26 January Republic Day Information In Marathi 2024: भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण मराठी माहिती

यंदा ७५ वा कि ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे. जाणून घ्या प्रजासत्ताक दिन विषयी सविस्तर माहिती.

By Reshma
8 Min Read
भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण मराठी माहिती

नमस्कार नेटकरी, आज आपण २६ जानेवारी २०२४ भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024)  साजरा करत आहोत. या लेखात आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाची संपूर्ण मराठी माहिती (26 January Republic Day 2024 Information In Marathi)  पाहणार आहोत. यामध्ये इतिहास, महत्व, वैशिष्ट्ये, तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन कोठे कोठे आणि कशा प्रकारे साजरा करतात इत्यादी माहिती आहे, आजच्या नवीन पिढीला याचे गांभीर्य महत्त्व समजणे गरजेचे आहे.

२०२४ यावर्षी स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. २६ जानेवारी १९५० रोजी देशाची राज्यघटना (संविधान) लागू झाल्यापासून तो पहिला प्रजासत्ताक दिवस होता. तांत्रिकदृष्ट्या हा दिवस २६ जानेवारी १९५० रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिवस होता. नंतर, २६ जानेवारी १९५१ हा भारताचा दुसरा प्रजासत्ताक दिवस आणि प्रजासत्ताकाचा पहिला वर्धापन दिवस असेल.

भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी माहिती

Republic Day Information In Marathi:२६ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिवस हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. प्रत्येकवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यावर्षी २६ जानेवारी २०२४ रोजी आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली, म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. लोकशाही राज्य म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य होय. हा अधिकार सर्वाना भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

History of Indian Republic Day: ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. भारताला या ब्रिटीश राजवटी च्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. त्याच बरोबर अनेक जहाल वादी स्वातंत्र्य सेनानी यांचा देखील मोलाचा वाटा आहे. १९४७ रोजी स्वतंत्र भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. त्यामुळे या मध्ये बदल होणे अपेक्षित होते.

सद्याच्या काळात महाराष्ट्रात, मराठा कुणबी आरक्षण या मुद्द्यावर श्री मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आंदोलन चालू आहे. त्यांचा ही मराठा आरक्षण कायद्यात बदल याविषयी जनजागृती व उपोषण द्वारे आंदोलन यशस्वी होताना दिसत आहे.

जाणून घ्या काय आहे कुणबी मराठा प्रमाणपत्र: Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी

भारतीय राज्यघटना

Constitution of India: २ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षपदी कायमस्वरूपी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या मसुदा समितीच्या नियुक्तीसाठी एक ठराव घेण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य दिन ब्रिटिश राजवटी पासून आपले स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी केला जाईल व प्रजासत्ताक दिन त्याच्या घटनेच्या अंमलबजावणीस साजरा करण्यात येईल. असा मसुदा तयार केला व ४ नोव्हेंबर १९४७ रोजी संविधान सभेला सादर केला.

Indian Constitution

१६६ दिवस जनतेसाठी उघडलेल्या विधानसभा अधिवेशनात २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीत विधानसभेने ही घटना स्वीकारली. बऱ्याच विचार विनिमय आणि काही प्रमाणात विधानसभेच्या या तीनशे आठ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० दस्तावैजाच्या (हिंदी व इंग्रजी भाषेतील) प्रत्येकी एक हस्तलिखित प्रतांवर स्वाक्षरी केली. दोन दिवसानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी ती अंमलात आली.

डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र राष्ट्राचे पहिले भारताचे अध्यक्ष बनले. नवीन कायद्याच्या संक्रमण कालानुसार तरतुदीनुसार संविधान सभा ही भारतीय संसद बनली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे संमेलन

Indian Republic Day Conference: प्रजासत्ताक दिन हा भारतातील राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. हा दिवस शाळा, महाविद्यालय, शासकीय ऑफिस, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी ध्वजारोहनाचा कार्यक्रम देशभक्तीने आणि उत्साहाने साजरा करतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे मुख्य प्रजासत्ताक दिनाचा उत्सव राष्ट्रपतींसमोर राजपथ येथे आयोजित केला जातो. या दिवशी राजपथ येथे औपचारिक परेड होतात. यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्व जाती धर्माच्या शूर वीरांनी बलिदान दिले त्यामुळे आदरांजली म्हणून भारताची विविधता, समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा यांची सर्व धर्मभाव व एकता दाखवली जाते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाची परेड

Indian Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनाची परेड राजधानी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते. राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वारापासून इंडिया गेटच्या मागील बाजूने राजपथावरील रायसेन हिल हा कार्यक्रम भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. आणि तो तीन दिवस चालतो, परेडमध्ये भारताची संरक्षण क्षमता सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शविला जातो.

