ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट
कोर्टात जेव्हा १५ हजारांपेक्षा जास्तचा जामीन मागितला जातो तेव्हा सॉंलन्सी सर्टिफिकेट महत्वाचे ठरते.त्यालाच ऐपतिचा दाखला असेही म्हणतात.त्याच प्रमाणे अनेकवेळा खाजगी अथवा शासकीय वितरण एजन्सीज,योजनेतील सहभाग,शासकीय कामाच्या निविदा / टेंडर इ.करिता ऐपतिचा दाखला सादर करावा लागतो.
सदर ऐपतीचा दाखल्यावर व्यक्तीच्या संपत्तीचे सामान्य मुल्यांकन दिलेले असते. यात व्यक्तीचे घर,इमारत,शेतजमिन,याचा समावेश होतो.कामाचे स्वरूप पाहून दर्जानव्ये आपण जिल्हाधिकारी,उप विभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्या दाखला आपण प्राप्त करू शकतो.
ऐपतीचा दाखला प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- कोर्ट फी स्टॅम्प लावलेला विहित नमुन्यातील अर्ज.
- दोन रंगीत पासपोर्ट साईजचे फोटो.
- इमारत असल्यास ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांचा रजिस्टर उतारा अथवा कर पावती.
- घरासाठी नगरपालिका / महानगरपालिका / यांच्या अभियंत्याच्या मुल्यांकन अहवाल
- शेतजमिन असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रमाणपत्र / शिघ्र सिद्ध गणकानुसार जमिनीचे होणारे मूल्यमापन.
- शेतजमिन असल्यास संबंधित मंडळ अधिकारी यांचा मुल्यांकन पंचनामा अहवाल व शपथपत्र
- जमीन / इमारत घन नसल्याबाबत तहसीलदार यांचा अहवाल.
- संबंधित जमिनीचा गाव नमुना ७/१२ उतारा/आखीव पत्रिकेचा उतारा.