डॉ.ए पी जे अब्दुल कलाम ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती (वय ८३) यांचे शिलॉंग येथे निधन झाले.
जन्म – १५ ऑक्टोबर १९३१ (रामेश्वरम तामिळनाडू)
मृत्यू – २७ जुलै २०१५ (शिलॉंग मेघालय)
पुरस्कार – भारत रत्न ( १९९७ ) पद्म भुषण (१९८१) पद्म विभुषण (१९९०) रामानुजन अवार्ड (२०००)
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांनी २००२ ते २००७ या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती पदावर काम पहिले. त्याची ओळख ही एक भारतीय शास्त्रज्ञ आणि राजकारणी अशी आहे.
एमआयटी मधून पदवीधर झाल्यानंतर कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एरोनॉटिक्स, विकास स्थापना (डीआरडीओ) येथील प्रमुख शास्त्रज्ञ या पदावर कार्य केले. त्यानंतर त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) येथे भारतातील पहिले देशी उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्प संचालक म्हणून कार्य करून मोलाचे योगदान दिले.
राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर डॉ कलाम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंदूर व अनेक विद्यापीठा मध्ये प्राध्यापक म्हणून भेटी दिल्या. त्यांनी स्पेस सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी तिरुवानंतपुरम ते इंडियन इन्स्टिट्यूट अण्णा विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकी (चेन्नई), जे एस एस विद्यापीठ (म्हैसूर) या ठिकाणी सुद्धा कुलपती म्हणून काम केले.
विंग्ज ऑफ फायर, इंडिया २०२० आणि इग्निटेड माइंड्स ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
डॉ.कलाम सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! जय हिंद.
महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !
really great man we lost. dr.kalam sir given so much to us.