Republic Day Celebrations

नौदला व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या बारा वेगवेगळ्या रेजिमेंट आणि हवाई दल यांच्या कडून परिपूर्ण चित्त थरारक कसरती आणि शक्ती प्रदर्शन केले जाते. भारतीय सशस्त्र दलात सेनापती असलेले भारतीय राष्ट्रपती अभिवादन करतात भारताच्या विविध सैन्य दलांची बारा पथके या परेडमध्ये भाग घेतात.

पुरस्कार वितरण सोहळा

Award Distribution Ceremony: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती दरवर्षी भारतातील नागरिकांना पद्म पुरस्कारांचे वाटप करतात. भारतरत्ना नंतरचा हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. हे पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिले जातात उदा. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशाप्रकारे.

“अपवादात्मक आणि विशिष्ट सेवासाठी” पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. उच्च आदेशाची विशिष्ट सेवा यासाठी पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराच्या स्वरूपा मध्ये राष्ट्रपती यांच्या हाताने एक पदक आणि जारी केलेले सनद (प्रमाणपत्र) दिले जाते. प्राप्तकर्त्यांना पदकाची प्रतिकृती देखील दिली जातो. जी त्यांना इच्छा असलेल्या कोणत्याही औपचारिक/राज्य कार्य इत्यादी दरम्यान धारण करू  शकतात. गुणवंत समारंभाच्या दिवशी प्रत्येक पुरस्कार विजेत्या संदर्भात थोडक्यात माहिती देणारी एक स्मरण पत्रिका देखील प्रसिद्ध केली जाते.

बीटिंग रिट्रीट

Beating Retreat Ceremony: प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची समाप्ती दर्शविल्या नंतर बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो. हे प्रजासत्ताक दिनाच्या तिसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी संध्याकाळी आयोजित केले जाते, हे भारतीय सेना, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेच्या तीन शाखांना बँड द्वारे सादर केला जातो. हे ठिकाण रायसीना हिल आणि जवळच असलेल्या विजय चौक राष्ट्रपती भवना च्या उत्तर व दक्षिण ब्लॉकने राष्ट्रपती महल राजपतच्या शेवटच्या दिशेने स्थित आहे.

Beating Retreat Ceremony

 

भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

(Happy Republic Day of India)१:

भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

२:

भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी

३:

भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा इमेजेस

४:

२६ जानेवारी स्टेट्स इमेजेस

आज च्या जमान्यात आपल्याला कोणतेही छोटेसे यश मिळाल्या वर आपण ते लगेच सोशल मीडियामध्ये शेअर करून आपली स्तुती करून घेण्यास अती उत्साही असतो. आणि आजच्या नवीन तरुण पिढीला स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? तसेच हे दिवस पाहण्यसाठी कितीतरी थोर महापुरुषांचे बलिदान गेले आहे. शौर्य, त्याग आणि निस्सीम देशभक्ती यांचा आदर ठेवून, त्यांचे कार्य या दिना निमित्त आठवून आपण त्याचा वारसा नवीन पिढीला दिला पाहिजे.

सर्वाना पुनश्च: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्या. भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

जय हिंद जय भारत

ज्या प्रकारे भारत 150 वर्षा नंतर स्वातंत्र्य झाला, त्याचप्रमाणे अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान मंदिर देखील ५०० वर्षा नंतर नव्याने स्थापन झाले आहे. त्याविषयी अधिक माहिती येथे पाहा :  Ayodhya Ram Mandir Inauguration 2024: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मराठी माहिती

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version