माहितीचा अधिकार अधिनियमाने नागरिकांना विविध शासकीय कामांची,प्रक्रियेची,शासन ज्या ठिकाणी अनुदान किंवा आर्थिक / वस्तू स्वरुपात पुरवठा करते.अशा संस्थेतील माहिती प्राप्त करता येते.
माहिती अधिकार अन्वये माहिती प्राप्त करण्याची पद्धत
- माहिती अधिकार अधिनियम २००५ चा अर्ज.
- अर्जावर १० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प चिकटवा
- अर्जातील माहितीत नाव,पत्ता,संपर्क,माहितीचा विषय व कालावधी नमूद करून अर्ज माहिती अधिकारी यांच्याकड सादर करावा.व अर्जाच्या झेरॉक्स वर अर्ज सादर केला म्हणून कार्यालयाची पोहच घ्यावी.
- अर्जदाराने दिलेले माहिती हि सुटीचे दिवस वगळून ३० दिवसात द्यावी लागते.
- माहितीच्या प्रत्येक पानासाठी रुपये २ प्रमाणे शुल्क भरावे लागते.
- दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना माहिती मोफत देण्यात येते.त्यासाठी त्यांनी अर्जासोबत आपण दारिद्र्य रेषेखालील आहोत असा पुरावा जोडावा लागतो.
अपील करून माहिती प्राप्ती
१.जर व्यक्तीला अर्ज करूनही माहिती मिळत नसल्यास.२.व्यक्तीचा अर्ज फेटाळला असल्यास.३.चुकिची व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधित माहितीसाठी अपील करून माहिती प्राप्त करता येते. असे अपील ३० दिवसांच्या आत करता येईल.त्यासाठी
- अपिलासाठी अर्ज सादर करावा लागेल तो अर्ज संबंधी कार्यालयातील वरिष्ठ / अपिलीय अधिकारी यांचे नावाने असेल.
- अर्जावर २० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावावा.
- अर्जात अर्जदाराचा व माहिती अधिकारी यांचे नाव,पत्ता,व कोणती माहिती आपणास माहिती अधिकारी यांचे कडून मिळाली नाही याचा उल्लेख करावा.
- स्वाक्षरी करून अर्ज जमा केल्याची पोहच घ्यावी
- अपिलीय अधिकारी यांचे कडून ४५ दिवसांच्या आत माहिती संबंधी उत्तर मिळते.
माहिती न देण्यासाठी अपवाद
- राष्ट्रीय सुरक्षा,हितसंबंध,राष्ट्रिय एकात्मता,इ.बाधक होईल अशी माहिती.
- खाजगी किंवा वैयक्तिक जीवनाशी निगडीत माहिती.
- २० वर्षांच्या आतील नायालयीन माहिती,सरकारी अनुदान न घेणाऱ्या संस्था इ.