निवासी बांधकामाची इमारत रेषा माहिती-
रस्त्यापासून नवीन निवासी बांधकामाची इमारतरेषा
स्टॅंडर्ड बिल्डिंग एण्ड डेवलोपमेंट कन्ट्रोल रूल फॉर म्युनिसिपल कॉन्सिल ए.बी.सी.
द्रूतमार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
१.नागरी,अनागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ६० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून १५ मीटर यापेकी जास्त असेल ते अंतर.
राष्ट्रीय महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
१.नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या हद्दीपासून ३ ते ६ मीटर.
२.अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.
राज्य व प्रमुख राज्य महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे
- नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून २० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
- अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.
प्रमुख जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
- नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
- अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर.
इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
१. नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर
अंतरापेकी जे जास्त असेल ते
२. अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर.
इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
१. नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ३ मीटर
अंतरापेकी जे जास्त असेल ते
- अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर.
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
————————————————————————————————————————