगळ्यास क्षेत्रांत अमुलाग्र बदल झाले आहेत. काही बदल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे पाहावयास मिळतात.
Sr.No | Tool Name | Developed By | Launched |
---|---|---|---|
1 | Chat GPT 4 | OpenAI | 30 Nov 2022 |
2 | Bing AI | Microsoft | 07 Feb 2023 |
3 | Google Bard | 21 Mar 2023 | |
4 | Gemini AI | Google & Alphabet | 06 Dec 2023 |
5 | Apple GPT | Apple | 2024 coming soon |
आपण सद्या कोणते ai tool वापरता? जर वापरत असाल तर आपला अनुभव कसा आहे, आपले मत कमेंट मध्ये नोंदवा.
धन्यवाद.
Google is always a strong competitors for Microsoft and apple and Sunder pichai is always a big challenge for them. Very much updated information.