आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
Friendship Day 2024: मैत्री हे जीवनातील सर्वात मौल्यवान बंधनांपैकी एक आहे. रक्ताचं नातं नसूनही हे नातं मोठ्या उत्साहानं सगळे संभाळत असतात. ‘मित्र’ हा शब्द जरी छोटा आणि सोपा असला तरी, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मित्रच आपल्यासोबत असतात.
खरे तर मैत्री साजरी करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस (International Friendship Day 2024) ३० जुलै रोजी जगाच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो.
तर भारतात तो दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या मित्रांसोबत एन्जॉय करतो. यावर्षी भारतात ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2024) साजरा केला जाणार आहे.
मैत्री दिनाचे महत्त्व
Significance of Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मैत्रीचे महत्त्व समजून घेणे. हा खास दिवस मैत्रीला समर्पित असल्याने मैत्रीचा भाव जिवंत ठेवण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
या दिवशी प्रत्येकजण आपल्या खास मित्रासोबत एन्जॉय करतो. तसेच या गोड दिवशी कुणी मित्रासोबत ड्राईव्हला जातो, तर कुणी पार्टीला जातो. ज्याला जसे शक्य आहे तसे तो हा दिवस सेलेब्रेट करतो.
शाळा, महाविद्यालयात या दिवशी मुले मुली एकमेकांना फ्रेंडशिप बँड, गिफ्ट्स, चॉकलेटस व भरभरून शुभेच्छा देतात. प्रत्येक जण या दिवशी एकमेकांना सोशल मिडीयावर, प्रत्यक्ष भेटून, पोस्ट कार्ड, टपाल इ. द्वारे शुभेच्छा देतात.
तसेच अलीकडे लोक सोशल मिडीयावर स्टोरी, स्टेट्स, रील्स, पोस्ट या द्वारे मित्रांची आठवण म्हणून त्यांचे फोटोज शेअर करतात.
फ्रेंडशिप डे कधी सुरू झाला?
फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाली असे म्हणतात. येथे १९५८ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
नंतर संयुक्त राष्ट्रांनी ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली. मात्र, अमेरिका, भारत, बांगलादेश यांसारखे अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात.
फ्रेंडशिप डे फक्त रविवारीच का साजरा केला जातो?
असे म्हणतात की, अमेरिकेत १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेल्या व्यक्तीचा एक जवळचा मित्र होता, त्याला ही घटना कळताच त्यानेही निराशेने आत्महत्या केली.
त्यावेळी या दोन्ही मित्रांमधील ‘मित्र प्रेम’ पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day) साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला.
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील मैत्री किंवा कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील गाढ मैत्री यासारखी मैत्रीची सुंदर उदाहरणे प्राचीन धर्मग्रंथात आढळतात. आणि त्यांच्या मैत्रीचे सुंदर उदाहरणे आजही दिले जातात.
हे देखील वाचा : Mitra Vanvya Madhe Garvya Sarkha: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कविता
फ्रेंडशिप डे शुभेच्छा
Friendship Day Wishes 2024:
१. मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री..!
२. मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री!!
३. जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
४. मैत्री असावी पाण्यासारखी निर्मळ, दूर असूनही सर्व काही स्वच्छ पणे सांगणारी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
५. मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत, प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
६. कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते..!
७. मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
८. चांगल्या काळात हात धरणं म्हणजे मैत्री नव्हे
तर वाईट काळातही हात न सोडणं
म्हणजे मैत्री
आणि ती तू कायम निभावली आहेस
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
९. जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
१०. आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
फ्रेंडशिप डे हा त्याच मित्रांना समर्पित आहे, जे प्रत्येक सुख-दु:खात आपल्या सोबत असतात आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
फ्रेंडशिप डे च्या या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला तुमच्या मित्रांना लक्षात ठेवण्यास आणि शुभेच्छा देण्यासाठी मदत करत आहोत. वरील फ्रेंडशिप डे कोट्स, संदेश आणि शुभेच्छा पाहा आणि त्या तुमच्या जिवलग मित्रांना शेअर करा.
धन्यवाद!
हे सुद्धा वाचा : रक्षाबंधन २०२४ तारीख, मुहूर्त, विधी आणि महत्त्व, माहिती येथे पाहा