विठ्ठलाची मांदियाळी

By Reshma
2 Min Read
विठ्ठलाची मांदियाळी

cm-pandhariवारक-यांनी पर्यावरणाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि. 26 : वारी ही सकारात्मक शक्ती असून या सकारात्मक शक्तीचा उपयोग स्वच्छता, प्रदूषण निवारणाच्या कामासाठी होईल. वारक-यांनी पर्यावरणाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे बोलतांना व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्या मातोश्री सरिताताई, पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

कार्यक्रमास महसूल मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजय देशमुख, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणाचा जागर करणारे वारकरी पाहून समाधान वाटले. वारकऱ्यांनी हा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोविण्याचे काम केले आहे. वाऱ्यांमधील या सकारात्मक शक्तीद्वारे राज्यातील गावे स्वच्छ व प्रदूषण विरहित होण्यास मदत होईल. कीर्तन, भारुड, पोवाडा या लोक शिक्षणातून अशी चळवळ उभी राहिल्यास गावाचे परितर्वन होण्यास विलंब लागणार नाही. स्वच्छता व प्रदूषणाचा हा शाश्वत विचार वारकरी गावोगावी पोहचवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदनही केले.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरु माऊलींच्या कवितांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नागेश घुगे, विष्णूपंत गायकवाड, मोहन घाटे, धिरज यादव आणि ज्ञानेश्वर साबळे या पाच वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवतगीतेचे वितरण करण्यात आले.


तत्पूर्वी ईश्वर महाराज यांनी कीर्तन, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड आणि शाहीर देवानंद माळी यांनी प्रदूषणावर पोवाडा सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊली……… तुकाराम अशा जय घोषात पर्यावरणाचा जागर करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिवस – २१ जून

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version