सोने तारण कर्ज / गोल्ड लोन

By Reshma
3 Min Read
सोने तारण कर्ज / गोल्ड लोन

सोने हा प्रत्येक स्त्रीयांचा वीक पॉइंट असतो. सोने घालायला आणि मिरवायला कोणाला नाही आवडतं, पण जेव्हा खूप मोठी अडचण येते किंवा अचानक पैसे लागतात तेव्हा त्या क्षणाला सोने कामाला येते. पण अनेकांना सुवर्ण कर्ज म्हणजे गोल्ड लोन कसे काढले जाते याविषयी माहीत नाही. आजच्या लेखात आपण गोल्ड लोन विषयी जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते पण आपल्याला सोने मोडून पैसे घ्यावे असे वाटतं नाही. अशा वेळेस सुवर्ण कर्ज हा पर्याय उत्तम  ठरतो. जेव्हा सुवर्ण कर्ज घेता तेव्हा तुम्हाला तुमचे सोने गमावल्याचे दुख नसते, या बरोबरच तुमचे सोने सुरक्षित राहते.

तत्काल झटपट व कमी कागदपत्रांच्या आधारावर मिळणारे कर्ज म्हणून सोने तारण कर्जाकडे कल वाढला आहे.घरातील सोने बँकेत ठेऊन त्यावर कर्ज म्हणून रक्कम घेता येते.

यासाठी बँका,पतसंस्था,प्रायव्हेट फायनान्स कंपन्या कार्यरत असतात.कर्ज घेण्याऱ्या व्यक्तीने आणलेल्या सोन्याचे मुल्य संबंधित बँक / पतसंस्थेच्या ठरविलेल्या सोनाराकडून सोन्याचे मुल्य केले जाते.व त्यावर कमाल ८० टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.

सुवर्ण कर्ज म्हणजे काय-

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सोने तारण म्हणजे जेव्हा तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर  कर्ज काढू शकता. यास सुवर्ण कर्ज म्हणतात. सुवर्ण कर्ज हे  बँक किंवा कर्ज देणाऱ्या कंपन्याकडून घेता येते. ज्या प्रमाणे होम लोन किंवा पर्सनल लोन असते तसेच सुवर्ण कर्ज असते.

सुवर्ण कर्ज कसे फेडावे-

जेव्हा तुम्ही सुवर्ण कर्ज घेता तेव्हा तुम्हाला एक ठराविक कालावधी दिला जातो. त्या ठराविक कालावधीत तुम्हाला ते कर्ज फेडावे लागते. जेव्हा तुम्ही  कर्जाची परत फेड करता तेव्हा तुम्हाला तुमचे सोने परत दिले जाते.

सोने तारणासाठी आवश्यक कागदपत्रे-

  • रेशनकार्ड किंवा मतदान कार्ड झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो.
  • रेव्हिन्यू स्टॅम्प १ रुपयाचे लाल तिकीट दोन.
  • बँकेच्या नियमाप्रमाणे ठराविक रकमेच्या पुढील रक्कम गेल्यास १०० रु.कर्ज घेणार व्यक्तीच्या नावाचा स्टॅम्प.

शेती सुवर्ण कर्ज

  • हे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे संबंधित बँकेत सेव्हिंग खाते असावे.
  • रंगीत फोटो चिकटवून कोरया कागदावर सोने तारण कर्जासाठी अर्ज द्यावा.अर्जात मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असावा.
  • नुकतेच काढलेले ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा जोडावा.
  • ७/१२ उताऱ्यावर संबंधित बँकेच्या व्यतिरिक्त उतर बोजा नसावा.
  • मतदान ओळखपत्र,रेशनकार्ड,पासबुक ओरिजिनल व झेरॉक्स.
  • नुकतेच काढलेले तीन रंगीत फोटो.
  • ओळखीसाठी एक नागरिक ओळखपत्र सह १ रु.रेव्हिन्यू स्टॅम्प.
  • ज्याचे नावाने ७/१२ व ८ अ चा उतारा आहे त्याच नावाने सुवर्ण कर्ज मिळते.

साधारण सूचना

  • सोने तारण कर्जाची मुदत हि १ वर्षांसाठी असते.
  • प्रत्येक बँक / पतसंस्था यांचे सुवर्ण लोन वरील व्याजदर वेगवेगळे असतात.सोईनुसार व कमी व्याजदर असलेल्या बँकेतच सोने तारणावर कर्ज घ्यावे.
  • राष्ट्रिय बँकेमार्फत शेतकर्यांना कमी व्याजदरात सोने तारण सुविधा उपलब्ध असल्याने शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
  • जर रक्कम भरली नाही तर कायदेशीरपणे बँक संबंधित सोन्याचा लिलाव करून रक्कम वसूल करू शकते.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

 

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version