निसर्गातील घडामोडींबद्दल ज्ञान मिळवणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे हे दोन भिन्न घटक आहेत. त्यापैकी पहिल्यास विज्ञान, तर दुसऱ्यास तंत्रज्ञान म्हणतात. मानवाने आपल्या जन्मापासूनच स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी काही विशेष तंत्रे विकसित केली. या तंत्रांनाच आपण तंत्रज्ञान म्हणत असतो. तंत्रज्ञान म्हणजे निसर्गावर मात करण्याचा व त्यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्राचा वापर करण्याचा मार्ग होय.
फार पूर्वी आदिमानव काळात काही तंत्रज्ञान विषयामध्ये प्रगती झाली नव्हती. पण हळूहळू जशी क्रांती होत गेली तशी मानवाने प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वापर करत खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे. मानवी जीवन हे अधिक सुखकर झाले. त्याचबरोबर मानवाची आयुमर्यदा हि कमी झाली.
वाहन उदधोग, दूरसंचार क्षेत्र, हरित क्रांती आणि इतर प्रत्येक क्षेत्र ज्यामध्ये तंत्रज्ञान वापरले जाते त्यामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या राहणीमानाचा दर्जा वाढला संपुर्ण जग जवळ आले. अलीकडे तर फेसबुक मुळे लहानपणी हरविलेली व्यक्ती सुधा शोधता येवू लागल्या.
अवकाशात विविध उपग्रह स्थापन करून परग्रहावरील जीवसृष्टी चा अभ्यास केला जात आहे. कॉम्पुटर मोबाईल अप्स यामुळे तर खूपच सुलभता आली आहे. तंत्रज्ञान हे आपण कसे वापरतो यावर अवलंबून आहे योग्य वापर केला तर खूप प्रगती होऊ शकते आणि अयोग्य वापरामुळे विनाश देखील होवू शकतो.
तंत्रज्ञान शोध – वाफेचे रेल्वे इंजिन , उपग्रह , मोबाईल, कॉम्पुटर, इंटरनेट, हरितक्रांती आणि अजून खूप काही.
तंत्रज्ञान विषयी अजून माहिती आपण पुढील लेखात घेवूया.