Palkhi Sohala 2024: देहू आळंदी पालखी सोहळा २०२४ संपूर्ण माहिती

पालखी सोहळा २०२४ वेळापत्रक, आषाढी वारी, पंढरपूर वारी सोहळा सविस्तर माहिती येथे पाहा.

By Reshma
4 Min Read
Palkhi Sohala 2024
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ह्या वर्षी शनिवार दिनांक. २९ जूनला (Aalandi Palkhi Sohala 2024) आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (palkhi sohala 2024) शुक्रवार दिनांक. २८ जूनला (Dehu Palkhi Sohala 2024) देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे.
पालखी सोहळ्याला आता फक्त ८ च दिवस शिल्लक राहिले आहेत. पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पालखी सोहळ्यासाठीची लगबग आता देहू आणि आळंदीत (Dehu Aalandi Palkhi Sohala 2024) पाहायला मिळत आहे. दोन्हीही नगर परिसरात फुलांच्या माळा, तुळशीहार माळा, इ साहित्यांनी सर्व दुकानं सजली आहेत.

पालखी सोहळा २०२४

Palkhi Sohala 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२४ ( Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2024) ची सुरुवात २८ जून रोजी दुपारी प्रस्थान सोहळ्याने होणार असून, १६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पालखीचे पंढरपुरात आगमन होणार आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे ३३९ वे वर्षे आहे.
यंदा आषाढी एकादशी १७ जुलै ला येत आहे. त्या निमित्त पंढरपुरात मोठा सोहळा होईल. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024) पंढरपुरात ४ दिवसांच्या मुक्कामानंतर दिनांक २१ जुलैला आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ह्यावर्षी  या पालखी सोहळ्याचे ३३९ वं वर्ष असणार आहे.

आषाढी वारी २०२४

Ashadhi Wari 2024 : देहू आणि आळंदी ( Dehu – Aalandi) नगरी आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2024) सज्ज झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि संत तुकाराम महाराज यांचा चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे.
रथाची डागडुजी, चांदीचं पॉलिश करण्यात आले आहे. या दोन्ही रथांसाठी योग्य बैलजोडी निवडण्यात आली आहे. या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यभरातील लक्षावधी वारकरी आणि भाविक यांच्या आगमनाचे वेड आता देहू-आळंदी परिसराला लागले आहेत. पालखी सोहळ्याला आता थोडेच दिवस राहिले असल्याने भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झटत आहे.
देहू आणि आळंदी देवस्थान समितीनेही पालखी सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशासन, नगर परिषदा, देवस्थान कमिटी तसेच अन्य अनेक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने वारकर्‍यांसाठीच्या मूलभूत सोयी उपलब्ध करण्यात येत आहेत.

पालखी सोहळा २०२४ वेळापत्रक

Palkhi Sohala 2024 Timetable:

 

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024


Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2024 Timetable

सरकारचा मोठा निर्णय

चालू वर्षी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतला असून  २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केलं होतं.
 सरकारकडून अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढीच्या शासकीय महापूजेस आता १० मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे.
श्री श्रेत्र पंढरपुर (Pandharpur Wari 2024) येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक आणि प्रवाशी येतात. प्रवाशी हे स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा पालखींसोबत चालत दिंडीने येत असतात.
शासनाने वारकरी मंडळींसाठी यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी एकाच ठिकाणी ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशी असणे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या गावापासून ते पंढरपूर अशी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राम कृष्ण हरी…!
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
1 Review
  • माऊली माऊली रूप तुझे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

    || जय जय राम कृष्ण हरी ||

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version